इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

तीन दिवस इष्टलिंग महापुजा व अनुष्ठान

 श्रीशैल जगद्गुरूंची तीन दिवस धर्मसभा व अनुष्ठान; स्वागत रॅली : मोठ्या संख्येने सहभागी व्हा - विकास हालगे



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
          अधिक मासानिमित्त वीरशैव समाज परळी च्या वतीने श्री श्री श्री 1008 सूर्य सिंहासनाधीश्वर जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल यांच्या उपस्थितीत ईष्टलिंग महापूजा व तीन दिवसीय अनुष्ठानचे परळीत आयोजन करण्यात आले आहे . 20 जुलै रोजी स्वागत रॅली काढून जगद्गुरु यांचे स्वागत करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे. तथा वीरशैव विकास प्रतिष्ठान सह सचिव विकास हालगे  यांनी केले आहे.
           गुरुवार दिनांक 20 जुलै ते शनिवार दिनांक 22 जुलै 2023 पर्यंत हा सोहळा चालणार आहे . यावेळी अनेक शिवाचार्य महाराज उपस्थित राहणार आहेत.येथील हालगे गार्डन मधील अनुष्ठान सोहळ्यात तीन दिवस श्रीशैल पिठाच्या जगद्गुरूंच्या धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे .20 ,21 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता तर 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजता धर्म सभा ( धर्मोपदेश) होणार आहे. तसेच 21 जुलै रोजी सकाळी 7 वाजता व 22 जुलै रोजी सकाळी 9 ते 11 वाजता ईष्टलिंग महापूजा व दाम्पत्य पूजा होणार आहे .दिनांक 22 जुलै रोजीसकाळी 9 ते 1 धर्मोपदेश व नंतर महाप्रसादाने सांगता होणार आहे . 20 जुलै रोजी दुपारी चार वाजता शहरातील इटके कॉर्नर येथे श्रीशैल जगद्गुरूंचे स्वागत होणार आहे व वीरशैव समाजाच्या वतीने जगद्गुरूंची परळी शहरातून स्वागत रॅली काढण्यात येणार आहे,या निमित्त मोटार सायकल रॅली इटके कॉर्नर चौक ,एकमिनार चौक ,स्टेशन रोड राणी लक्ष्मीबाई टावर, गणेशपार मार्गे हालगे गार्डन पर्यंत काढण्यात येणार आहे. या अनुष्ठान सोहळ्यास समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे. तथा वीरशैव विकास प्रतिष्ठान सह सचिव विकास हालगे  यांनी केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!