इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 परळीकरांचा दणका : डाॅ.संतोष मुंडेंचे पार्सल पडले भारी; सुनील शेट्टीने मागितली शेतकऱ्यांची माफी



               टोमॅटोच्या किंमती गगनात भिडल्या असताना अभिनेता सुनील शेट्टीने सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली होती.पण त्यावर आता शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे त्याने त्यांची माफी मागितली आहे.
    सुनील शेट्टीची सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा होत आहे, काही दिवसांपूर्वीच सूनीलने टोमॅटो आणि त्यांच्या वाढत्या किमतीवर विधान केले होते. सुनील शेट्टीने नुकतेच टोमॅटोबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. जेव्हा अभिनेत्याने टोमॅटोच्या वाढत्या किंमतीवर आपले मत व्यक्त केले तेव्हा सोशल मीडियावर त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. याच कारणामुळे सुनील शेट्टीला सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता ट्रोलिंगला कंटाळलेल्या अभिनेत्याने आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.
       टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीवर आपले मत व्यक्त करताना सुनील शेट्टी म्हणाला होता की, या गोष्टीचा परिणाम त्याच्या स्वयंपाकघरावरही होत आहे. सुनील शेट्टीने त्याच्या आधीच्या विधानात म्हटले होते की त्याने अलीकडे टोमॅटोचा वापर कमी केला आहे. यानंतर त्याच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. अभिनेत्याचे वक्तव्य व्हायरल होताच अनेक शेतकऱ्यांनी त्याचा निषेध केला. इतकंच नाही तर सामाजिक कार्यकर्ते डॉ. संतोष मुंडे यांनी अभिनेत्यावर टीका केली आणि त्याला विरोध करत सुनीलला टोमॅटोही पाठवले. या सर्व गोष्टींचा सूनील शेट्टीला मोठा धक्का बसला आहे.एका रिपोर्टनुसार सुनील शेट्टीने आता शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. तो म्हणाला, 'माझा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. मी त्यांच्याबद्दल नकारात्मक धारणा बाळगण्याचा विचारही करू शकत नाही. त्यांच्या पाठिंब्याने मी नेहमीच काम केले आहे. आम्ही आमच्या स्वदेशी उत्पादनांचा प्रचार करावा अशी माझी इच्छा आहे. त्याचा लाभ आपल्या शेतकऱ्यांना नेहमी मिळावा असे मला वाटते.सुनील पुढे म्हणाला, 'शेतकरी हा माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. हॉटेल व्यावसायिक या नात्याने माझे त्यांच्याशी नेहमीच थेट संबंध राहिले आहेत. माझ्या कोणत्याही विधानाने, जे मी बोललोही नाही, त्याने त्यांना दुखावले असेल तर मी मनापासून माफी मागतो. त्यांच्या विरोधात बोलण्याचे स्वप्नही मी पाहू शकत नाही. कृपया माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावू नका.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!