इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

महाशिवरात्री निमित्त राधाताई महाराज यांचे कीर्तन

 महाशिवरात्री निमित्त राधाताई महाराज यांचे कीर्तन

   



  पाटोदा /प्रतिनिधी

             पाटोदा शहराचे ग्रामदैवत श्री भामेश्र्वर  मंदिर येथे आज दिनांक 8 मार्च रोजी सायंकाळी 9 ते 11 महाशिवरात्री व संताजी महाराज पुण्यतिथी  निमित्ताने महंत ह.भ.प . राधाताई महाराज सानप ( श्री आईसाहेब देवस्थान महासांगवी) यांचे अमृततुल्य कीर्तन होणार आहे.

      गेल्या 26 वर्षापासून दरवर्षी भामेश्वराची सेवा म्हणून राधाताई न चुकता महाशिवरात्रीला भामेश्र्वर  मंदिर येथे  कीर्तन सेवा करत आहेत . तसेच रात्री ठीक बारा वाजता ब्रह्मवृंदाच्या वतीने भामेश्र्वराची महापूजा होईल . दोन मार्च पासून भक्ती दीदी आळंदी यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा सुरू आज शुक्रवारी कथेची सांगता आहे .  शनिवारी 9 मार्च  रोजी सकाळी 9 ते 11 संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भामेश्र्वर मंदिर पर्यंत  संताजी प्रतिमेची सवाद्य मिरवणूक निघणार आहे त्यानंतर 11ते 1 ह.भ प.भक्ती दीदी आळंदी यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर  महाप्रसाद होऊन  महाशिवरात्री व संताजी पुण्यतिथी सोहळ्याची सांगता होणार तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भामेश्वर मित्रमंडळ व संताजी युवक मंडळ पाटोदा यांनी केले आहे     

  गुरु आदेशाची परंपरा कायम

        संत मीराबाई आईसाहेब यांच्या देहावसनानंतर 1998 मध्ये या गादीवर भगवान गडाचे महंत भीमसिंह बाबा  महाराज यांनी मला बसवले व तिसऱ्या दिवशी महाशिवरात्रीनिमित्त भामेश्र्वर मंदिरामध्ये कीर्तनासाठी जाण्यास सांगितले त्या आदेशाची परंपरा 26 वर्षापासून जोपासत आहे व पुढेही जोपासत राहील. 

- महंत राधाताई महाराज                  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!