जिल्हाधिकारी कार्यालय होणार हायटेक!

 पालकमंत्री धनंजय मुंडेंची आणखी एक शब्दपूर्ती!

बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारत बांधकामाच्या 60 कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता


जिल्हाधिकारी कार्यालय होणार हायटेक!


मुंबई (दि. 12) - बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्याच्या विकासात भर टाकण्यासाठी दिलेल्या आणखी एका शब्दाची पूर्ती केली असून, बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारत बांधकामाच्या सुमारे 60 कोटी रुपयांच्या आराखड्यास महसूल विभागाने आज प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून, याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.


धनंजय मुंडे यांनी मागील आघाडी सरकारच्या काळात बीड जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत नव्याने बांधण्याचा प्रस्ताव समोर आणला होता. या कामाच्या प्रस्तावास छत्रपती संभाजी नगर येथे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. कामाची रक्कम 15 कोटींपेक्षा जास्त असल्याने सदर प्रस्ताव मान्यतेसाठी उच्चस्तरीय समितीकडे पाठवण्यात आला होता. समितीने या स्थापत्य कामाचा दर व अन्य बाबी तपासून 59 कोटी 61 लक्ष रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली आहे. 


छत्रपती संभाजी नगर येथे मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय हे राज्य सरकारने केवळ घोषणेपूरते मर्यादित नसून, ते प्रत्यक्षात उतरत आहेत, हे राज्य सरकारने धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आलेल्या या आणखी एका निर्णयातून सिद्ध केले आहे.


दरम्यान एकात्मिक पायाभूत विकास साधत असताना जिल्ह्याची प्रमुख कचेरी म्हणून ओळख असलेले जिल्हाधिकारी कार्यालय सुसज्ज व सर्व सुविधायुक्त असावे, या दृष्टीने या इमारतीचे काम पूर्ण केले जावे, असे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 


मागच्याच आठवड्यात बीड येथील प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. बीड जिल्ह्यात प्रथमच सोयाबीन संशोधन व प्रक्रिया केंद्र उभारण्यास देखील मान्यता मिळाली आहे. त्याआधी कृषी भवन उभारण्यास 14 कोटी, त्याचबरोबर परळी तालुक्यात शासकीय कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय उभारणीच्या कामांनाही मान्यतेसोबतच आता गती मिळताना दिसत आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निवडीनंतर आगामी 16 तारखेला जिल्हा नियोजन समितीची बैठक अयोजिलेली असून, या माध्यमातून देखील जिल्ह्यातील अनेक प्रस्तावित कामांना निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !