इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या दुर्गोत्सवात फुलचंद कराड यांच्या हस्ते देवीची घटस्थापना

 दुष्काळाचे सावट दुर होऊ दे, बळीराजा समृद्ध होऊ दे-फुलचंद कराड





श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या दुर्गोत्सवात फुलचंद कराड यांच्या हस्ते देवीची घटस्थापना


परळी प्रतिनिधी

श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केल्या जाणाऱ्या दुर्गोत्सवात श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष फुलचंद कराड यांच्या हस्ते विधीवत महाआरती करुन घटस्थापना करण्यात आली. 22 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बालयोगी भागवताचार्य ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगावकर यांचे सुश्राव्य कीर्तन  होणार आहे. नऊ दिवस विधिवत पूजाअर्चा व वाईट प्रवृत्तीच्या रावणाचे विजया दशमीच्या दिवशी दहन कार्यक्रम होणार आहे. याचा सर्व भाविक नागरिकांनी  लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत भगवानबाबा दुर्गोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष फुलचंद कराड यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी बळीराजा वरील दुष्काळाचे आलेले संकट दूर होऊ दे असे देवीला साकडे घातले.


दुष्काळी पार्श्वभूमी लक्षात घेता यंदा अत्यंत साधेपणाने दुर्गोत्सव साजरा करण्याचे श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या वतीने ठरविण्यात आले आहे. श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष फुलचंद कराड यांच्या हस्ते विधीवत महाआरती करुन आरादी ,भजनी मंडळी महिला, परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी  घटस्थापना करण्यात आली. याप्रसंगी श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष फुलचंद कराड यांनी मातेला साकडे घातले की, दुष्काळाचे हे सावट दुर होऊ दे, बळी राजा समृद्ध येऊ दे अशी मनोकामना व्यक्त केल्या.याप्रसंगी अशोक भाला. सुनिल राठी, माऊली फड, चंदकात चाटे, पंडाले, नारायण फड, पुंडकरे, माने, हरीचा चाटे, भालचंद्र बदलणे, चप्पे, कोपनर, रवि कराड, प्रशांत कराड व नाथ नगर भागातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!