आज दैठणा येथे होणार अंत्यसंस्कार

 दैठणा घाटचे सरपंच अशोक दादाराव गुट्टे यांचे  निधन




आज दैठणा येथे होणार अंत्यसंस्कार


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे दैठणा या गावचे सरपंच अशोक दादाराव गुट्टे यांचे हृदय विकाराने आज गुरूवारी ( दि. 7/3/2024 रोजी पुणे येथील एका खाजगी रुगणालयात निधन झाले. मृत्युसमयी ते 65 वर्षाचे होते.

      दैठणा या गावचे तब्बल 15 वर्ष सरपंच राहिलेले अशोक गुट्टे आजारी असल्याने त्यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच  त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. अतिशय मनमिळाऊ आणि दिलखुलास स्वभाव असल्याने ते संपूर्ण परळी/अंबेजोगाई तालुक्यामध्ये सुपरीचीत होते. धार्मिक वृत्तीचे आणि राजकारण, समाजकारणामध्ये सक्रिय असल्याने त्यांचा तालुक्यामध्ये दांडगा संपर्क होता. अशोक गुट्टे हे संपूर्ण तालुक्यात सरपंच या नावाने ओळखले जात असत. त्यांच्या निधनाने दैठणा गाव आणि परीसरात  मध्ये शोककळा पसरली आहे. कै. अशोक गुट्टे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, चार भाऊ, पाच बहिणी, सुना-नातवंडे असा भरगच्च परिवार आहे.


     कै. अशोक गुट्टे यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी आठ वाजता दैठणा येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. गुट्टे कुटुंबातीच्या दुःखात एमबी न्युज  परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार