इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

थेट बससेवा सुरू करण्याची ना.धनंजय मुंडे यांच्याकडे भाविक-भक्तांची मागणी

 श्री.वैद्यनाथ ज्योतीर्लिंग परळी ते श्रीसंत मन्मथ स्वामी मंदीर, कपीलधार थेट बससेवा सुरू करण्याची ना.धनंजय मुंडे यांच्याकडे भाविक-भक्तांची मागणी




परळी वैजनाथ /प्रतिनिधी 

     प्रभू वैद्यनाथ ज्योतीर्लिंग परळी-वैजनाथ ते श्रीसंत मन्मथ स्वामी मंदीर,कपीलधार(मांजरसुंभा)नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी श्री.वैजनाथ मंदीर देवस्थानचे विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे व राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक चेतन सौंदळे यांच्यासह भाविक-भक्तांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

  श्रावण तसेच अधिक मासानिमित्त मोठया प्रमाणात लिंगायत समाजासह सर्व जाती-धर्माचे व ईतर राज्यातूनही भाविक-भक्त प्रभू वैद्यनाथ ज्योतीर्लिंग परळी येथील दर्शन घेऊन श्रीसंत मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधीचे दर्शन करण्याकरिता कपीलधार(मांजरसुंभा) येथे जात असतात तसेच याठिकाणीतील निसर्गरम्य पर्वत टेकडयांमधून वाहणारा नैसर्गिक धबधबाही पर्यटकांसाठी आकर्षित करणारा आहे परंतू याठिकाणी जाण्यासाठी परळी येथून थेट बससेवा नसल्यामुळे भाविकांची व पर्यटकांची मोठया प्रमाणात गैरसोय होते त्यामुळे भाविक-भक्त,पर्यटक व प्रवाशांच्या सोयीकरिता त्वरीत बससेवा करण्याची मागणी विजयकुमार मेनकुदळे,चेतन सौंदळे,सोमनाथ निलंगे,रमेशअप्पा सपाटे,चंदूअप्पा हालगे,चंद्रकांत उदगीरकर,संतोष पंचाक्षरी,अशोक नावंदे,दयानंद चौधरी,प्रकाश खोत,जगदीश मिटकर,गिरीष बेंबळगे,मकरंद नरवणे,सोमनाथ गोपनपाळे,रमाकांत बुरांडे,संतोष जुजगर,कैलास रिकीबे,शिरीष सलगरे,अनिल चौधरी,मन्मथ नरवणे,संतोष चौधरी,निरंजन गौरशेटे,रत्नेश बेलुरे,संदीप चौधरी व भाविक -भक्तांच्यावतीने करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!