इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

समाज तुमच्या पाठीशी कुटुंबाला उघड्यावर पडू देणार नाही - मनोज जरांगे पाटील

 आंतरवाली येथील सभे दरम्यान गेवराईच्या तरुणाचा उष्मघाताने मृत्यू ; अंत्यविधीला उपस्थित राहून जरांगे पाटीलांची श्रद्धांजली

------------------------------

गेवराई/ एमबी न्युज वृत्तसेवा 

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे काल दि. १४ ऑक्टोबर रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची विराट जाहीर सभा संपन्न झाली. या सभेसाठी पायी गेलेल्या गेवराईतील एका 36 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच जरांगे पाटील हे अंत्यविधीला उपस्थित राहुल श्रद्धांजली अर्पण केली.

विलास शिवाजीराव पवार (वय ३५) असे मयताचे नाव आहे. मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे यासाठी १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटा येथे जाहीर सभा संपन्न झाली या सभेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. दरम्यान या सभेसाठी गेवराई येथील विलास शिवाजीराव पवार हा तरुण शहागड येथून पायी गेला होता. याठिकाणी त्याला जास्त प्रमाणात उलटीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्याने छोटा भाऊ गणेश याला कॉल करून माहिती दिली. यानंतर तातडीने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले.  मात्र गाड्यांच्या गर्दीने रुग्णालयात पोहचायला उशीर झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.

 त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि तीन मुली असा मोठा परिवार आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मनोज जरांगे पाटील यांनी अंत्यविधीला उपस्थित राहून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत श्रद्धांजली अर्पण केली.


समाज तुमच्या पाठीशी कुटुंबाला उघड्यावर पडू देणार नाही - मनोज जरांगे पाटील

---------------------

काल झालेल्या सभे दरम्यान उष्मघाताने गेवराई येथील तरुण विलास पवार यांच्या मृत्यूची बातमी रात्री उशिरा कळल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या अंत्यविधी बाबत माहिती घेऊन सकाळी 11 वाजता गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत अंत्यविधीला उपस्थित राहिले. यानंतर त्यांनी पवार यांच्या घरी जाऊन विलास पवार यांच्या पत्नी व तीन मुली व कुटुंबियांची विचारपूस केली. तो फक्त तुमचा मुलगाच नसून माझा भाऊ होता असे समजून त्याला सर्वतोपरी मदत मिळवून देऊ, आपला समाज खूप मोठा आहे. या तीन मुलीचे शिक्षण व रक्षण ही समाजाची जबादारी असून आपला समाज तुमच्या कुटुंबियांना कधीच उघड्यावर पडू देणार नाही असे सांगून विलास यांचा छोटा भाऊ, आई, पत्नी व तीन मुलींसह सर्व परिवाराचे सांत्वन करत श्रद्धांजली अर्पण केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!