पोस्ट्स

वाचन प्रेरणा दिन, मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

इमेज
  मराठी वाङ्मयमंडळ भाषा समृद्ध करते- प्रो.डॉ.एम. बी. धोंडगे सिरसाळा,प्रतिनिधी...            राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर व श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय सिरसाळा सामंजस्य करारांतर्गत दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी संपन्न झालेल्या वाचन प्रेरणा दिन, मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन व ग्रंथ प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रो.मुंजा धोंडगे हे होते. कार्यक्रमाध्यक्ष म्हणून राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे होते. याप्रसंगी बोलताना प्रोफेसर मुंजा धोंडगे यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा दिनापासून मराठी साहित्यातील विविध ग्रंथांचे वाचन केले पाहिजे कारण एक पुस्तक हे शंभर मित्राप्रमाणे असते. मराठी साहित्य मंडळाच्या माध्यमातून मराठी भाषा समृद्ध होण्यास मदत होते. असे मत व्यक्त केले.         लातूर येथे  राजश्री शाहू महाविद्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करून झाली. या ग्रंथ प्रदर्शनाचे व वाङ्मय यउद्घाटन प्रो.डॉ. एम. बी. धोंडगे( मराठी विभाग प्रमुख तथा आधिसभ

विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

इमेज
  विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा पुस (प्रतिनिधी)  भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील  विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.  रविवार दि.15 ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरा करण्यात आला  विवेकानंद सार्वजनिक वाचनालय आयोजीत कार्यक्रमात रघुनाथ धोंडिराम गायके याच्या हास्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास मुख्याध्यापक मधुकर गिरवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले वाचाल तर वाचाल या ऊर्जेचे महत्त्व पटवून देण्यात आले.

आशा व गटप्रर्वतकांचा १८ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा

इमेज
  आशा व गटप्रर्वतकांचा १८ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      आशा व गटप्रर्वतकांनी १८ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला असुन परळी तालुका आरोग्य अधिकारी यांना याबाबत संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.           कृती समितीच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक या येत्या १८ ऑक्टोबर २०२३ पासून आपल्या मागण्यांच्यासाठी बेमुदत संपावर जात आहेत. १. गटप्रवर्तकांचे कायम कर्मचारी म्हणून समायोजन करा. २. आशा व गटप्रवर्तक यांच्यावरील ऑनलाईन कामाची सक्ती बंद करा.३. आशा व गटप्रवर्तक यांना दिवाळी बोनस द्या.४. आशा व गटप्रवर्तक यांना केंद्र सरकारने मानधनात वाढ करावी.५. सप्टेंबर २०२३ चे मानधन देण्यात यावे.६. जुलै २३ ते सप्टेंबर २३ चे वाढीव मानधन देण्यात यावे.७. आभा कार्डचे मानधन देण्यात यावे.८. आरोग्य वर्धीनीचे मानधन देण्यात यावे.९. केंद्र सरकारचा कोवीड भत्ता ऑक्टोंबर २१ ते मार्च २२ चे सहा महिण्याचा १०००/-- प्रमाणे ६०००/- देण्यात यावे..या मागण्यांच्यासाठी महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने संपावर जात आहेत १८ ऑक्टोबर आगोदर सरकारने या

बास्केटबॉल स्पर्धेत कॉलेजचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर

इमेज
  न्यू हायस्कूल ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांने पटकावले सुवर्णपदक बास्केटबॉल स्पर्धेत कॉलेजचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी चि. शिवम समाधान मुंडे याने  नेपाळ येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.                                                             शहरातील थर्मल कॉलनी परिसरातील न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी चि‌. शिवम समाधान मुंडे याने बास्केटबॉल स्पर्धेमध्ये विभाग स्तरावर,राज्यस्तरावर व त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर आपल्या खेळाची चुणूक दाखवली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर बास्केटबॉल खेळ प्रकारात त्याची निवड झाली. त्यानंतर नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावले.                                          चि‌. शिवम मुंडे याला मिळालेल्या यशाबद्दल व कॉलेजचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवल्याबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच

पंकजाताई मुंडे यांचा दसरा मेळाव्याचा टीझर जारी

इमेज
  मी येत आहे, आपल्या दसऱ्यासाठी..२४ ऑक्टोबरला भेटूया..आपल्या भगवान भक्तीगडावर सिमोल्लंघनाला! पंकजाताई मुंडे यांचा दसरा मेळाव्याचा टीझर जारी सावरगांवच्या ग्रामस्थांनी दिले मेळाव्याचे निमंत्रण बीड ।दिनांक १६। दरवर्षी दसरा मेळाव्याचं निमंत्रण देता.. आताही मिळालयं, मी येत आहे, आपल्या  दसर्‍यासाठी.. माझी भक्ती आणि तुमची शक्ती तिथे आपल्याला यायला भागच पाडेल. २४ ऑक्टोबरला भेटूयात, आपल्या भगवान भक्तीगडावर सिमोलंघनासाठी...! भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा सावरगांवच्या दसरा मेळाव्याचा  टीझर जारी झाला आहे.    हा व्हिडिओ पंकजाताई मुंडे यांच्या अधिकृत यूट्युबवर जारी झाला असून त्यात त्यांनी सावरगांवच्या भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. पंकजाताईंनी म्हटलं आहे की, मेळाव्याला यायला तुम्ही चारचाकी घेता, दोन चाकी घेता, सायकल घेता, बैलगाडी घेता, नाही तर रान तुडवत येता.. पण येताच...! लेकरांचा हात धरता,कोणाला काखेवर घेता, बायाबापड्या निघता, म्हातारे कोतारे माणसं, तरुण पोरं  सगळे निघता... दसर्‍याला सर्वांची पावले वळतात ती भगवान भक्तीगड सावरगावकडे.. ही दसर्‍याची

शिक्षण व रोजगार खाजगीकरण विरोधात विद्यार्थी युवक रस्त्यावर

इमेज
  शिक्षण व रोजगार खाजगीकरण विरोधात विद्यार्थी युवक रस्त्यावर   परळी / प्रतिनिधी   एस.एफ.आय व डी.वाय.एफ.आय.या विद्यार्थी व युवकांच्या संघटनेच्या वतीने देशभर होत असलेल्या निदर्शनाच्या मोहिमेत सोमवार दि 16 रोजी परळी तालुक्यातील असंख्य विद्यार्थी व युवक शिक्षण वाचवा,शाळा वाचवा व रोजगार वाचवा या घोषणेसह शेकडो युवक,विद्यार्थी रस्त्यावर उतरले. बीड जिल्हा हा उसतोड मजुरांचा जिल्हा असून जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी बांधव वर्षानुवर्ष शेती,ऊस तोडणी करून, मोलमजुरी करून आपल्या मुलांना शिकवून नोकरीचे स्वप्न बघतात या युवक ,विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या स्वप्नाला उध्वस्त करण्याचं काम महाराष्ट्र सरकार आपल्या धोरणाच्या माध्यमातून करत आहे याबद्दलचा तीव्र संताप सर्व स्तरातून होत आहे. गतिमान सरकार ,गरिबांचे सरकार या शासनाच्या सर्व पोकळ घोषणा आहेत याची प्रचिती दिवसेंदिवस इथल्या  युवक, विद्यार्थ्यांना व नागरिकांना होत आहे सर्व स्तरातील लोक शासनाच्या या व इतर खाजगीकरण कंत्राटीकरण निर्णयाविरोधात रस्त्यावरती उतरत आहेत.आरोग्य सेवेसारख्या अत्यावश्यक सेवेच्या खाजगीकरणाचा घेतलेला निर्णय इथल्या जनमानसाच्या जीवन मरणा

श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या दुर्गोत्सवात फुलचंद कराड यांच्या हस्ते देवीची घटस्थापना

इमेज
  दुष्काळाचे सावट दुर होऊ दे, बळीराजा समृद्ध होऊ दे-फुलचंद कराड श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या दुर्गोत्सवात फुलचंद कराड यांच्या हस्ते देवीची घटस्थापना परळी प्रतिनिधी श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केल्या जाणाऱ्या दुर्गोत्सवात श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष फुलचंद कराड यांच्या हस्ते विधीवत महाआरती करुन घटस्थापना करण्यात आली. 22 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बालयोगी भागवताचार्य ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगावकर यांचे सुश्राव्य कीर्तन  होणार आहे. नऊ दिवस विधिवत पूजाअर्चा व वाईट प्रवृत्तीच्या रावणाचे विजया दशमीच्या दिवशी दहन कार्यक्रम होणार आहे. याचा सर्व भाविक नागरिकांनी  लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत भगवानबाबा दुर्गोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष फुलचंद कराड यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी बळीराजा वरील दुष्काळाचे आलेले संकट दूर होऊ दे असे देवीला साकडे घातले. दुष्काळी पार्श्वभूमी लक्षात घेता यंदा अत्यंत साधेपणाने दुर्गोत्सव साजरा करण्याचे श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या वतीने ठरविण्यात आले आहे. श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष फुलचंद कराड यांच्या हस

प्रेरणा वाचनालयास पुस्तके भेट देणार- मुख्य अभियंता डॉ.अनिल काठोये

इमेज
  बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन आम्हाला स्वाभिमानाने जगणे शिकवले- भिक्खु धम्मशील वाचन संस्कृती वाढली पाहिजे यासाठीच प्रेरणा वाचनालयास पुस्तके भेट देणार- मुख्य अभियंता डॉ.अनिल काठोये परळी /प्रतिनिधी 14 ऑक्टोबर 1956 साली ऐतिहासिक दीक्षाभूमी नागपूर येथे महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आणि खऱ्या अर्थाने सन्मान व स्वाभिमानाने जगणे शिकवलं असे प्रतिपादन बीड येथील पु.भिक्खु धम्मशील यांनी थर्मल कॉलनी येथे 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमात   बोलत होते. वाचन संस्कृती वाढली पाहिजे. सर्वांनी ती जोपासली पाहिजे. या साठीच प्रेरणा सार्वजनिक वाचनालयास पुस्तके भेट देण्यात येणार असल्याचं प्रतिपादन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये यांनी केले.  शहरातील  परळी औष्णिक विद्युत केंद्रातील  शक्तीकुंज वसाहत येथे प्रेरणा सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता डॉ. अनिल काठो

समाज तुमच्या पाठीशी कुटुंबाला उघड्यावर पडू देणार नाही - मनोज जरांगे पाटील

इमेज
  आंतरवाली येथील सभे दरम्यान गेवराईच्या तरुणाचा उष्मघाताने मृत्यू ; अंत्यविधीला उपस्थित राहून जरांगे पाटीलांची श्रद्धांजली ------------------------------ गेवराई/ एमबी न्युज वृत्तसेवा  अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे काल दि. १४ ऑक्टोबर रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची विराट जाहीर सभा संपन्न झाली. या सभेसाठी पायी गेलेल्या गेवराईतील एका 36 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच जरांगे पाटील हे अंत्यविधीला उपस्थित राहुल श्रद्धांजली अर्पण केली. विलास शिवाजीराव पवार (वय ३५) असे मयताचे नाव आहे. मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे यासाठी १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटा येथे जाहीर सभा संपन्न झाली या सभेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. दरम्यान या सभेसाठी गेवराई येथील विलास शिवाजीराव पवार हा तरुण शहागड येथून पायी गेला होता. याठिकाणी त्याला जास्त प्रमाणात उलटीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्याने छोटा भाऊ गणेश याला कॉल करून माहिती दिली. यानंतर तातडीने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले.  मात्र ग

दांडिया महोत्सवास महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे... संयोजक पवन फुटके

इमेज
  तेली समाजाच्या दांडिया महोत्सवाचे कृषीमंत्री धनंजय मुंडे व वाल्मिक आण्णा कराड यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन   दांडिया महोत्सवास महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे... संयोजक पवन फुटके  परळी वैजनाथ दि.१६ (प्रतिनिधी)        येथील तेली समाजाच्या वतीने नवरात्री निमित्त तेली समाज सार्वजनिक दांडीया उत्सव समितीच्या वतीने दांडीया उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दांडीया उत्सवाची सुरुवात सोमवारी (ता.१६) सायंकाळी ६ वाजता कृषीमंत्री धनंजय मुंडे व वाल्मिक आण्णा कराड यांच्या हस्ते होणार आहे. यास समाजातील सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दांडिया उत्सव समितीचे अध्यक्ष पवन फुटके व सदस्यांनी केले आहे.              येथील श्री. वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनि मंदिरात तेली समाजाच्या वतीने गेल्या वर्षापासून दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा दांडिया उत्सवाचे दुसरे वर्षे आहे. नवरात्री निमित्त तेली समाज सार्वजनिक दांडीया उत्सव समितीच्या वतीने दांडीया उत्सव २०२३ चे आयोजन १६ ते २३ आँक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. या महोत्सवात महिलांच्या कलाग

माहूरगडावर चौथ्या माळेला संगीत सेवा

इमेज
  माहूरगडावर चौथ्या माळेला पुण्याच्या सौ.संगीता चौधरी कुलकर्णी यांचे भक्ती-संगीत   माहूर:, श्री.रेणुका देवी संस्थान  श्रीक्षेत्र माहूरगड येथे शारदीय नवरात्र उत्सव आयोजित करण्यात आला आहे.  चौथ्या माळेला दिनांक १८ आँक्टोबर २०२३ सायंकाळी ७ वाजता पुण्याच्या सुप्रसिद्ध गायिका सौ.संगीता चौधरी कुलकर्णी व संच भक्ती-संगीताचा सुमधुर कार्यक्रम सादर करणार आहेत.                            मागील अनेक वर्षांपासुन सौ.संगीता कुलकर्णी  व संच रेणूका माते चरणी आपली सेवा समर्पित करीत आहेत. कोरोना महामारीच्या काळात देखील त्यांनी आपल्या सुमधुर स्वरांनी विष्णुदासांच्या रचना ध्वनिमुद्रित करुन श्री.क्षेत्र माहूरगड देवस्थान चरणी अर्पण केल्या ज्या आज देखील गडावर ऐकण्यात येतात.          Click-  गतवर्षी माहूरगड येथे सादरीकरण झालेले भक्ती-संगीत             भक्ती-संगीत कार्यक्रमात त्यांना श्री.मंगेश जवळेकर (संवादिनी) श्री.स्वप्नील धुळे (तबला) श्री.विश्वेश्वर जोशी (पखावज) व श्री.गिरीश देशमुख (तालवाद्ये) साथसंगत करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन पुण्याच्या सुप्रसिद्ध निवेदिका योगिता गुर्जर या करणार आहेत. सर्व रसिक श्र

गुरुदेव श्री आशुतोष महाराज जी(संस्थापक एवं संचालक, दिव्य ज्योति जाग्रति संस्थान)

इमेज
  नवरात्री विशेष:दुर्गा मातेचे दैवी रूप पाहून खरी दुर्गा पूजा साजरी करा गुरुदेव श्री आशुतोष महाराज जी (संस्थापक एवं संचालक, दिव्य ज्योति जाग्रति संस्थान) आज आपण माँ जगदंबेची मनोभावे आणि अनेक पद्धतींनी पूजा करत आहोत - कीर्तन! जागरण! तीर्थयात्रा! व्रत उपवास! ज्योत प्रज्वलन! आरती! निःसंशयपणे, या सर्व पद्धती समाजात देवीचे माहात्म्य स्थापित करतात. देवीचे वैभव आणि प्रतिष्ठा वाढते. पण या पद्धतींमुळे आपली देवी पूर्णपणे आनंदी होते का? हे जाणून घेण्यासाठी 'देवीला' मानण्यासोबतच 'देवीचाही' विचार करणे महत्त्वाचे आहे. माता काय म्हणते? कोणते नियम आणि कायदे त्यांना संतुष्ट करतात? त्यांच्या मते ज्ञानाची भक्ती म्हणजे काय आणि त्याची शाश्वत पद्धत कोणती? चला तर मग मातेच्या शब्दात, स्वतः मातेकडून जाणून घेवू या. देवी पुराणात एक कथा वर्णन केलेली आहे. गिरीराज हिमालय आणि त्यांची पत्नी मीना यांनी दुर्गा देवीची कठोर तपश्चर्या केली. त्यांची इच्छा होती की ब्रह्मदेवाच्या रूपातील देवीने त्यांच्या कन्येच्या रूपात जन्म घ्यावा. त्या दोघांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन माता प्रकाशाच्या विशाल किरणाच्या

प्रासंगिक अभिष्टचिंतन लेख>>>>>शिक्षणप्रेमी, सर्वसामान्यांचा आणि बहुजणांचा आधार : अॅड. माधव (अप्पा) जाधव

इमेज
  शिक्षणप्रेमी, सर्वसामान्यांचा आणि बहुजनांचा आधार : अॅड. माधव (अप्पा) जाधव गेली अनेक वर्षांपासून सर्वत्र नावा रुपाला आलेलं व्यक्तिमत्व, गोर गरिबांच्या सेवाकार्यात स्वतःला सर्वस्वाने वाहून घेत रंजल्या गांजल्यांचा आधार होण्याचं महान कार्य या पंचक्रोशीत सातत्याने होत आहे. नैसर्गिक आपत्ती असो वा दुर्घटना, यात सगळ्यांचं दुःख आपल्या खांद्यावर घेत आपलेपणाचा हात आणि खंबीरपणे साथ देण्याचं कार्य आप्पा करत आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सर्वात मोठं कार्य म्हणजे समाजसेवा. गावं, गल्लीबोळ्या, तांडे, वसाहती, डोंगरदाऱ्यात वसलेले सर्व आठरापगड जाती धर्माचे लोकं यांची मदत आणि सेवा करण्याचं काम ते करत आहेत. राजकारणा बाहेरच समाजकारण आणि लोकसेवा यांना समर्पित असं जीवन कार्य आहे त्यांचं. शेतकरी आत्महत्या, अपघात यात कुटुंबाचा आधार गमावलेल्या परिवारासाठी त्यांनी मायबाप होऊन त्या घरातील लेकरांच्या शिक्षणासाठी स्वतः जिम्मेदारी घेत त्यांना आधार देताना मी अनेकवेळा पाहिलंय! Click- ■ *BRS: Madhav Jadhav | Birthday Wishes | ॲड.माधव जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !* #mbnews #subscribe #like #share #comm

ॲड. अरुण पाठक यांना पितृशोक

इमेज
  जुन्या पिढीतील लढावू व्यक्तिमत्त्व हरवले !  अशोकराव पाठक यांचे निधन ॲड. अरुण पाठक यांना पितृशोक परळी वैजनाथ, प्रतिनिधी         परळी शहरातील सर्व परिचित व्यक्तिमत्व तसेच जुन्या काळातील एक लढाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले औष्णिक विद्युत केंद्रातील सेवानिवृत्त अशोकराव पाठक यांचे आज रविवार दि.१५ रोजी सकाळी निधन झाले. मृत्यू समयी ते 69 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.        अशोकराव सुंदरप्रसाद पाठक हे परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व परिचित व्यक्तिमत्व होते. एक अग्रेसर व अन्यायाविरुद्ध लढणारे लढाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची सर्वपरिचितांमध्ये ओळख होती. मूळ (उखळी बु.) येथील रहिवासी असलेले अशोकराव पाठक हे औष्णिक विद्युत केंद्रात अनेक वर्ष कार्यरत होते. त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारा दरम्यानच त्यांची आज प्राणज्योत मालवली. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड अरुण पाठक यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने पाठक कु

कार्यकारणी जाहीर

इमेज
  स्वराज्य जननी दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी आबासाहेब देशमुख यांची निवड परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...        शहरातील देशमुख गल्ली भागातील स्वराज्य जननी दुर्गोत्सव मंडळाची एक व्यापक बैठक या भागातील नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत स्वराज्य जननी दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी आबासाहेब देशमुख  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.     येथील देशमुख गल्ली भागातील स्वराज्य जननी दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने  आदिमाया, आदिशक्तीचा नवरात्रोत्सव अतिशय भक्ती भावाने साजरा केला जातो.  नवरात्र उत्सव दरम्यान सांस्कृतिक तसेच विधायक कार्यक्रमांमुळे आनंदी वातावरण असते. नुकतीच नवरात्र महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात  येथील स्वराज्य जननी दुर्गोत्सव मंडळाची एक व्यापक बैठक घेण्यात येऊन तीत दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी  आबासाहेब देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.        यावेळी नवरात्री महोत्सवा दरम्यान स्वराज्य जननी दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने भागातील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक तसेच विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे दुर्गोत्सव मंडळाचे नवनिर्वा

महापुरुषांना अभिवादन धार्मिक स्थळांचे दर्शन घेत साधेपणाने वाढदिवस साजरा करणार

इमेज
  ॲड.माधव  जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन महापुरुषांना अभिवादन धार्मिक स्थळांचे दर्शन घेत साधेपणाने वाढदिवस साजरा करणार परळी (प्रतिनिधी) दि.१४ - भारत राष्ट्र समितीचे परळी विधानसभा प्रमुख ॲड.माधव - आप्पा जाधव यांचा वाढदिवस मतदार संघात साजरा केला जाणार आहे.या वाढदिवसानिमित्त मतदार संघात विविध ठिकाणी समजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहेत.यामधे रक्तदान शिबिर,महापुरुषांना अभिवादन  धार्मिक स्थळांचे दर्शन घेऊन वाढदिवस साजरा केला जाणार आहे. ॲड.माधव जाधव हे रविवार दि.१४ रोजी सकाळी ७ वा. अंबाजोगाई येथे श्री योगेश्वरी देवीचे दर्शन घेणार आहेत.त्यानंतर सकाळी ८ ते १२ जाधव कोचिंग क्लासेस प्रशांत नगर  अंबाजोगाई येथे रक्तदान शिबिराला उपस्थिती लावणार आहेत.दुपारी १ ते २ सिरसाळा येथे विविध धार्मिक स्थळांचे दर्शन,दुपारी ३ वा.गोपीनाथगड पांगरी दर्शन,दुपारी ४ ते ६ परळी वैजनाथ येथील धार्मिक स्थळांचे दर्शन,सायंकाळी ७ वा.घाटनांदूर येथे विविध धार्मिक स्थळांचे दर्शन,सायं. ८ वा.पट्टीवडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत.

देवीची घटस्थापना विधिवत होणार; विजया दशमीच्या दिवशी दुष्ट प्रवृत्तीच्या रावणाचे दहन

इमेज
 यंदाचा दुर्गोत्सव साधेपणाने साजरा करणार - फुलचंद कराड देवीची घटस्थापना विधिवत होणार; विजया दशमीच्या दिवशी दुष्ट प्रवृत्तीच्या रावणाचे दहन बालयोगी भागवताचार्य ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या किर्तनाचे आयोजन परळी (प्रतिनिधी) श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केला जाणारा दुर्गोत्सव दुष्काळी पार्श्वभूमी लक्षात घेता यंदा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. रविवारी देवीची घटस्थापना केली जाणार असून, विजया दशमीच्या दिवशी वाईट विचार आणि दुष्ट प्रवृत्तीच्या रावणाचे दहन केले जाणार आहे. त्याच बरोबर समाज प्रबोधन व्हावे यासाठी बालयोगी भागवताचार्य ह.भ. प.हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष फुलचंद कराड यांनी दिली. संपर्क कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते उपस्थितांशी संवाद साधत होते. फुलचंद कराड अध्यक्ष असलेल्या श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दुर्गोत्सव दणक्यात साजरा केला जातो. दरवर्षी मोंढा भागात देवीची घटस्थापना करून नऊ दिवस विविध स्वरूपाचे भव्य सांस्कृतिक कार

जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळ कार्यकारणी

इमेज
  जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रविराज जाधव उपाध्यक्षपदी संतोष साखरे तर सचिव पदी स्वप्नील सुरवसे यांची निवड परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...        शहरातील फुले चौक,  भागातील जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाची एक व्यापक बैठक मुख्य मार्गदर्शक वैजनाथराव सोळंके, रमेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रविराज जाधव, उपाध्यक्षपदी संतोष साखरे तर सचिव पदी स्वप्निल सुरवसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.         येथील फुले चौक भागातील जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने  आदिमाया, आदिशक्तीचा नवरात्रोत्सव गेल्या 34 वर्षापासून अतिशय भक्ती भावाने अविरतपणे साजरा केला जातो.  नवरात्र उत्सव दरम्यान सांस्कृतिक तसेच विधायक कार्यक्रमांमुळे आनंदी वातावरण असते. नुकतीच नवरात्र महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात  येथील जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाची एक व्यापक बैठक घेण्यात येऊन तीत जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी  रविराज जाधव, उपाध्यक्षपदी संतोष साखरे कार्याध्यक्षपदी नितीन झिरपे, तर सचिवपदी स्वप्निल सुरवसे, कोषाध्यक्षपदी बळीर

परळी मतदारसंघात कृषी विभागाच्या तीन संस्था साकारणार; मान्यतेसह निधीला मंजुरी

इमेज
  बोले तैसा चाले! धनंजय मुंडे यांची आणखी एक मोठी घोषणा पूर्ण! परळी मतदारसंघात कृषी विभागाच्या तीन संस्था साकारणार; मान्यतेसह निधीला मंजुरी सोयाबीन प्रक्रिया केंद्र, कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय उभारणीच्या सुमारे 311 कोटींच्या उभारणीस प्रशासकीय मान्यता तीनही शासकीय संस्था उभारणीचे शासन निर्णय जारी मुंबई (दि. 13) - राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी 'बोले तैसा चाले' ही उक्ती खरी ठरवत बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ तालुक्यात कृषी विभागामार्फत तीन शासकीय संस्था उभारणीच्या निर्णयास आज प्रशासकीय मान्यतेसह निधी उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.  परळी वैद्यनाथ तालुक्यात सोयाबीन संशोधन, प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कामास प्रशासकीय मान्यता आज देण्यात आली असून, या कामासाठी 24 कोटी 5 लाख इतक्या निधी खर्चास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. या अस्थापनेवर 15 पेक्ष्या अधिक पदांची नव्याने निर्मिती करण्यात येणार असून, बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. 

ॲड.माधव जाधव मित्र मंडळ आयोजित गौरी सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

इमेज
  ॲड.माधव जाधव मित्र मंडळ आयोजित गौरी सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर परळीच्या शिवराज स्वामी यांचा प्रथम, सिरसाळा येथील वर्षा जाधव यांचा दुसरा तर,परळीतील मिनाक्षी जाधव यांचा तिसरा क्रमांक परळी(प्रतिनिधी) दि.१३ - ॲड.माधव  जाधव मित्र मंडळ आयोजित गौरी सजावट स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले.या स्पर्धेमध्ये सहाशे पंचवीस स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता मतदार संघातील विविध भागातून या नोंदणीला दोनच दिवसात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेमध्ये विविध संदेश देणारे उत्कृष्ट देखावे स्पर्धकांनी व्हाट्सअप च्या माध्यमातून मित्र मंडळाला पोहोचवले होते प्रामुख्याने यामध्ये झाडे लावा झाडे लावा झाडे जगवा, किल्ला देखावा, बाईपण भारी देवा,पंढरीची वारी, अंगणवाडी देखावा यासह अनेक धार्मिक सामाजिक संदेश देणारे देखावे स्पर्धकांकडून सादर करण्यात आले. यामध्ये परळी येथील शिवराज स्वामी यांनी साकारलेला किल्ल्याच्या देखाव्याचा पहिला क्रमांक,सिरसाळा येथील वर्षा जाधव यांचा पंढरीची वारी देखाव्याचा दुसरा क्रमांक तर,परळी येथील मिनाक्षी जाधव यांनी साकारलेला झाडे लावा-दुष्काळ हटवा, असा संदेश देणाऱ्या देखाव्याला तिसरा

पोलीसांची बेधडक कारवाई

इमेज
गांजाची शेती : 28 किलो गांजा जप्त  पंकज कुमावत - धारूर पोलीस स्टेशनची कारवाई धारूर, एमबीृ न्युज वृत्तसेवा धारूर तालुक्यातील पिंपळवाडा शिवारात  12 ऑक्टोबर गुरुवार रोजी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व पोलीस ठाणे धारूर यांची संयुक्त कारवाई करत अवैध गांजाची 28 किलो वजनाचा 1 लाख 44 हजार 520 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी लक्ष्मण तिडके यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.    तालुक्यातील पिंपळवाडा येथे गांजाची शेती करत असल्याची माहिती पंकज कुमावत यांना गुप्त खबऱ्याच्या द्वारे मिळाली की पिंपरवाडा शिवारात  लक्ष्मण जयवंत तिडके रा. भोगलवाडी हा स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीर रित्या गांजाची झाडे लावून त्याचे संवर्धन करून जोपासना करीत आहे.अशी खात्रीपूर्वक माहिती मिळाल्याने  सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील कर्मचारी बाळासाहेब डापकर,दिलीप गित्ते, अनिल मंदे, गोविंद मुंडे, तसेच  धारूर पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक विजय आटोळे,पोलीस कर्मचारी  जमीर शेख , वसंत भताने, कदम, धम्मा गायसमुद्रे, यांनी संयुक्तपणे कारवाई करत  28 किलो वजनाचा  1लाख 44हज

मधुकरराव खंडेराव देशपांडे यांचे निधन

इमेज
  मधुकरराव खंडेराव देशपांडे यांचे निधन परळी वैजनाथ/ प्रतिनिधी मधुकरराव खंडेराव देशपांडे रा.अंबेवेस यांचे गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समय ते 85 वर्ष वयाचे होते. मधुकरराव खंडेराव देशपांडे यांचे काल गुरुवारी निधन झाले.  मधुकरराव देशपांडे हे अत्यंत मनमिळाऊ व सुस्वभावी असल्याने सर्व परिचित होते. श्री वैजनाथ मंदिर येथे गेल्या अनेक वर्षांपासून ते पूजा विधि करीत असत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय होणार हायटेक!

इमेज
  पालकमंत्री धनंजय मुंडेंची आणखी एक शब्दपूर्ती! बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारत बांधकामाच्या 60 कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकारी कार्यालय होणार हायटेक! मुंबई (दि. 12) - बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याच्या विकासात भर टाकण्यासाठी दिलेल्या आणखी एका शब्दाची पूर्ती केली असून, बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारत बांधकामाच्या सुमारे 60 कोटी रुपयांच्या आराखड्यास महसूल विभागाने आज प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून, याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांनी मागील आघाडी सरकारच्या काळात बीड जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत नव्याने बांधण्याचा प्रस्ताव समोर आणला होता. या कामाच्या प्रस्तावास छत्रपती संभाजी नगर येथे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. कामाची रक्कम 15 कोटींपेक्षा जास्त असल्याने सदर प्रस्ताव मान्यतेसाठी उच्चस्तरीय समितीकडे पाठवण्यात आला होता. समितीने या स्थापत्य कामाचा दर व अन्य बाबी तपासून 59 कोटी 61 लक्ष रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली आहे.  छत्रपती संभाजी नगर येथे मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामाच्या अमृत महो

मराठा कुणबी, कुणबी- मराठा, कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र : समिती बीड जिल्हा दौर्‍यावर

इमेज
  मराठा कुणबी, कुणबी- मराठा, कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र : समिती बीड जिल्हा दौर्‍यावर आपल्याकडील पुरावे,दस्ताऐवज परळी उपविभागीय कार्यालयात सादर करण्याचे आवाहन परळी वै. तालुक्यातील सर्व नागरीकांना जाहिर आवाहान करण्यात येते की, मराठा कुणबी, कुणबी- मराठा, कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देणेबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठीत समितीचे अध्यक्ष न्या. संदिप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य यांचा बीड जिल्हा दौरा दिनांक 23.10.2023 रोजी सकाळी 11.00 वाजता मा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे नियोजीत आहे.           त्याअनुषंगाने परळी वै.. तालुक्यातील नागरीकांनी त्यांचेकडे मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी जातीचे उल्लेख असलेले उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणीक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्ताऐवज ई. दस्ताऐवज असतील तर सदर दस्ताऐवज समितीस उपलब्ध करून देणेसाठी तहसील कार्यालय परळी वै. अथवा उपविभागीय कार्यालय परळी वै. येथे दाखल करावे. जेणेकरून सदर दस्ताऐवज प्रस्तुत समितीस उपलब्ध करून देता येईल.         तसेच प

महोत्सवाची पूर्वतयारी पूर्ण,

इमेज
  रविवारपासून श्री योगेश्वरी देवीच्या दसरा महोत्सवास प्रारंभ महोत्सवाची पूर्वतयारी पूर्ण; दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विविध सेवा सुविधा अंबाजोगाई  -  महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीचा दसरा महोत्सव १५ ऑक्टोबर  ते २४ ऑक्टोबर  या कालावधीत साजरा होणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भरगच्च उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवाची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. अशी माहिती श्री. योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव अँड.शरद लोमटे यांनी दिली.                  श्री योगेश्वरी देवीच्या दसरा महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात रंगरंगोटी व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी व सुविधा योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रविवारी सकाळी १० वाजता घटस्थापनेने दसरा महोत्सवास प्रारंभ होणार आहे. यानंतर सलग नऊ दिवस भाविकांसाठी दुपारी १ते रात्री १० वाजेपर्यंत दररोज संगीत भजन,कीर्तन, प्रर्वचन,संगीत गायन असे विविध उपक्रम आयोजित  करण्यात आले आहेत. तर २४ आॅक्टोबर मंगळवारी दुपारी १२.१५ वाजता दसऱ्याच्या