इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 मंत्री ना. धनंजय मुंडे यांचे कैलास फड यांच्या वतीने अभूतपूर्व स्वागत




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना.धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते बीड जिल्ह्यात व परळी दौऱ्यावर प्रथमच आले असता यानिमित्ताने कैलास फड यांच्या वतीने कण्हेरवाडी येथे भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.

           उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.त्यानंतर परळी दौऱ्यावर आले असता त्यांचा कन्हेरवाडी व बँक कॉलनी येथे अभूतपूर्व स्वागत करून सत्कार करण्यात आले. तसेच ना.धनंजय मुंडे यांना कृषिमंत्री मंत्रालय मिळाल्याबद्दल मुंबई येथे सत्कार करण्यात आला. 

       यावेळी वसंत (तात्या) मुंडे, मधुकर (तात्या) मुंडे, आनंत फड, भास्कर फड, अक्षय रोडे, निखिल भैया फड, वसंत फड, बाबासाहेब फड, अभी बळवंत, प्रकाश फड, संतोष फड, धीरज फड, गणेश फड, दिलीप फड, सोमनाथ पांचाळ, गणेश कराड, विकी डहाळे, महादेव ढाकणे, कार्तिक मुंडे, जयपाल रोडे, अक्षय रोडे, आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!