निधी समर्पण सोहळा

 भेल संस्कार केंद्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि निधी समर्पण सोहळा 



  परळी वैजनाथ......


              येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित, एक संस्कारक्षम पिढी घडविणारी, एकमेवाद्वितीय भेल संस्कार केंद्रात  इ. स. 2022 - 23 या वर्षातील सीबीएसई आणि स्टेट पॅटर्न इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत सत्कार सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास मा. श्री. अप्पाराव यादव      ( मुख्याध्यापक, खोलेश्वर विद्यालय,अंबाजोगाई)यांची प्रमुख अतिथी म्हणून विशेष उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री.विकासराव डुबे यांनी  भूषविले.या कार्यक्रमाची सुरूवात श्री.राहुल सर आणि त्यांच्या संघाने सरस्वतीस्तवन व सामूहिक पद्य सादर केले.( बलसागर भारत होवो...........)

         त्याचप्रमाणे भेल संस्कार केंद्राचे श्री. विकासराव डुबे (अध्यक्ष, स्थानिक समन्वय समिती) यांचे ज्येष्ठ पुत्र स्व. अजित विकास डुबे यांच्या स्मृतीसमारोहाप्रसंगी प्रथम प्रतिमापूजन आणि साश्रू नयनांनी भावपूर्ण अभिवादन मान्यवर, सर्व उपस्थित भेल परिवार, डुबे कुटुंबातील सर्व सदस्य, पालक इ .नी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री.अप्पाराव यादव यांनी विद्यार्थी आणि पालकांशी मनमोकळा संवाद साधत विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी पाळून मेहनत घेतली तर यश हे नक्कीच मिळते हे वेगवेगळी  उदाहरणे देऊन पटवून दिले.

 याप्रसंगी *श्री.दत्तापा ईटके* यांनी सद्गतित होऊन कै.अजित विकासराव डुबे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच एवढे अतिव दु:ख पचवून दादांनी आपले कार्य पुन्हा सुरू केले ही गोष्ट सोपी नाही असे मत मांडले .त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्री.विकासराव डुबे यांनी स्व. अजित डुबे यांच्या स्मृती प्रित्यर्थ संस्कार केंद्रातील ग्रंथालयास  विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी व संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पुस्तकांची गरज असते, म्हणून पुस्तकासाठी ग्रंथालयास अकरा हजार एक रुपयाचा(11,001/-)चा धनादेश संकुलाच्या प्राचार्याकडे सुपूर्द केला.     या निमित्त संस्कार केंद्रातील सीबीएसई विभागातील गुणवंत विद्यार्थी  यांचा त्यांच्या पालकांसमवेत यथोचित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच भेल परिवारातील एक अविभाज्य घटक बनलेला व बॅकबोन असलेला स्टेट विभागातील गुणवंत विद्यार्थी इ.चा त्यांच्या पालकासमवेत यथोचित सत्कार करण्यात आला.तसेच संकुलातील माजी विद्यार्थीनी *कु.पलक श्रीकांत जाजू हिने नीट परीक्षेत 705 गुण मिळवून महाराष्ट्रात दुसरा क्रमांक पटकाविला*. *चि.तुषार श्रीकांत नागरगोजे याने IIT मद्रास येथे निवड झाली.तसेच कु.मनस्वी महादेव मुंडे हिने राष्ट्रीय स्तरावर 'खेलो इंडीया' 400 मी आणि 800मी रनिंग आणि चि.चैतन्य  संतोष  चिद्रवार  याने 100 मी रनिंग व "लांब उडी" मध्ये बक्षिस  प्राप्त केले व संकुलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तसेच संकुलातील शिक्षिका *सौ.आरती अण्णाराव कान्नपुर्णे यांना पी.एच डी प्राप्त केल्याबद्दल सत्कार  करण्यात आला.*  ऑलिम्पियाड स्पर्धेत वेगवेगळ्या विषयांत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार केला.

       त्याबरोबरच सत्कारास उत्तर देताना अनेक विद्यार्थ्यांनी आपापले मनोगते व्यक्त केली, यामध्ये शाळेच्या आठवणींना उजाळा दिला आणि भेल संस्कार केंद्राने जी संस्काराची शिदोरी दिली आहे, तो कसा अनमोल ठेवा असून त्याचा वापर पावलोपावली आमच्या जीवनात होत आहे असे मत मांडत अनेक शिक्षकांची हुबेहूब नक्कल करून वातावरण थोडेसे हलके-फुलके केले होते.तसेच यानिमित्त संकुलातील थिंक टॅंक म्हणजेच व्यवस्थापन समिती यांचे अनुभव, अपार कष्ट, संस्कार, नैतिक मूल्ये इ. गोष्टींची रुजवणूक करण्यात अगदी मोलाचा वाटा उचलणारे सर्व समिती सदस्य यांचाही संकुलातर्फे यथोचित सत्कार करण्यात आला. 

        त्याचप्रमाणे या गुणवंत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व शिक्षकवृंदाचे संकूलातर्फे आकर्षक भेटवस्तू देऊन मान्यवरांकडून गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.अप्पाराव यादव  सर  लाभले होते.या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप श्री.विकासराव डुबे यांनी करतांना  संकुलाचा इतिहास  सांगत सर्व  गुणवंत विद्यार्थ्यांस  पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंग श्री.विकासराव डुबे(अध्यक्ष, स्थानिक समन्वयक समिती) श्री.विष्णुपंत कुलकर्णी, (सदस्य) श्री.अमोल डुबे (सदस्य)  प्राचार्य श्री.गिरीश ठाकुर सर (सी.बी.एस.ई) ,श्री.एन.एस. राव सर मुख्याध्यापक (स्टेट) श्री.सुनील बोतकुलवार (उपमुख्यध्यापक) ,सर्व विभाग प्रमुख, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व आजी- माजी विद्यार्थी व पालक आणि शहरातील शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या खुमासदार शैलीत श्री.नामदेव मुंडे आणि सौ.शितल केजकर ( ईटके) यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.प्रफुल्ल कांबळे सर यांनी मानले. हा कार्यक्रम श्री.पाटील परीक्षित सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंद यांनी नियोजन केले व पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !