पंकजा मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे सहभागी: पालखीही वाहिली

महाशिवराञ: जिरेवाडीच्या प्रभु सोमेश्वराचा पालखी सोहळा वैद्यनाथाच्या भेटीला!



पंकजा मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे सहभागी: पालखीही वाहिली


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

       परळी वैजनाथ तालुक्यातील  जिरेवाडी येथील जागृत देवस्थान भगवान श्री सोमेश्वराचा पालखी सोहळा  मोठ्या ऊत्साहाने प्रभू वैद्यनाथाच्या भेटीला आला.या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत झाले. अनेक वर्षापासुनची परंपरा असलेला हा पालखी सोहळा अतिशय भव्यदिव्य स्वरुपात  निघाला.  

      या पालखी सोहळ्यात भजनी मंडळी, कलशधारी महीला, शाळकरी मुलांचे टिपरी, आणि लेझीमपथक यांसह गांवकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  सकाळी  सोमेश्वर मंदीर जिरेवाडी येथुन पालखीचे प्रस्थान होउन हा पालखी सोहळा जलालपुर  - शिवाजी चौक - एकमिनार चौक -    स्टेशनरोड -बाजार समिती - टॉवर - जगमिञ नागा मंदीर मार्गे वैद्यनाथ मंदीर येथे दुपारी पोहोचला.ठिकठिकाणी पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले तसेच भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.  दरम्यान माजी मंत्री पंकजा मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी पालखीत सहभागी होउन सोमेश्वराचे दर्शन घेतले. अतिशय उत्साहात पालखी सोहळा काढण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !