मराठा कुणबी, कुणबी- मराठा, कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र : समिती बीड जिल्हा दौर्‍यावर

 मराठा कुणबी, कुणबी- मराठा, कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र : समिती बीड जिल्हा दौर्‍यावर



आपल्याकडील पुरावे,दस्ताऐवज परळी उपविभागीय कार्यालयात सादर करण्याचे आवाहन


परळी वै. तालुक्यातील सर्व नागरीकांना जाहिर आवाहान करण्यात येते की, मराठा कुणबी, कुणबी- मराठा, कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देणेबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठीत समितीचे अध्यक्ष न्या. संदिप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य यांचा बीड जिल्हा दौरा दिनांक 23.10.2023 रोजी सकाळी 11.00 वाजता मा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे नियोजीत आहे.
          त्याअनुषंगाने परळी वै.. तालुक्यातील नागरीकांनी त्यांचेकडे मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी जातीचे उल्लेख असलेले उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणीक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्ताऐवज ई. दस्ताऐवज असतील तर सदर दस्ताऐवज समितीस उपलब्ध करून देणेसाठी तहसील कार्यालय परळी वै. अथवा उपविभागीय कार्यालय परळी वै. येथे दाखल करावे. जेणेकरून सदर दस्ताऐवज प्रस्तुत समितीस उपलब्ध करून देता येईल.
        तसेच परळी वै. तालुक्यामध्ये मराठा-कुणबी अथवा कुणबी-मराठा, कुणबी या जातीचे जात प्रमाणपत्र सन 2018 ते सन 2023 पर्यंत या कार्यालयाकडुन अथवा महा ई सेवा केंद्र चालक यांचे मार्फत निर्गमित झाले असेल तर त्या व्यक्तींनी दिनांक 23.10.2023 पुर्वी या कार्यालयाकडे खातरजमा करणेसाठी या कार्यालयात घेवून यावे. असे आवाहन उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार