इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

ज्येष्ठ नागरिकांना मुद्दत संपलेल्या ठेवी एक रक्कमी द्या- अनिल बोर्डे

 ज्येष्ठ नागरिकांना मुद्दत संपलेल्या ठेवी एक रक्कमी द्या- अनिल बोर्डे          


   


    गेवराई:- ज्येष्ठ नागरिकांनी गेवराई शहरातील सर्व मल्टीस्टेट व पतसंस्था यामध्ये भवितव्यासाठी गुंतवणूक केलेली आहे सदरील मुदत संपल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना एक रक्कमी रक्कम मिळावी यासाठी गेवराई तहसील कार्यालय येथील श्री संजय जी सोनवणे नायब तहसीलदार गेवराई यांच्याकडे याबाबत बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन प्रमुख अनिल बोर्डे यांनी केलेली आहे त्याची प्रत माननीय जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आली आहे.                 

    गेवराई शहरांमध्ये मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी व पतसंस्था यांच्याकडे बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केलेली आहे परंतु मुद्दत ठेवीची मुदत संपल्यानंतर पूर्ण रक्कम मल्टी स्टेट करून न देता ठराविक रक्कम दिली जाते त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागत आहे ही बाब गंभीर आहे व त्यांच्या गरजा पूर्ण होत नाही याप्रकरणी लक्ष  पुरवावे अशी मागणी करण्यात आली आहे.             

       ज्येष्ठ नागरिक हे भवितव्यासाठी वैद्यकीय खर्चासाठी व इतर आवश्यक खर्चासाठी रक्कम गुंतवण्यात आलेली असते बऱ्याच नागरिकांना हृदयाचे विकार मधुमेह कॅन्सर हाडाचे विकार डोळ्याचे विकार अशा व्यक्तींना वेळेवर रक्कम मिळत नाही त्यामुळे अशा व्यक्तींना हृदयविकाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.           

                     ज्येष्ठ नागरिकांना इतर आजारासाठी मुदत संपलेल्या ठेवी एक रकमेत देण्यात याव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.           तरी या प्रकरणी जातीने लक्ष पुरवुन संबंधित मल्टीस्टेट सोसायटी यांना आपल्या स्तरावर योग्य त्या सूचना द्याव्यात व यापुढे ग्राहकावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी या प्रकरणी सहकार्य करावे अशी विनंती . करण्यात आली आहे               

              या निवेदनावर बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष व गेवराई मार्गदर्शन केंद्रप्रमुख अनिल बोर्डे राजेंद्र सुतार गणेश रामदासी मोहन राजहंस विश्वास चपळगावकर जे आर जोशी रामेश्वर थळकर आधी हजर होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!