जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळ कार्यकारणी

 जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रविराज जाधव उपाध्यक्षपदी संतोष साखरे तर सचिव पदी स्वप्नील सुरवसे यांची निवड


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...


       शहरातील फुले चौक,  भागातील जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाची एक व्यापक बैठक मुख्य मार्गदर्शक वैजनाथराव सोळंके, रमेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रविराज जाधव, उपाध्यक्षपदी संतोष साखरे तर सचिव पदी स्वप्निल सुरवसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


        येथील फुले चौक भागातील जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने  आदिमाया, आदिशक्तीचा नवरात्रोत्सव गेल्या 34 वर्षापासून अतिशय भक्ती भावाने अविरतपणे साजरा केला जातो.  नवरात्र उत्सव दरम्यान सांस्कृतिक तसेच विधायक कार्यक्रमांमुळे आनंदी वातावरण असते. नुकतीच नवरात्र महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात  येथील जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाची एक व्यापक बैठक घेण्यात येऊन तीत जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी  रविराज जाधव, उपाध्यक्षपदी संतोष साखरे कार्याध्यक्षपदी नितीन झिरपे, तर सचिवपदी स्वप्निल सुरवसे, कोषाध्यक्षपदी बळीराम साखरे, सहसचिव पदी उमंजय जाधव, सहकोशाध्यक्ष अशोक सरवदे, अभिलाष साखरे, तर व्यवस्थापक पदी योगेश साखरे, दत्ता सुरवसे, रोहित भाग्यवंत, चैतन्य पानखडे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.


       यावेळी नवरात्री महोत्सवा दरम्यान जय महाराष्ट्र दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने फुले चौक भागातील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक तसेच विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याप्रसंगी मंडळाचे सदस्य सुरेश साखरे, तुकाराम वाकडे, दिनेश परळीकर, महादेव जाधव, नरहरी सुरवसे, दिनेश परळीकर, पांडुरंग जाधव, दीपक देशमुख, गणेश क्षिरसागर, गणेश देशमुख, गणेश नाईकवाडे, महेश खरोळकर, एकनाथ साखरे, वैभव देशमुख, महादेव पानखडे, गजानन पानखडे, योगेश पानखडे, राजेश सुरवसे, राहुल सुरवसे, पवन सुरवसे, हरीश साखरे, ओमकार जाधव, महेश साखरे, ऋषी कदम, सिद्धेश्वर कदम, अशोक सरवदे, योगेश साखरे, पवन साखर,विकास कदम, आदींसह विविध मान्यवर प्रतिष्ठित नागरिक तसेच भाविक भक्तांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार