प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने

 प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने




महाशिवरात्री निमित्त परळीत प्रथमच बर्फाचे शिवलिंग अमरनाथजींचे दर्शन


परळी वैजनाथ/प्रतिनिधी

महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी सकाळी 6  ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रथमच बर्फाचे शिवलिंग अमरनाथजींचे दर्शनाचा लाभ घेता येणार असून या दर्शनाचा लाभ परळी शहर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठया संख्येने घ्यावा असे आवाहन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय परळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

परळी शहरात पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे मंदिर असून महाशिवरात्रीचे औचित्य साधून परळी वैजनाथ येथील पंचवटीनगर, जुने पावर हाऊसच्या समोर, वैद्यनाथ मंदिर रोड येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत बर्फाचे शिवलिंग  अमरनाथजींचे दर्शन भाविक भक्तांना घेता येणार आहे.  दरम्यान सकाळी 8 व सायंकाळी 7 वाजता आरती होणार आहे. या दर्शनाचा लाभ परळी शहर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठया संख्येने घ्यावा असे आवाहन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय परळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !