पोस्ट्स

पंकजा मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे सहभागी: पालखीही वाहिली

इमेज
महाशिवराञ: जिरेवाडीच्या प्रभु सोमेश्वराचा पालखी सोहळा वैद्यनाथाच्या भेटीला! पंकजा मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे सहभागी: पालखीही वाहिली परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        परळी वैजनाथ तालुक्यातील  जिरेवाडी येथील जागृत देवस्थान भगवान श्री सोमेश्वराचा पालखी सोहळा  मोठ्या ऊत्साहाने प्रभू वैद्यनाथाच्या भेटीला आला.या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत झाले. अनेक वर्षापासुनची परंपरा असलेला हा पालखी सोहळा अतिशय भव्यदिव्य स्वरुपात  निघाला.         या पालखी सोहळ्यात भजनी मंडळी, कलशधारी महीला, शाळकरी मुलांचे टिपरी, आणि लेझीमपथक यांसह गांवकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  सकाळी  सोमेश्वर मंदीर जिरेवाडी येथुन पालखीचे प्रस्थान होउन हा पालखी सोहळा जलालपुर  - शिवाजी चौक - एकमिनार चौक -    स्टेशनरोड -बाजार समिती - टॉवर - जगमिञ नागा मंदीर मार्गे वैद्यनाथ मंदीर येथे दुपारी पोहोचला.ठिकठिकाणी पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले तसेच भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.  दरम्यान माजी मंत्री पंकजा मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी पालखीत सहभागी होउन सोमेश्वराचे दर्शन घेतल

अंबाजोगाई नंतर गेवराईतही भगरीतून विषबाधा झाल्याची घटना :अनेकांची प्रकृती बिघडली

इमेज
  अंबाजोगाई नंतर गेवराईतही भगरीतून विषबाधा झाल्याची घटना :अनेकांची प्रकृती बिघडली गेवराई....          एकादशीच्या दिवशी दि.7मार्च फराळात भगर पिठाचे पदार्थ खाल्याने शहरातील काही भागात अनेकांची प्रकृती बिघडली. त्यांना विषबाधा झाल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. या बाधितांना गेवराई येथील सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.        प्राथमिक माहितीनुसार, बाधित 3 च्या आसपास आहेत.  एकादशी असल्याने भगर पिठाचे पदार्थ खाल्ले. यानंतर त्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी, हात पाय दुखणे, डोकेदुखी असा त्रास सुरू झाला. शहरातील सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.दिवसेंदिवस होत असलेल्या या घटनेमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 

सकाळी नऊ वाजता मुंबईत सुरू झालेला दिवस, मध्यरात्री नंतरही काम सुरूच

इमेज
  अन् धनंजय मुंडे पोचले मध्यरात्री दवाखान्यात! अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात भगरीतून विषबाधा झालेल्या रुग्णांच्या भेटीला मध्यरात्रीत पोहोचले मुंडे सकाळी नऊ वाजता मुंबईत सुरू झालेला दिवस, मध्यरात्री नंतरही काम सुरूच! अंबाजोगाई (दि.12) - मुंबईवरून आपले दिवसभराचे कामकाज आटोपून छत्रपती संभाजी नगर मार्गे बीड वरून महाशिवरात्री साठी परळी कडे निघालेले राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे अचानक मध्यरात्री अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात येऊन पोहोचले.  परळी मतदारसंघातील निरपणा या गावातील काही जणांना अन्नातून विषबाधा झाली असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले असल्याबाबतचे वृत्त समजतात धनंजय मुंडे यांनी आपला परळीच्या दिशेने निघालेला ताफा थेट अंबाजोगाई कडे वळवत, स्वाराती मध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या चौकशीसाठी मध्यरात्री येऊन भेट देत विचारपूस केली.  राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा दिवस आज सकाळी नऊच्या सुमारास सुरू झाला होता. दिवसभर विविध शासकीय कामकाज, बीड रेल्वे संदर्भातील

आज दैठणा येथे होणार अंत्यसंस्कार

इमेज
  दैठणा घाटचे सरपंच अशोक दादाराव गुट्टे यांचे  निधन आज दैठणा येथे होणार अंत्यसंस्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे दैठणा या गावचे सरपंच अशोक दादाराव गुट्टे यांचे हृदय विकाराने आज गुरूवारी ( दि. 7/3/2024 रोजी पुणे येथील एका खाजगी रुगणालयात निधन झाले. मृत्युसमयी ते 65 वर्षाचे होते.       दैठणा या गावचे तब्बल 15 वर्ष सरपंच राहिलेले अशोक गुट्टे आजारी असल्याने त्यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच  त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. अतिशय मनमिळाऊ आणि दिलखुलास स्वभाव असल्याने ते संपूर्ण परळी/अंबेजोगाई तालुक्यामध्ये सुपरीचीत होते. धार्मिक वृत्तीचे आणि राजकारण, समाजकारणामध्ये सक्रिय असल्याने त्यांचा तालुक्यामध्ये दांडगा संपर्क होता. अशोक गुट्टे हे संपूर्ण तालुक्यात सरपंच या नावाने ओळखले जात असत. त्यांच्या निधनाने दैठणा गाव आणि परीसरात  मध्ये शोककळा पसरली आहे. कै. अशोक गुट्टे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, चार भाऊ, पाच बहिणी, सुना-नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.      कै. अशोक गुट्टे यांच्या पार्

ज्येष्ठ नागरिकांना मुद्दत संपलेल्या ठेवी एक रक्कमी द्या- अनिल बोर्डे

इमेज
  ज्येष्ठ नागरिकांना मुद्दत संपलेल्या ठेवी एक रक्कमी द्या- अनिल बोर्डे                   गेवराई:- ज्येष्ठ नागरिकांनी गेवराई शहरातील सर्व मल्टीस्टेट व पतसंस्था यामध्ये भवितव्यासाठी गुंतवणूक केलेली आहे सदरील मुदत संपल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना एक रक्कमी रक्कम मिळावी यासाठी गेवराई तहसील कार्यालय येथील श्री संजय जी सोनवणे नायब तहसीलदार गेवराई यांच्याकडे याबाबत बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन प्रमुख अनिल बोर्डे यांनी केलेली आहे त्याची प्रत माननीय जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आली आहे.                      गेवराई शहरांमध्ये मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी व पतसंस्था यांच्याकडे बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केलेली आहे परंतु मुद्दत ठेवीची मुदत संपल्यानंतर पूर्ण रक्कम मल्टी स्टेट करून न देता ठराविक रक्कम दिली जाते त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागत आहे ही बाब गंभीर आहे व त्यांच्या गरजा पूर्ण होत नाही याप्रकरणी लक्ष  पुरवावे अशी मागणी करण्यात आली आहे.                     ज्येष्ठ नागरिक हे भवितव्यासाठी वैद्यकीय खर्चासाठी

महाशिवरात्री निमित्त राधाताई महाराज यांचे कीर्तन

इमेज
  महाशिवरात्री निमित्त राधाताई महाराज यांचे कीर्तन       पाटोदा /प्रतिनिधी              पाटोदा शहराचे ग्रामदैवत श्री भामेश्र्वर  मंदिर येथे आज दिनांक 8 मार्च रोजी सायंकाळी 9 ते 11 महाशिवरात्री व संताजी महाराज पुण्यतिथी  निमित्ताने महंत ह.भ.प . राधाताई महाराज सानप ( श्री आईसाहेब देवस्थान महासांगवी) यांचे अमृततुल्य कीर्तन होणार आहे.       गेल्या 26 वर्षापासून दरवर्षी भामेश्वराची सेवा म्हणून राधाताई न चुकता महाशिवरात्रीला भामेश्र्वर  मंदिर येथे  कीर्तन सेवा करत आहेत . तसेच रात्री ठीक बारा वाजता ब्रह्मवृंदाच्या वतीने भामेश्र्वराची महापूजा होईल . दोन मार्च पासून भक्ती दीदी आळंदी यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा सुरू आज शुक्रवारी कथेची सांगता आहे .  शनिवारी 9 मार्च  रोजी सकाळी 9 ते 11 संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भामेश्र्वर मंदिर पर्यंत  संताजी प्रतिमेची सवाद्य मिरवणूक निघणार आहे त्यानंतर 11ते 1 ह.भ प.भक्ती दीदी आळंदी यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर  महाप्रसाद होऊन  महाशिवरात्री व संताजी पुण्यतिथी सोहळ्याची सांगता होणार तरी भाविकांनी मोठ्या संख्येने

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने

इमेज
  प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने महाशिवरात्री निमित्त परळीत प्रथमच बर्फाचे शिवलिंग अमरनाथजींचे दर्शन परळी वैजनाथ/प्रतिनिधी महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी सकाळी 6  ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रथमच बर्फाचे शिवलिंग अमरनाथजींचे दर्शनाचा लाभ घेता येणार असून या दर्शनाचा लाभ परळी शहर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठया संख्येने घ्यावा असे आवाहन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय परळी यांच्या वतीने करण्यात आले आहे. परळी शहरात पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे मंदिर असून महाशिवरात्रीचे औचित्य साधून परळी वैजनाथ येथील पंचवटीनगर, जुने पावर हाऊसच्या समोर, वैद्यनाथ मंदिर रोड येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत बर्फाचे शिवलिंग  अमरनाथजींचे दर्शन भाविक भक्तांना घेता येणार आहे.  दरम्यान सकाळी 8 व सायंकाळी 7 वाजता आरती होणार आहे. या दर्शनाचा लाभ परळी शहर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठया संख्येने घ्याव

महाशिवरात्री विशेष लेख

इमेज
  महाशिवरात्री विशेष :-  जाणून घ्या भगवान शिवाच्या हजारो नावांचा महिमा! गुरुदेव श्री आशुतोष महाराज जी (संस्थापक एवं संचालक, दिव्य ज्योति जाग्रति संस्थान)                'महाशिवरात्री' हा सण संपूर्ण भारतात श्रद्धेचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भक्तगण शिवमंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि धूप, दिवा, बेलची पाने, पंचामृत इत्यादी नैवेद्यांसह शिवलिंगांची पूजा करतात.  दरवर्षी आपण त्याच पारंपारिक पद्धतीने ‘महाशिवरात्री’ साजरी करतो आणि खूप आनंदी होतो.  पण या सणाच्या थाटात आपल्याला या उत्सवाचा सूक्ष्म आणि खरा सूर ऐकायला मिळत नाही. भगवान शिव आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक पैलूमध्ये एक रहस्यमय घटक, एक मार्मिक प्रेरणा आहे, जी आपल्याला बाह्य जगाशी नाही तर आंतरिक जगाशी जोडते.                  महाशिवरात्रीचा सण आपल्यासमोर मूळ प्रश्न घेऊन येतो - देवाधिदेव भगवान शंकर कुठे सापडतील?  शिवमंदिरात?  पॅगोडामध्ये?  अमरनाथवर?  काशीत?  आमच्या भोळ्या बाबांना शोधायला कुठे जायचे?  काय करायचं?  हे देखील शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला भगवान शिवाच्या हजार नावांपैकी काही विशेष दैव

नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत गुरुकृपा मेट्रो ब्रेन अबॅकस सोनपेठ चे सुयश

इमेज
  नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत गुरुकृपा मेट्रो ब्रेन अबॅकस सोनपेठ चे सुयश  सोनपेठ........ मेट्रोबेन अबॅकस च्या मार्फत घेण्यात आलेली सहावी नॅशनल लेवल अबॅकस परीक्षा २५ फेब्रुवारी 2024 रोजी लातूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या कंपनी अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात 400 शाखा आहेत गुरुकृपा मेट्रोबेन अबॅकस सोनपेठच्या संचालिका सौ पूजा ज्ञानेश्वर पवार यांना टॉप परफॉर्मन्स ऑफ द इयर 2024 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गुरुकृपा मेट्रोबेन अबॅकस मधील अभिराज तिडके झेड लेवल राज्यात प्रथम अर्णव कराळे मधून राज्यात द्वितीय दिव्या वानरे झेड लेवल मधून राज्यात तृतीय विवेक हि के झेड लेवल मधून राज्यात तृतीय आला आहे.  अथर्व पवार, यथार्थ पवार, वैष्णवी पवार, सिद्धी जयतपाल, कृष्णा धोंडगे, राजनंदिनी धोंडगे, मनीषा देसाई, विक्रांत देसाई, वसुंधरा सोळंके, स्वरा सोलव, सोहम स्वामी, वृषाली रंजवे, नंदिनी शिंदे ,अथर्व हिके, स्वरांगी पांचाळ, गायत्री वानरे, गायत्री फड, नम्रता गीते, मेघना घुले, राम राठोड व वासू पांडेवार या सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी मेडल व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल संचालिक

बिबट्याचे दर्शन ! शेतकरी भयभीत

इमेज
  बिबट्याचे दर्शन !  शेतकरी भयभीत आष्टी ...... तालुक्यातील धानोरा येथे दिवसाढवळ्या शेतात बिबट्या आढळून आल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. तर अनेक वेळा बिबट्या आढळून देखील वनविभागाकडून कसलीच उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. पाहणीचा देखावा करणारा वनविभाग नेमका करतोय काय? असा प्रश्न गावांतून उपस्थित केला जात असून दिवसाढवळ्या बिबट्याने धानोराकरांना दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धानोरा येथील गायकवाड मळा या शेतात बुधवारी भर दुपारी बिबट्या आढळून आला. यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या. दोन दिवसांपूर्वी नांदूर विठ्ठलाचे येथे एक बिबट्या आढळून आला होता.हा बिबट्या तोच असल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी कॅमेऱ्यात कैद झालेला बिबट्या नांदूर विठ्ठलाचे या परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्या आढळून आला होता. काही तरुणांनी कॅमेऱ्यात त्याचे चित्रीकरण केले. दरम्यान, नांदूर विठ्ठलाचे, धानोरा परिसरात बिबट्या आ

_आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन देणार निवेदन

इमेज
  वाण धरणातील पाणी नदीपात्रात सोडावे-फुलचंद कराड आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन देणार निवेदन परळी (प्रतिनिधी)  नागापुर येथील वाण धरणातील पाण्यावर परळी शहरासह तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असुन नदीपात्राशेजारील गावांना पिण्याचे व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वाण नदीपात्रात पाणी सोडावे अशी मागणी भगवान सेनेचे सरसेनापती तथा भाजपा जेष्ठ फुलचंद कराड यांनी केली आहे.   याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की नागापुर येथील वाण वाण धरणातील पाण्यावर परळी शहरासह तालुक्यातील 15 गावांना पाणीपुरवठा होत असतो.याबरोबरच या धरणातील पाण्यामुळे जनावरांची तहान भागत असते.सध्या वाण धरणात मुबलक पाणीसाठा असुन परिसरातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.वाण नदीपात्रात पाणी सोडले तर या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होवु शकतो.प्रशासनाने सध्या या धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे.यामुळे या धरणा तुन वाण नदीकाठच्या गावांना नदीपात्रातुन पाणी सोडावे यासाठी आज दि.7 मार्च रोजी शिष्टमंडळासह जिल्हाधिकार्यांची भेट घेवुन वास्तव परिस्थिती मांडणार असल्याचे
इमेज
  तिहेरी अपघातात अनेक जण जखमी  धोंडराई..... गेवराई -शेवगाव राज्य रस्त्यावरील धोंडराई कॅम्प येथे तिहेरी अपघात झाला आहे.आयशर टेम्पो, चारचाकी गाडी आणि बोलेरो पिक अप मध्ये हा अपघात झाला आहे.गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमापुर रोडवर मालवाहू आयशर टेम्पो चा स्टेरींग राॅड तुटल्याने समोरुन येणाऱ्या बोलेरो पिक‌‌‌अप व चारचाकी कारला धडक दिल्याने बोलेरो पिक‌‌‌अप पलटी झाला यामधील अंदाजे दहा ते बारा जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये लहान मुलांसह जेष्ठ नागरिकांचा सामावेश आहे.जखमींना गेवराई व बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.गेवराई कडुन उमापुर कडे जाणाऱ्या मालवाहू आयशर टेम्पोची समोरुन येणाऱ्या चारचाकी कार व पिक अप ला जबर धडक बसली यामध्ये दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर गेवराई पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले.जखमींना अपघातग्रस्त गाडीतुन बाहेर काढत त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी धोंडराई व धोंडराई कॅम्प परिसरातील विकास शिंदे, भागवत बरे,बालु साखरे,श्रिकांत गिते,अमोल गिते,अजय कदम,लल्लु जाधव,विलास शिंदे, यांच्या सह ग्रामस्थांनी मदत केली तर धोंडराई येथील सरपंच

१०० सीसीटीव्ही कॅमेरे, ३०० पोलीस व कडक सुरक्षाव्यवस्था

इमेज
  परळी वैजनाथ - महाशिवरात्री पर्व : जय्यत तयारी    १००  सीसीटीव्ही कॅमेरे, ३०० पोलीस व कडक सुरक्षाव्यवस्था परळी वैजनाथ, ......       महाशिवरात्र पर्वानिमित्त ज्योतिर्लिंग क्षेत्र प्रभू वैद्यनाथ मंदिरात दर्शनार्थी भाविकांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यासोबतच पूर्ण मंदिर परिसर सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून निगरानीत ठेवण्यात येत आहे. महाशिवरात्र पर्वकाळात परळीत सुमारे 5 लाख भाविक दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन तयारी करण्यात आली आहे. पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.          मंदिर परिसरासह शहरात पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. अभिषेक करणाऱ्यांसाठी स्वतंत्र रांग सुद्धा ठेवण्यात आली असून सुमारे 5 लाख भाविक वैद्यनाथ प्रभूंच्या दर्शनासाठी परळी शहरात हजेरी लावतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी महाशिवरात्री निमित्त वैद्यनाथ देवस्थान कमिटीने दर्शनार्थींसाठी स्त्री-पुरूष व पास धारक अशा तीन स्वतंत्र रांगा ठेवल्या आहेत. मंदिराच्या पायऱ्यावर भव्य मंडप उभारण्यात आला असून नागमोड

फुले अमृतकाळ मोबाईल प्रणालीचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण

इमेज
  बदलत्या वातावरणात पशुधनाच्या काळजीसाठी कृषी विभागाचे शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप फुले अमृतकाळ मोबाईल प्रणालीचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण देशातील पहिले मोबाईल पशुसल्ला ॲप मुंबई दि 6 मार्च -  महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या देशातल्या पहिल्या 'फुले अमृतकाळ' या पशुसल्ला मोबाईल प्रणालीचे (ॲप) लोकार्पण आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.बाळासाहेब आजबे, आ. संग्राम जगताप, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू कर्नल डॉ. पी.जी. पाटील तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, वातावरणीय बदलामुळे पावसाने दिलेली ओढ, अतिवृष्टी, ढगफुटी, वाढते तापमान, उष्माघात व पावसाचा अकल्पित लहरीपणा अशा गोष्टी वारंवार घडत आहेत. त्यामुळे पशुधनास चारा व पाणी पुरविण्यावर तर परिणाम होतच आहे, पण पशुधनाच्या आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होत आहे.

श्री संत जगमित्रनागा मंदिरात महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात

इमेज
  श्री संत जगमित्रनागा मंदिरात महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात परळी वैजनाथ दि.०६ (प्रतिनिधी)              येथील श्री संत जगमित्रनागा मंदिरात महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात झाली असून मंगळवार (ता.०५) ते शनिवार (ता.०९) पर्यंत संपन्न होणार आहे.       दैनंदिन धार्मिक कार्यक्रमामध्ये पहाटे काकडा आरती, विष्णु सहस्त्रनाम,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन,भावार्थ रामायण,शिवलिला अमृत ग्रंथ,प्रवचन,भजन, धुप आरती, संध्याकाळी हरिकिर्तन आदि कार्यक्रम संपन्न होणार आहेत. हरिकिर्तना मध्ये मंगळवारी अँड दत्तात्रय महाराज आंधळे यांचे किर्तन संपन्न झाले. तर वैजनाथ महाराज खतगावकर, पांडुरंग देशमुख,बाळू महाराज लटपटे, महाशिवरात्रीला कृष्णकुमार महाराज सताळकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन संत जगमित्रनागा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रा.दशरथ रोडे यांना पितृशोक :कॉम्रेड वैजनाथ केरबा रोडे यांचे निधन

इमेज
 प्रा.दशरथ रोडे यांना पितृशोक :कॉम्रेड वैजनाथ केरबा रोडे यांचे  निधन  परळी (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील इंदपवाडी येथील व ह .मु.जिरगे नगर परळी रहिवासी असलेले  कॉम्रेड वैजनाथ केरबा रोडे वय 99 व्या वर्षी अल्पशा अजाराने दुःखद निधन झाले असुन अंत्यविधी सकाळी 8.00 वा कन्हेरवाडी येथील स्मशानभुमीत  होईल.  मागील अनेक वर्षापासून 1951 ते 1966 च्यां कार्य काळात  मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीमध्ये  कॉम्रेड मा.खा.गंगाधर अप्पा बुरांडे यांच्या सोबत काम करत चळवळ उभा  केली असुन त्यांनी द.म.रेल्वे मध्ये नौकरी केली व उर्वरीत जीवन मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीमध्ये वाहून घेतले. त्यांच्या निधनाने परळी शहरासह तालूक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात चार मुले वसंत रोडे, धनराज रोडे, भाऊराव  रोडे,सुना,नातवडे असून ते पञकार प्रा. दशरथ रोडे यांचे ते वडील होत त्यांचा दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे

●कृषी अभ्यासक डॉ.मथुरा स्वामिनाथन यांची प्रमुख उपस्थिती

इमेज
  किसान सभेची राज्यस्तरीय सोयाबीन-कापूस परिषद ●कृषी अभ्यासक डॉ.मथुरा स्वामिनाथन यांची प्रमुख उपस्थिती ◆मराठवाड्याचा आर्थिककणा असलेले पीक संकटात *◆परळीकरांची शेतकरी लढ्यास हजारो रुपयांची आर्थिक मदत* परळी / प्रतिनिधी केंद्रात सत्तेत असलेल्या सरकारने 2014 साली शेतक-यांस स्वामीनाथन आयोग लागू करु, उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देऊ, सन २०२४ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु ! अशा घोषणा करत 10 वर्ष सत्ता उपभोगली पण प्रत्यक्षात मात्र शेतकरी सन्मान योजनेच्या गोडस नावाखाली 2 हजार रुपये बोळवण करत याच काळात शेतीवरचा खर्च दुपटीपेक्षा जास्त वाढवला आणि शेतमालाल किफायतशीर हमीभाव देणे टाळले. महाराष्ट्र विशेषतः मराठवाडा येथील अर्थकारण हे सोयाबीन आणि कापूस सारख्या पिकावर अवलंबून असते ते पीक चुकीच्या आयात-निर्यात धोरण, हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केले गेले. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ, नैसर्गिक आवर्षणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट आणि त्यात  शेतमालाचे पडलेले भाव, अवर्षण, अतिवृष्टी यासारख्या आपत्ती मध्ये मिळणारी पीक विम्याची मदत न मिळणे यामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण बनले आ

राज्यव्यापी कापूस, सोयाबीन परिषदेसाठी बहुसंख्येने उपस्थित रहा - ॲड. अजय बुरांडे

इमेज
  राज्यव्यापी कापूस, सोयाबीन परिषदेसाठी बहुसंख्येने उपस्थित रहा - ॲड. अजय बुरांडे दिंद्रुड,  प्रतिनिधी राज्यव्यापी कापूस, सोयाबीन परिषदेचे आयोजन येत्या ७ मार्च गुरुवार रोजी माजलगाव येथे महाराष्ट्र राज्य किसान सभा च्या वतीने करण्यात आले आहे. या अनुषंगाने किसान सभा बीड जिल्हाध्यक्ष ॲड.अजय बुरांडे यांनी दिंद्रुड येथील सरपंच अजय कोमटवार यांच्या निवासस्थानी शेतकऱ्यांशी दि.०२ शनिवारी सायंकाळी संवाद साधत या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.         अखिल भारतीय किसान सभा सातत्याने शेतकऱ्यांच्या संदर्भात आवाज उचलत आलेली आहे. याचाच एक भाग म्हणून कापूस, सोयाबीन सह एकंदरीत सर्वच पिकांचा परवडणारा किफायतशीर हमीभाव शेतकऱ्यांच्या पदरात पडावा. यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी भव्य कापूस, सोयाबीन परिषदेचे आयोजन येत्या ०७ मार्च रोजी करण्यात आले आहे. याच अनुषंगाने किसान सभेचे बीड जिल्हाध्यक्ष अजय बुरांडे यांनी शनिवारी दिंद्रुड, बेलोरा, आलापुर, देवळा, नाखलगाव, पिंपळगाव (नाखले) आदि गावात शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन कार्यक्रमास उपस्थित राहण्याच

पुढील वर्षी परळी प्रीमियर लीग आयोजित करणार - धनंजय मुंडे

इमेज
  परळीत येत्या काही महिन्यांतच सुसज्ज क्रीडा संकुल उभारणार - धनंजय मुंडे  क्रिकेटर युवराज सिंह, झहीर खान यांच्या उपस्थितीत नामदार चषकाचे झाले बक्षीस वितरण धनंजय मुंडेंसारख्या नेत्यांनी संधी उपलब्ध करून दिल्यानेच ग्रामीण भागातून युवराज सिंह आणि झहीर खान सारखे खेळाडू घडतात - युवराज सिंह परळीचे क्रिकेट एक दिवस देशात आणि देशाबाहेर पोहचणार - झहीर खान नामदार चषकातून 3500 खेळाडूंचा सहभाग, आयोजनातील सर्वांचे आभार - अजय मुंडे ग्रामीण मधून चांदापुर तर परळी शहरातून जय श्री राम संघ ठरले नामदार चषकाचे मानकरी! परळी वैद्यनाथ (दि. 03) - परळीची माती ही रत्नांची खाण आहे या मातीने महाराष्ट्र व देशाला अनेक क्षेत्रात विविध रत्ने दिली आहेत. क्रिकेट सह क्रीडा क्षेत्रातही परळीचे मोठे योगदान आहे. रणजी ट्रॉफीसाठी मराठवाड्याची स्वतंत्र टीम असली असती, तर परळी सह बीड जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना त्याद्वारे आपली प्रतिभा राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्याची संधी मिळाली असती; ती संधी मिळावी म्हणून दरवर्षी नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण क्रिकेट व अन्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करतो. याही वर्षी आपण वैद्

संताचे वेषापेक्षा संतत्वाची वृत्ती महत्वपूर्ण ठरते-ॲड दत्तात्रय महाराज आंधळे

इमेज
  संताचे वेषापेक्षा संतत्वाची वृत्ती महत्वपूर्ण ठरते-ॲड दत्तात्रय महाराज आंधळे वर्धा (प्रतिनिधी)संताची वेष भूषा यापेक्षा संतवृत्ती असणे महत्वपूर्ण ठरते असे प्रतिपादन संतवाड्.मयाचे संशोधक ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराज यांनी केले. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव चौरस्ता येथील संत गजानन महाराज मंदिरात सुरू असलेल्या, संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन सेवा करताना ह.भ.प दत्तात्रय महाराज आंधळे यांनी संतांचे महत्व सांगितले. यावेळी मृदगांचार्य ह.भ.प. निलेश वानकर  ,ह.भ.प. वासुदेव महाराज बोरकर,ह.भ.प  पांडुरंग महाराज जगधरे ह.भ.प नरहरी महाराज बोरवटकर,  ह.भ.प दिनेश महाराज गुडवार,ह.भ.प लक्ष्मण महाराज गुडवार  ह.भ.प पुडंलीक महाराज बोरवटकर, ह.भ.प.राजेश्वर भुरके,भरत कुथे,प्रा. मेघश्याम नरुले आदिंची साथ संगत लाभली.

शासन निर्णय निर्गमित; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

इमेज
  एमपीएससी मार्फत शिफारस केलेल्या 121 मंडळ कृषी अधिकाऱ्यांना 7 महिन्यांच्या विक्रमी वेळच नियुक्त्या प्रदान शासन निर्णय निर्गमित; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती *मुंबई दि. 2 मार्च 2024* महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस करण्यात आलेल्या मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील 121 उमेदवारांना केवळ  7 महिन्यांच्या विक्रमी वेळेत नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली महाराष्ट्र कृषी सेवा गट ब म्हणजेच मंडळ कृषी अधिकारी संवर्गासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एप्रिल 2022 मध्ये परीक्षा घेण्यात आला होत्या. या परीक्षांमध्ये आयोगाने पात्र ठरवलेल्या उमेदवारांची यादी जुलै 2023 मध्ये कृषी विभागास प्राप्त झाली. उत्तीर्ण उमेदवारांचे चारित्र्य पडताळणी, जात प्रमाणपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशी सर्वसाधारण प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ही प्रक्रिया बरीच वेळखाऊ असते. मात्र याबाबतीत केवळ 7 महिने इतक्या विक्रमी वेळेत नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. चारित्र्य पडताळणी, जात प्रमाणपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या बाबींच्या अधीन राहून नियुक्त्या

मराठा समाजाने उपसले "ब्रह्मास्त्र"..! बीड लोकसभेसाठी 2804 उमेदवार उतरवणार मैदानात

इमेज
  मराठा समाजाने उपसले "ब्रह्मास्त्र"..! बीड लोकसभेसाठी 2804 उमेदवार उतरवणार मैदानात सगे-सोयरे'च्या अध्यादेशासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सध्याही सुरूच आहे. याच अनुषंगाने आज (दि. २ मार्च) बीड शहरामध्ये बीड तालुकास्तरावरील आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्व समाजबांधवांच्या उपस्थितीमध्ये एकमताने काही ठराव घेण्यात आले. यात प्रामुख्याने तोंडावर आलेल्या लोकसभेच्या निवडणूकीमध्ये प्रत्येक गावातून दोन उमेदवार मराठा समाज लोकसभेमध्ये उतरविणार असल्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 1402 गावे असून प्रत्येक गावातून जर दोन उमेदवार म्हटले तर ही संख्या 2804 वर जाते. कोणत्याही निवडणुकीमध्ये चारशे उमेदवाराच्या पुढे उमेदवार आले तर ती निवडणूक रद्द करावी लागते यामुळे मराठा समाजाने घेतलेल्या निर्णयामुळे लोकसभा निवडणुकीची गोची होण चित्र सध्या तरी दिसत आहे.बीड शहरातील मुक्ता लॉन्स परिसरामध्ये आज बीड तालुकास्तरावरील मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला तालुकाभरातून मराठा समाज उपस्थित होती. या बैठकीमध्ये काही ठराव घेण्यात आले. यात पहिला ठराव असा ह

धनंजय मुंडे यांच्यासह पंकजाताईही राहणार उपस्थित

इमेज
  भारताचे स्टार क्रिकेटर युवराज सिंग आणि जहीर खान रविवारी परळीत! परळीत धनंजय मुंडेंच्या वतीने आयोजित नामदार चषक डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचा रविवारी फायनल! दुपारी 12 वाजल्यापासून होणार भव्य फायनल व बक्षीस वितरण धनंजय मुंडे यांच्यासह पंकजाताई ही राहणार उपस्थित परळी वै. (दि.02) - राज्याचे कृषिमंत्री, परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, तसेच युवकांचे नेते धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून, नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे मा.गटनेते अजय मुंडे यांनी परळी वैद्यनाथ येथे आयोजित केलेल्या डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा येत्या रविवारी (03 मार्च) रोजी फायनल होणार असून या फायनल सामन्यासाठी व बक्षीस वितरणासाठी भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबाज फलंदाज, प्रसिद्ध क्रिकेटर युवराज सिंग तसेच भारतीय क्रिकेट संघाची स्पीड मशीन म्हणून ओळख असलेला क्रिकेटपटू जहीर खान त्याचबरोबर माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यादेखील परळी वैद्यनाथ येथे रविवारी उपस्थित राहणार आहेत.  मागील सुमारे एक महिन्यापासून परळी शहरात नाथ प्रतिष्ठान आयोजित डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या क्रिकेट स्पर्धेमध्ये प

मोठी संधी: पोलीस भरती : सविस्तर माहिती

इमेज
  राज्यात पोलीस दलात शिपाई संवर्गातील पदांच्या एकूण १४२९४ जागा राज्यातील विविध पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय/ राज्य राखीव दलाच्या अंतर्गत असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या *पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई आणि सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण १४२९४ जागा*  भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची *शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे*. शैक्षणिक पात्रता – उमेदवार *इयत्ता बारावी* (एच.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण असावा.  वयोमर्यादा – *खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे* आणि *मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३३वर्षे* दरम्यान असावे. फीस – *खुल्या प्रवर्गातील* उमेदवारांकरिता ४५०/- रुपये तर *मागासवर्गीय* प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३५०/- रुपये फीस आहे. *अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ५ मार्च  २०२४* पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. *अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च  २०२४* पर्यंत अर्ज करता येतील.                   *जिल्हा विभाग*                   *पदसंख्या* पोलीस शिपाई (छत्रपती संभाजीनगर- लोहमार्ग)

एसबीआय बँक अधिका-यांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष?

इमेज
  परळीत सिडीएम मशीन गेली तीन महिन्यापासून बंदच एसबीआय बँक अधिका-यांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष? परळी प्रतिनिधी  परळी शहरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या मुख्य शाखेचे सिडीएम मशीन गेली तीन महिन्यापासून बंद आहे.याकडे बँक अधिका-यांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे.यामुळे व्यापारी व सर्वसामान्य खातेदारांची गैरसोय होत आहे.सिडीएम मशीन बंद असल्याने ग्राहकांना इतर पद्धतीने पैसे टाकावे लागत आहेत.त्या करिता अतिरिक्त शुल्क भरावा लागत आहे. शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत कॅश डिपॉझिट मशीन उपलब्ध आहे.खातेदारांना एक लाखावरील रक्कम ही बँकेत जमा करता येते मात्र एक लाखापेक्षा कमी असलेली रक्कम ही सीएसपी किंवा सिडीएम वर भरता येते.ग्राहक सेवा केंद्रावर रक्कम भरण्याची मर्यादा 20000 इतकीच आहे.खातेदाराला यापेक्षा जास्त रक्कम असल्यास ती सीडीएम मशीन मध्ये डिपॉझिट करता येते.मात्र मुख्य शाखेत असलेली सिडीएम मशीन गेली तीन महिनाभरापासून बंदच असल्याने ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. सिडीएम मशीन बंद असल्याने बँकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या सिडीएम मशीनची सेवा पूर्वीप्रमाणे सुरळीत करण्याची मा