इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

धनंजय मुंडे यांच्यासह पंकजाताईही राहणार उपस्थित

 भारताचे स्टार क्रिकेटर युवराज सिंग आणि जहीर खान रविवारी परळीत!


परळीत धनंजय मुंडेंच्या वतीने आयोजित नामदार चषक डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचा रविवारी फायनल!


दुपारी 12 वाजल्यापासून होणार भव्य फायनल व बक्षीस वितरण


धनंजय मुंडे यांच्यासह पंकजाताई ही राहणार उपस्थित


परळी वै. (दि.02) - राज्याचे कृषिमंत्री, परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, तसेच युवकांचे नेते धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून, नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे मा.गटनेते अजय मुंडे यांनी परळी वैद्यनाथ येथे आयोजित केलेल्या डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा येत्या रविवारी (03 मार्च) रोजी फायनल होणार असून या फायनल सामन्यासाठी व बक्षीस वितरणासाठी भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबाज फलंदाज, प्रसिद्ध क्रिकेटर युवराज सिंग तसेच भारतीय क्रिकेट संघाची स्पीड मशीन म्हणून ओळख असलेला क्रिकेटपटू जहीर खान त्याचबरोबर माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यादेखील परळी वैद्यनाथ येथे रविवारी उपस्थित राहणार आहेत. 


मागील सुमारे एक महिन्यापासून परळी शहरात नाथ प्रतिष्ठान आयोजित डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या क्रिकेट स्पर्धेमध्ये परळी शहरासह परळी विधानसभा मतदारसंघातून 260 पेक्षा अधिक संघांनी भाग घेतला होता. त्याचबरोबर डीएम 11 या क्रिकेट संघाच्या माध्यमातून स्वतः धनंजय मुंडे यांनी देखील या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होऊन क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला होता. 


दरम्यान ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून या स्पर्धेचा फायनल येत्या 3 मार्च, रविवार रोजी वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील मैदानावर खेळवला जाणार असून त्यानंतर त्याच ठिकाणी ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या फायनल सामन्यासह बक्षीस वितरणाच्या समारंभास भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज म्हणून ओळख असलेला युवराज सिंग तसेच बॉलिंग ची स्पीड मशीन म्हणून प्रसिद्धीस असलेला जहीर खान हे दोन खेळाडू यांसह माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजाताई मुंडे, मा.आ.संजय दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, परळी तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष तानाजी देशमुख यांसह मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे. 


दरम्यान या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार पाहण्यासाठी तसेच खेळाडूंच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत असलेल्या बक्षीस वितरण समारंभात उपस्थित राहून आपल्या लाडक्या खेळाडूंना भेटण्याच्या या संधीचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवकांचे नेते अजय मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या