इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना येथील सुरक्षागार्ड ची मुलगी कु.मयुरी राहुल रोडे कृषी विद्यापीठ अंबाजोगाई तालुक्यातून प्रथम

परळी प्रतिनिधी - परळी तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथील रहिवासी असलेले व सध्या पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना येथे सुरक्षागार्ड म्हणून काम करत असलेले राहुल रोडे यांची मुलगी कु.मयुरी राहुल रोडे ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ,परभणी संलग्न

कृषी तंत्र विद्यालय, अंबाजोगाई या काॅलेज मधुन अंबाजोगाई तालुक्यातून मुलींमध्ये प्रथम आलेली आहे. तरी तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

तिचा आज रोजी 18/07/23 निकाल लागला असून कु.मयुरी रोडे हिने या परीक्षेत 71.38% गुण घेऊन घवघवीत यश संपादित केले आहे. मयुरी हिने इयत्ता पहिली ते दहावीचे शिक्षण हे परळी येथील विध्यावर्धिनी विद्यालय येथे केले होते.

कृषी डिप्लोमा अंबाजोगाई येथे झालेला आहे तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक श्री खळगे सर ,याच्या मार्गदर्शना मुळे आज तिला यश मिळाले आहे. लहानपणापासूनच अत्यंत गुणी व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तिने यश संपादन केलेले होते अत्यंत हलाखीची परिस्थिती व घरामध्ये वडिलांशिवाय इतर कुठल्याही कमावत्या व्यक्तीचा आधार नसतानाही मयुरी हिने आज यशाचे शिखर गाठलेले आहे. लहानपणापासून 1ते 10 चे शिक्षण हे विध्यावर्धिनी विद्यालय परळी वैद्यनाथ येथे झाले असुन येथील आदर्श शिक्षक श्री. मातेकर सर यांचे मार्गदर्शन तिला  लाभलेले आहे असे ती म्हणत आहे.तिच्या या यशाबद्दल शाळा महाविद्यालयाचे शिक्षक वृंद यांच्यासह नातेवाईक आप्तेष्ट हितचिंतक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!