एसबीआय बँक अधिका-यांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष?

 परळीत सिडीएम मशीन गेली तीन महिन्यापासून बंदच


एसबीआय बँक अधिका-यांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष?


परळी प्रतिनिधी 

परळी शहरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या मुख्य शाखेचे सिडीएम मशीन गेली तीन महिन्यापासून बंद आहे.याकडे

बँक अधिका-यांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे.यामुळे व्यापारी व सर्वसामान्य खातेदारांची गैरसोय होत आहे.सिडीएम मशीन बंद असल्याने ग्राहकांना इतर पद्धतीने पैसे टाकावे लागत आहेत.त्या करिता अतिरिक्त शुल्क भरावा लागत आहे.


शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत कॅश डिपॉझिट मशीन उपलब्ध आहे.खातेदारांना एक लाखावरील रक्कम ही बँकेत जमा करता येते मात्र एक लाखापेक्षा कमी असलेली रक्कम ही सीएसपी किंवा सिडीएम वर भरता येते.ग्राहक सेवा केंद्रावर रक्कम भरण्याची मर्यादा 20000 इतकीच आहे.खातेदाराला यापेक्षा जास्त रक्कम असल्यास ती सीडीएम मशीन मध्ये डिपॉझिट करता येते.मात्र मुख्य शाखेत असलेली सिडीएम मशीन गेली तीन महिनाभरापासून बंदच असल्याने ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. सिडीएम मशीन बंद असल्याने बँकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या सिडीएम मशीनची सेवा पूर्वीप्रमाणे सुरळीत करण्याची मागणी खातेदारांकडून होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !