पोलीसांची बेधडक कारवाई

गांजाची शेती : 28 किलो गांजा जप्त 



पंकज कुमावत - धारूर पोलीस स्टेशनची कारवाई

धारूर, एमबीृ न्युज वृत्तसेवा

धारूर तालुक्यातील पिंपळवाडा शिवारात  12 ऑक्टोबर गुरुवार रोजी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व पोलीस ठाणे धारूर यांची संयुक्त कारवाई करत अवैध गांजाची 28 किलो वजनाचा 1 लाख 44 हजार 520 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी लक्ष्मण तिडके यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

   तालुक्यातील पिंपळवाडा येथे गांजाची शेती करत असल्याची माहिती पंकज कुमावत यांना गुप्त खबऱ्याच्या द्वारे मिळाली की पिंपरवाडा शिवारात  लक्ष्मण जयवंत तिडके रा. भोगलवाडी हा स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीर रित्या गांजाची झाडे लावून त्याचे संवर्धन करून जोपासना करीत आहे.अशी खात्रीपूर्वक माहिती मिळाल्याने  सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील कर्मचारी बाळासाहेब डापकर,दिलीप गित्ते, अनिल मंदे, गोविंद मुंडे, तसेच  धारूर पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक विजय आटोळे,पोलीस कर्मचारी  जमीर शेख , वसंत भताने, कदम, धम्मा गायसमुद्रे, यांनी संयुक्तपणे कारवाई करत  28 किलो वजनाचा  1लाख 44हजार 520 रुपये किमतीचा  गांजा या कारवाई मध्ये जप्त करण्यात आला. असून आरोपी  लक्ष्मण जयवंत तिडके याचे विरुद्ध NDPS  कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय आटोळे करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !