महोत्सवाची पूर्वतयारी पूर्ण,

 रविवारपासून श्री योगेश्वरी देवीच्या दसरा महोत्सवास प्रारंभ




महोत्सवाची पूर्वतयारी पूर्ण;दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विविध सेवा सुविधा


अंबाजोगाई  -  महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीचा दसरा महोत्सव १५ ऑक्टोबर  ते २४ ऑक्टोबर

 या कालावधीत साजरा होणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भरगच्च उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवाची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. अशी माहिती श्री. योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव अँड.शरद लोमटे यांनी दिली. 

                श्री योगेश्वरी देवीच्या दसरा महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात रंगरंगोटी व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी व सुविधा योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रविवारी सकाळी १० वाजता घटस्थापनेने दसरा महोत्सवास प्रारंभ होणार आहे. यानंतर सलग नऊ दिवस भाविकांसाठी दुपारी १ते रात्री १० वाजेपर्यंत दररोज संगीत भजन,कीर्तन, प्रर्वचन,संगीत गायन असे विविध उपक्रम आयोजित 

करण्यात आले आहेत. तर

२४ आॅक्टोबर मंगळवारी दुपारी १२.१५ वाजता दसऱ्याच्या  दिवशी श्री योगेश्वरी देवीची पालखी सिमोल्लंघनासाठी निघणार आहे. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने ठेवण्यात आलेल्या या सर्व उपक्रमास भाविकांनी प्रतिसाद नोंदवावा. असे आवाहन योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

---------

व्यवस्थापनाची झाली बैठक -: 

 श्री. योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार तथा योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष विलास तरंगे, सचिव  अ‍ॅड.शरद लोमटे , मुख्य पुजारी सारंग पुजारी, विश्वस्त राजकिशोर मोदी, अक्षय मुंदडा, पृथ्वीराज साठे, कमलाकर चौसाळकर,  गिरीधारीलाल भराडिया, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, डॉ.संध्या जाधव, गौरी जोशी, पूजा कुलकर्णी, यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.  त्यानुसार मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा उपाययोजना आखण्यात आल्या. परिसरातील स्वच्छता व विविध सोयीसुविधा भक्तांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे देवल कमिटीचे सचिव .अ‍ॅड.शरद लोमटे यांनी सांगितले. 

---------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !