परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

देवीची घटस्थापना विधिवत होणार; विजया दशमीच्या दिवशी दुष्ट प्रवृत्तीच्या रावणाचे दहन

 यंदाचा दुर्गोत्सव साधेपणाने साजरा करणार - फुलचंद कराड

देवीची घटस्थापना विधिवत होणार; विजया दशमीच्या दिवशी दुष्ट प्रवृत्तीच्या रावणाचे दहन


बालयोगी भागवताचार्य ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या किर्तनाचे आयोजन


परळी (प्रतिनिधी)

श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केला जाणारा दुर्गोत्सव दुष्काळी पार्श्वभूमी लक्षात घेता यंदा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. रविवारी देवीची घटस्थापना केली जाणार असून, विजया दशमीच्या दिवशी वाईट विचार आणि दुष्ट प्रवृत्तीच्या रावणाचे दहन केले जाणार आहे. त्याच बरोबर समाज प्रबोधन व्हावे यासाठी बालयोगी भागवताचार्य ह.भ. प.हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष फुलचंद कराड यांनी दिली. संपर्क कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते उपस्थितांशी संवाद साधत होते.


फुलचंद कराड अध्यक्ष असलेल्या श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दुर्गोत्सव दणक्यात साजरा केला जातो. दरवर्षी मोंढा भागात देवीची घटस्थापना करून नऊ दिवस विविध स्वरूपाचे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. यंदा पावसाने दडी मारल्याने बळीराजा संकटात आहे. अशा कठीण काळात मोठे मोठे कार्यक्रम घेणे योग्य राहणार नाही. त्यामुळे यंदा हा दुर्गोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जाईल अशी माहिती फुलचंद कराड यांनी दिली. रविवार दि.१५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी फुलचंद कराड यांच्या कार्यालयासमोर देवीच्या विशाल मूर्तीची  घटस्थापना करण्यात येईल. नऊ दिवस विधिवत पूजा अर्चा चालणार आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही वाईट प्रवृत्तीच्या रावणाचे दहन केले जाणार असून, विजया दशमीच्या दिवशी तोतला मैदान येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकप्रबोधन व्हावे यासाठी दि.१९ ऑक्टोबर रोजी रात्री ८.००वाजता बालयोगी भागवताचार्य ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्री संत भगवानबाबा दुर्गोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष फुलचंद कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!