कार्यकारणी जाहीर

 स्वराज्य जननी दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी आबासाहेब देशमुख यांची निवड




परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...


       शहरातील देशमुख गल्ली भागातील स्वराज्य जननी दुर्गोत्सव मंडळाची एक व्यापक बैठक या भागातील नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत स्वराज्य जननी दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी आबासाहेब देशमुख  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


    येथील देशमुख गल्ली भागातील स्वराज्य जननी दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने  आदिमाया, आदिशक्तीचा नवरात्रोत्सव अतिशय भक्ती भावाने साजरा केला जातो.  नवरात्र उत्सव दरम्यान सांस्कृतिक तसेच विधायक कार्यक्रमांमुळे आनंदी वातावरण असते. नुकतीच नवरात्र महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात  येथील स्वराज्य जननी दुर्गोत्सव मंडळाची एक व्यापक बैठक घेण्यात येऊन तीत दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी  आबासाहेब देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


       यावेळी नवरात्री महोत्सवा दरम्यान स्वराज्य जननी दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने भागातील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक तसेच विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे दुर्गोत्सव मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आबासाहेब देशमुख यांनी सांगितले. याप्रसंगी मंडळाचे श्याम देशमुख, निवृत्ती देशमुख, गणेश देशमुख, नारायण देशमुख, दिनेश पारेकर,विजय देशमुख, सुजित देशमुख, लखन पारेकर, साई देशमुख, अमोल देशमुख, सागर बुंदेले,पनू जठार, ऋषी देशमुख, जगन्नाथ गावडे, वैभव लोखंडे, शंकर लोखंडे आदीसह भागातील प्रतिष्ठित नागरिक तथा मान्यवरांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!