अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण

इमेज
परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगावचा विजय बनला एमबीबीएस 'डॉक्टर'; गावकऱ्यांकडून भव्य मिरवणूक अन् नागरी सत्कार! ​अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण ​ एसटी चालकाच्या मुलाची गगनभरारी; परिसरातून कौतुकाचा वर्षाव ​परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :        जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगाव येथील विजय अरुण गिरी यांनी एमबीबीएस (MBBS) वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या दैदिप्यमान यशाबद्दल गाढे पिंपळगावच्या वतीने डॉ. विजय गिरी यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, तसेच ग्रामदैवत श्री पापदंडेश्वर मंदिराच्या सभामंडपात त्यांचा आई-वडिलांसह नागरी सत्कार करण्यात आला.     ​याबाबत सविस्तर वृत्त असे की, गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी तथा राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) चालक अरुण गिरी यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. मात्र, आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन पायावर उभे राहावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांनी मुलगा विजयला शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहित केले व पोट...

अभिष्टचिंतन लेख: ✍️ प्रदीप खाडे >>>राजकारणासह शिक्षण, कला-साहित्य-क्रीडा क्षेत्रातील व्यासंगी व्यक्तिमत्त्व : शिक्षणप्रेमी ना.धनंजय मुंडे

 राजकारणासह शिक्षण, कला-साहित्य-क्रीडा क्षेत्रातील व्यासंगी व्यक्तिमत्त्व : शिक्षणप्रेमी ना.धनंजय मुंडे

‘शिक्षण हे वाघिणींचं दूध आहे, जो ते प्राशिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’ या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणुकीला कृतिशील जोड देऊन काम करणारं नेतृत्व म्हणजे ना.धनंजय मुंडे.आजही कित्येक उपेक्षित बांधव शिक्षणाच्या परिघाबाहेर आहेत. बदलत्या कालानुरूप त्यांना दर्जेदार शिक्षण प्राप्त होणं हा त्यांचा हक्क आहे. शिक्षणप्रेमी ना.धनंजय मुंडे हे शिक्षणविषयक ध्येय - धोरणांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील असतात हे नेहमीच दिसते.

ना.धनंजय मुंडे यांचं व्यक्तिमत्त्व अनेकविध पैलूंनी व्यापलेलं आहे. आपल्या व्यापक अनुभव व चिंतनातून त्यांनी सामाजिक, राजकीय, अर्थिक, शिक्षण, क्रिडा या विषयांमध्ये विपूल प्रमाणात काम केले आहे.राजकारणासह

शिक्षण, कला- साहित्य-क्रीडा या क्षेत्रातील त्यांचा कृतीयुक्त व्यासंग, दैदिप्यमान म्हणून अधोरेखित आहे. त्यांच्या व्यासंगातील एकेक पैलू अनुकरणीय आणि पथदर्शक असाच आहे. विद्यार्थी चळवळ, युवामोर्चा, खेळाडू, पालक व एक शिक्षण प्रेमी नेता हे पैलू वारंवार दिसून येतात. नाथ प्रतिष्ठान च्या माध्यमातून उच्चकोटीचे सामाजिक काम उभे करतानाच नाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक प्रवाह प्रगतीपथावर घेऊन जाण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.शिक्षणविषयक त्यांचं प्रेम वंचितांच्या उद्धारासाठी आहे.या त्यांच्या कृतिशील पैलूचे उदाहरण ना.धनंजय मुंडे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री असताना दिसुन आले. राज्यातील उसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी संत भगवानबाबा वसतीगृहांची निर्मिती हा निर्णय त्यांनी घेतला.यातूनच आपल्याला शिक्षण प्रेमी धनंजय मुंडे दिसुन येतात. 


     शिक्षणातून निर्माण होणारे जीते जागते ‘प्रोडक्ट’ म्हणजे ‘विद्यार्थी’, विद्यार्थ्यांची सर्वंकष जडण-घडण ज्या अध्ययन - अध्यापन प्रकियेतून साकारली जाते; अशी शाळा, महाविद्यालये दर्जेदार असावीत. विद्यार्थ्यांना घडविणारा अध्यापक वर्ग गुणवत्तेचा असावा. विद्यार्थीदशेत अभ्यासक्रमाबरोबरच आधुनिक जीवनमूल्यांचा संस्कार विद्यार्थ्यांवर केल्याने, ते राष्ट्रउभारणीस फलदायी ठरेल असे धोरण ना.धनंजय मुंडे यांचे आहे.एक सुसंस्कृत, शांत, संयमी, परंतु करारी व्यक्तिमत्त्व असलेले धनंजय मुंडे सामाजिक, शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांना चांगल्या शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात.शिक्षणाबाबत आग्रही भूमिका असणारे धनंजय मुंडे शिक्षणासाठी धडपडणार्‍या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. त्यांना अडिअडचणीत आधार देतात.राज्यातील वंचित - उपेक्षितांच्या आयुष्यात उन्नतीचे रंग भरण्याचे काम त्यांनी केले.

          अशा या आमचे आधारस्तंभ, दीपस्तंभ शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्त्व ना.धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने या प्रेरणादायी व आमचे शक्तीपीठ असलेल्या व्यक्तीमत्वाला लक्ष लक्ष शुभेच्छा !!!  लाडक्या नेत्याला आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो आणि महाराष्ट्रातील जनतेची त्यांच्या हातुन सेवा घडो हीच प्रभु वैद्यनाथ चरणी विनम्र प्रार्थना...!


        - प्रदीप खाडे, 

सहसचिव नाथ शिक्षण संस्था परळी वैजनाथ.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या