पोस्ट्स

23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

MB NEWS-🔸LIVE: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे मुंबईत आयोजित कार्यक्रम

इमेज
  आज दि. 14 एप्रिल रोजी राज्य शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा  कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.          कार्यक्रम थेट पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.....👇 https://youtu.be/NXPSZRNulJI https://www.facebook.com/events/512650650484944/ Click:🏵️ *MB NEWS चे संचालक संपादक मा.श्री.महादेवजी शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!* हे देखील वाचा/पहा🔸 संबंधित बातम्या ⬛ *पहा: उद्या रिलीज होणारे सौंदरमल माता-कन्येने गायिलेले "बागेचा माळी हाय माय जगा वेगळा" संपूर्ण गीत....!* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._ Click:*पंकजाताई मुंडेंनी 'त्या' गुणी गायिकांच्या कलेला दिला वाव !* *महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शामल सौंदरमलच्या गीताचा व्हिडिओ राज्यात व्हायरल* Click:*प्रकृती स्थिर-विश्रांतीचा सल्ला : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदय विकाराचा त्रास; ब्रिच कॅन्डी रुग्णालयात उपचार* Click:*दगदगीमुळे भोवळ आली: धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली, डॉक्

MB NEWS-खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी केले परळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

इमेज
  खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी केले परळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन परळी वैजनाथ दि. 14           भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी परळीच्या रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.          महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131 वी जयंती. त्यानिमित्त बीड जिल्ह्य़ाच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी सकाळी 9 वाजता रेल्वे स्टेशन येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन व आंबेडकरी जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.         यावेळी माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, जेष्ठ नेते भास्कर नाना रोडे, वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रा. दासू वाघमारे, रमेश गायकवाड, योगेश पांडकर, मोहन जोशी यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. Click:🏵️ *MB NEWS चे संचालक संपादक मा.श्री.महादेवजी शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!* हे देखील वाचा/पहा🔸 संबंधित बातम्या ⬛ *पहा: उद्या रिल

MB NEWS-एमपीएससी:रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात शासनाकडून शासन निर्णय जारी

इमेज
  एमपीएससी:रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात शासनाकडून  शासन निर्णय जारी मुंबई.....             शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात शासनाकडून मंगळवारी (दि.१२) शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या ११ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा सुधारित आकृतिबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात येत आहे. पदभरतीसाठी एकही पद उपलब्ध होत नसल्यास किमान एक पद भरता येईल.ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या ११ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा सुधारित आकृतिबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक उपाययोजनांतर्गत ४ मे २०२० चे निर्बंध लागू झाल्यानंतरच्या कालावधीत उच्चस्तरीय सचिव समितीने/

MB NEWS-परळी पोलीसांनी गुजरातमधील भुज कच्छच्या जंगलातून दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या ! परळीतील व्यापार्याची सोने देण्यासाठी चाळीस लाखांची केली होती फसवणूक

इमेज
  परळी पोलीसांनी गुजरात मधील भुज - कच्छच्या जंगलातून दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या ! परळीतील व्यापार्याची सोने देण्यासाठी चाळीस लाखांची केली होती फसवणूक परळी वैजनाथ दि १३ :- एक वर्षापूर्वी परळी शहरातील एका व्यापाऱ्यास स्वस्तात सोने देतो म्हणून चाळीस लाखांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींच्या  गुजरात मधील भुज कच्छच्या जंगलात जाऊन  परळी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ व डीबी शाखेचे भास्कर केंद्रे यांनी मुसक्या आवळून मुद्देमालासह जेरबंद केले.              १ वर्षापूर्वी परळी शहरातील व्यापारी शंकर शहाणे यांना गुजरात मधील भुज कच्छ या ठिकाणी राहत असलेला एक चतुर महाठक जीसूप मोहम्मद अली कक्कळ आणि सिकंदर ह्या दोघांनी सुरुवातीस स्वस्तात सोने देतो म्हणून पाच लाखांचे सोने दिले. यावर शंकर शहाणे यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. व्यवहार करतेवेळी जीसूप कक्कळ याने आपले नाव बदलून अब्बास आली अशा नावाचा वापर केला होता. ठरल्याप्रमाणे जिसप कक्कळने शंकर शहाणे यांना  पाच लाखांचे सोने दिल्यामुळे त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला.  नंतर जिसुप कक्कळने आणखी स्वस्तात सोने देतो म्हणून शंकर शहाणे यां