अभिष्टचिंतन लेख:✍️मोहन भोसले, सातारा >>>>>मैत्रीतला 'कोहिनूर' : ना. धनंजय मुंडे एक 'मित्रमाणूस'

 मैत्रीतला 'कोहिनूर' : ना. धनंजय मुंडे एक 'मित्रमाणूस'


       ना धनंजय मुंडे यांच्या मधील असलेला एक मित्रमाणुस ! आम्हा मित्र परिवार हा१९९२ मध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून आणि विविध स्तरातून शिक्षणा साठी एकत्र भेटलो!ते आज तागायत एकत्र मैत्री टिकून आहे(३१ वर्षे पुर्ण)या प्रवासात आम्ही पाहिलेला अनुभवलेला सुरुवातीला आम्ही पुण्या मध्ये सिम्बयोसिस महाविद्यालय आणि बारामती हॉस्टेल या ठिकाणी एकत्र १९९२ ला भुषण पटेल अमरावती,विशाल पाटील, रणधीर पाटील, विशाल जाधव,अकलूज, सुशील पंडित, रणवीर रावल नंदुरबार कै,अनंत पाटील उदगीर आणि उमेश चव्हाण भोळी खंडाळा(त्यांचा अत्यंत जीव यांच्यावर)दुर्दैवाने ते आमच्यात सध्या नाहीत तसेच सचिन शहाणे बीड आणि त्यांचे बालपणीचे मित्र सुंदर गित्ते, अनिल मुंडे, ओम देशमुख परळी,तुषार कोठावदे, राजु कोठावदे नाशिक,अमोल झगडे आणि योगेश जगताप बारामती असा पहिला कॉलेज मधला खास ग्रुप!नंतर २००३ मध्ये राकेश मिटकरी, अशोक चांदगुडे, निळखंठ पालवे आणि बरेच मित्र एकत्र आलो तो आजपर्यंत एकत्र आहोत,धनंजय मधला मित्रत्वाचा स्वभाव आज त्यांच्या जन्म दिना निमित्त सांगावा वाटतो!म्हणजे ते आज राजकीय पटलावर राज्याचे नेते आहेत म्हणुन न्हवे, आणि आजतेही तस मित्रांना जाणऊन देत नाहीत!अगदी कॉलेजदिवसा पासुन तो व्यक्ती मैत्रीमध्ये कसलाही जाती पातीचा किंवा आर्थिक परिस्थितीचा कधीही विचार शिवला देखील नाही आणि सर्वाना समान जीव लावणारा,प्रत्येकाच्या वैयक्तिक असो आर्थिक असो किंवा कौटुंबिक असो हाकेला धावुन येणारा प्रसंगी स्वतःला काही अडचण असो परंतु  काहीजाणीव न करून देता निस्वार्थी मदत करणार याला आम्ही मित्र साक्षीदार आहोत!आजही आमचे कौटुंबिक म्हणजे अगदी आई वडिलांशी सुध्दा तसेच नाते अगदी कुटूंबाचा एक सदस्य म्हणुन जपुन ठेवले आहे!अगदी कॉलेज जीवनात आम्हाला संपुर्ण भारत दर्शन(परदेश वारी) प्रसंगी४००-४०० कि.मी. मोटरसायकल प्रवास त्या व्यक्तीने घडवली!हे झाले कॉलेज जीवन(जाहीरपणे सांगण्या सारखे.☺️)त्यांच्या राजकीय जीवनाच्या पहिल्या दिवसापासुन आम्ही मित्र म्हणुन साक्षीदार!आजच्या त्यांच्या एवढ्या व्यस्त जीवनातुन सुध्दा मित्रांना वेळ देने, दरवर्षी सर्वजणांनी सहकुटुंब एकत्र भेटणे यात खंड पडला नाही!आता प्रत्येक मित्र वेगवेगळ्या क्षेत्रात,अगदी शेती करत असतील, वेगळे पक्ष असतील त्यात हा व्यक्ती कधीच फरक करत नाही, कसलेही काम असो, वैयक्तिक अडचण असो त्यांना वेळ देऊन प्रसंगी स्वतः संपर्क करून शक्य तेवढी मदत करत असतो!(कॉलेज जीवना नंतरच्या आणि त्या काळातही खुप मित्रपरिवार एकत्र आलो आहोत आणि त्यांचा स्वभाव आणि त्यांच्याही तसेच संबंध आहेत,काही फरक नाही, फक्त कॉलेज जीवनातील आठवणी म्हणुन आम्हा वरील मित्रांचा उल्लेख केला आहे!धनंजय मुंडे(सध्याचे नामदार)यांच्या स्वभावाविषयी माझ्या ३२ वर्षाच्या सहवासातील अनुभवातून एकच सांगतो, याला कसलाही भेदभाव नकरता मैत्रीकरणे आणि त्यांना शक्य होईल तसा वेळ देने आणि त्यांचा हट्ट पुरवणे आणि काही कारणाने एखादा मित्र थोडाजरी नाराज झाला तर त्या मित्राची समजुत काढेपर्यंत हा माणुस बेचैन असतो!याचा याचा नाद म्हणा किंवा स्वभाव म्हणा पण आहे!अशा मित्राला मनापासुन सर्व मित्राकडून मैत्रीपुर्ण सलाम आणि त्यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!भावी आयुष्य राजकीय यशस्वीआणिआरोग्यदायी लाभो, आपल्या सर्व मनोकामना पुर्ण होवो, हिच आई जगदंबेच्या चरणी साकडे!!


          ✍️मोहन भोसले, सातारा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार