इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

आशा व गटप्रर्वतकांचा १८ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा

 आशा व गटप्रर्वतकांचा १८ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     आशा व गटप्रर्वतकांनी १८ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला असुन परळी तालुका आरोग्य अधिकारी यांना याबाबत संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

          कृती समितीच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक या येत्या १८ ऑक्टोबर २०२३ पासून आपल्या मागण्यांच्यासाठी बेमुदत संपावर जात आहेत. १. गटप्रवर्तकांचे कायम कर्मचारी म्हणून समायोजन करा. २. आशा व गटप्रवर्तक यांच्यावरील ऑनलाईन कामाची सक्ती बंद करा.३. आशा व गटप्रवर्तक यांना दिवाळी बोनस द्या.४. आशा व गटप्रवर्तक यांना केंद्र सरकारने मानधनात वाढ करावी.५. सप्टेंबर २०२३ चे मानधन देण्यात यावे.६. जुलै २३ ते सप्टेंबर २३ चे वाढीव मानधन देण्यात यावे.७. आभा कार्डचे मानधन देण्यात यावे.८. आरोग्य वर्धीनीचे मानधन देण्यात यावे.९. केंद्र सरकारचा कोवीड भत्ता ऑक्टोंबर २१ ते मार्च २२ चे सहा महिण्याचा १०००/-- प्रमाणे ६०००/- देण्यात यावे..या मागण्यांच्यासाठी महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने संपावर जात आहेत १८ ऑक्टोबर आगोदर सरकारने या मागण्यांच्या वर विचार करून संघटनेच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलवावे अन्यथा ठरल्याप्रमाणे १८ ऑक्टोबर २०२३ पासून परळी तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक या बेमुदत संपावर जातील असा इशारा देण्यात आला आहे.

       या निवेदनावर संघटनेचे आशा लांडगे,किरण सावजी,सुवर्णा रेवले, हेमा काळे,उमा सौदागर वाघमारे,वर्षा राठोड, सावित्रा कम मंगल व्हावळे,आशा पांचाळ,राजश्री थावरे, वर्षा गायकवाड, रेखा वाघमारे,निर्मला केंद्रे  ज्योती जगताप,मीरा मुळे,रुक्मीनी भुतके,वनिता मुक्तेश्वर होटेगावकर, अर्चना कोल,मुक्ता दहिफळे,सुवर्णा मुंडे,राधा आल ,देवकते संगीता, अनुराधा तुकाराम केंद्रे,सविता कृष्णा मुंडे, अणिता गिराम,छाया रणदिवे, जिजाबाई दहिफळे,सरला मैड,पुजा वाघमारे,सुमित्रा शिंदे,सुरेखा भिसे ,सुनिता अंगद होळंबे उषा देविदास राठोड , सगिता रमेश राठोड  आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या