इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

पंकजाताई मुंडे यांचा दसरा मेळाव्याचा टीझर जारी

 मी येत आहे, आपल्या दसऱ्यासाठी..२४ ऑक्टोबरला भेटूया..आपल्या भगवान भक्तीगडावर सिमोल्लंघनाला!


पंकजाताई मुंडे यांचा दसरा मेळाव्याचा टीझर जारी


सावरगांवच्या ग्रामस्थांनी दिले मेळाव्याचे निमंत्रण


बीड ।दिनांक १६।

दरवर्षी दसरा मेळाव्याचं निमंत्रण देता.. आताही मिळालयं, मी येत आहे, आपल्या  दसर्‍यासाठी.. माझी भक्ती आणि तुमची शक्ती तिथे आपल्याला यायला भागच पाडेल. २४ ऑक्टोबरला भेटूयात, आपल्या भगवान भक्तीगडावर सिमोलंघनासाठी...! भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा सावरगांवच्या दसरा मेळाव्याचा  टीझर जारी झाला आहे.


   हा व्हिडिओ पंकजाताई मुंडे यांच्या अधिकृत यूट्युबवर जारी झाला असून त्यात त्यांनी सावरगांवच्या भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. पंकजाताईंनी म्हटलं आहे की, मेळाव्याला यायला तुम्ही

चारचाकी घेता, दोन चाकी घेता, सायकल घेता, बैलगाडी घेता, नाही तर रान तुडवत येता.. पण येताच...!

लेकरांचा हात धरता,कोणाला काखेवर घेता, बायाबापड्या निघता, म्हातारे कोतारे माणसं, तरुण पोरं  सगळे निघता... दसर्‍याला सर्वांची पावले वळतात ती भगवान भक्तीगड सावरगावकडे.. ही दसर्‍याची परंपरा तुम्हीच निर्माण केली. तुम्हीच याला जन्म दिला, याला मोठं केलं, आणि याची शक्ती वरचेवर वाढवली.


  प्रत्येक वर्षी मागच्या वर्षी पेक्षा जास्त लोकं, जास्त उत्साह, जास्त प्रेम, जास्त शक्ती केवढं मोठं भाग्य आहे. मलाही निमंत्रण देता.. आताही मिळालयं, मी येत आहे आपल्या  दसर्‍यासाठी माझी भक्ती आणि तुमची शक्ती तिथे आपल्याला यायला भागच पाडेल. २४ ऑक्टोबरला भेटूयात, आपल्या भगवान भक्तीगडावर सिमोलंघनासाठी...!

••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!