अभिष्टचिंतन लेख:✍️बालाजी ढगे >>>>>>परळी मतदारसंघाचे विकासभिमुख नेतृत्व; ना. धनंजय मुंडे

 परळी मतदारसंघाचे विकासभिमुख नेतृत्व; ना. धनंजय मुंडे




महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे राज्याच्या राजकारणात अत्यंत सक्रीयपणे कार्यरत आहेत. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करीत असतांना त्यांनी सर्वाधिक वेळ सामाजिक क्षेत्रासाठी दिला आहे. परळी तालुक्यातील सामुदायिक विवाह सोहळा, वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव, शिव जन्मोत्सव, भिम महोत्सव, खुल्या क्रिकेट स्पर्धा, विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करीत असतांनाच कोरोना लॉकडाऊन कालावधीत केलेले काम अत्यंत मोलाचे आणि हजारो जीव वाचविण्यासाठी उपयुक्त ठरलेले आहेत. सामुदायिक विवाह सोहळा हा माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या सामाजिक कार्याचा सर्वात मोठा उत्सव म्हटले तर वावगे ठरणार नाही. 2000 पेक्षा अधिक मुला मुलींचे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह पार पाडण्यात आले आहे. मणी मंगळसुत्र, संसारोपयोगी साहित्य देण्यासोबत मोठया उत्साहात हा सोहळा त्यांनी पार पाडला आहे. एक भाऊ म्हणून हजारो मुलींसाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे हे पुढे आलेले आहेत. परळी शहर किंबहुना बीड जिल्हयात या सामुदायिक विवाह सोहळयाची नेहमीच चर्चा होत होती. अर्थातच एवढ्या मोठया प्रमाणात यापूर्वी सामुदायिक विवाह सोहळा परळी शहरात पार पडला नव्हता. 


परळी शहर आणि तालुक्यात कोरोना कालावधीत विशेषतः दुसर्‍या लाटेदरम्यान परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. जो तो कोरोना पासून दुर राहण्याचा प्रयत्न करीत होता, रूग्णालयात उपचारासाठी आणि औषधीसाठी ओढा ताण होवू लागली अशा वेळी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे परळी शहर आणि मतदार संघातील सामान्य नागरिकांसाठी आरोग्य दुत म्हणून पुढे आले. पहिल्या लाटेत परिस्थिती गंभीर नव्हती, कोरोना विषाणूचा संसर्ग मात्र वाढतच होता अशा वेळी बाजारपेठा बंद, भाजीपाला मिळेनासा झाला, रूग्णांना वाहने मिळत नव्हती...एकुणच परिस्थिती विदारक होती.महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आपल्या नाथ प्रतिष्ठाणच्या माध्यमातून संपर्णू मतदार संघात आर्थिक दृष्टया कमकूवत असलेल्या लोकांना अन्नधान्यांचे वाटप केले. हातावर पोट असलेल्या सामान्य लोकांसाठी काही वेळा आर्थिक मदतही केली, भाजी विक्रेत्यांच्या भाज्या खरेदी करून किमान दहा वेळा त्या लोकांना वाटल्या. उपयुक्त ठरणारे रेमडेसिव्हीर उपलब्ध करून दिले. रूग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांशी 24 तास संपर्क ठेवत संवाद साधला. अंबाजोगाईच्या रूग्णालयात ऑक्सीजन उपलब्ध करून दिला. जिथे आवश्यकता तिथे रूग्णवाहिका किंवा इतर वाहने त्यांनी उपलब्ध करून दिली. या सर्व कामासाठी त्यांना आरोग्य दुत म्हटले गेले तर वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे ना.धनंजय मुंडे यांना या कामाबद्दल राज्य सरकारने सुद्धा प्रोत्साहित केले. थोडक्यात माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांचे कोरोना कालावधीतील सामान्य नागरिकांच्या जीवित सुरक्षेसाठी असलेले योगदान अत्यंत महत्वाचे म्हणावे लागेल.

एकीकडे कोरोना कालावधीत केलेले तातडीने काम समोर असतांना दुसरीकडे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या इतर सामाजिक कामाचा उल्लेख टाळता येणार नाही. सामुदायिक विवाह सोहळा हा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सामाजिक कार्याचा सर्वात मोठा उत्सव म्हटले तर वावगे ठरणार नाही. 2000 पेक्षा अधिक मुला मुलींचे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह पार पाडण्यात आले आहे. मणी मंगळसुत्र, संसारोपयोगी साहित्य देण्यासोबत मोठया उत्साहात हा सोहळा त्यांनी पार पाडला आहे. एक भाऊ म्हणून हजारो मुलींसाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे हे पुढे आलेले आहेत. परळी शहर किंबहुना बीड जिल्हयात या सामुदायिक विवाह सोहळयाची नेहमीच चर्चा होत होती. अर्थातच एवढ्या मोठया प्रमाणात यापूर्वी सामुदायिक विवाह सोहळा परळी शहरात पार पडला नव्हता. 

वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव मागील दहा वर्षापासून परळी शहरात होत आहे. नाथ प्रतिष्ठाणच्या या उत्सवाच्या माध्यमातून स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे वेळोवेळी आयोजन करण्यात आले आहे. अनेक दिग्गज कलावंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून परळी शहरात आलेले आहेत. क्रिकेट स्पर्धा हा तर माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांचा आवडीचा विषय. परळी शहरात राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा यापूर्वी त्यांनी आयोजित केल्या असून राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धांना नेहमीच प्रतिसाद मिळालेला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव परळी शहरातील एक अविभाज्य असा घटक बनला आहे. नाथ प्रतिष्ठाणच्या माध्यमातून माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या कल्पक नेतृत्वातून मागील काही वर्षापासून हे उत्सव होत आहेत. परळी शहर आणि तालुक्यात याशिवाय आणखी मोठे काम महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांनी केले असून राजकारणासोबत समाजकारणात असलेला त्यांचा सक्रीय सहभाग हा कौतुकास्पद आहे.  सामाजिक क्षेत्रातील त्यांचे काम राज्यभरात पोहचावे व त्यांचे काम अधिक गतीमान व्हावे याच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

                  ✍️बालाजी ढगे

            पत्रकार, परळी वैजनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !