आकर्षक विद्युत रोषणाई

 ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त चंदुलाल बियाणी यांच्या वतीने महापुरुषांच्या पुतळ्यांना आकर्षक विद्युत रोषणाई





 परळी वैजनाथ, प्रतिनिधी

       राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज परळी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

             महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री म्हणून नुकतीच ना. धनंजय मुंडे यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. योगायोग म्हणजे आज दिनांक 15 रोजी त्यांचा वाढदिवसही होता. यानिमित्ताने माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी परळी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना आकर्षक विद्युत रोषणाई केली. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी  महापुरुषांच्या पुतळ्यांना तसेच राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, मौलाना आझाद चौक आदी ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.  यामुळे संपूर्ण परिसर झगमगाटून  गेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !