शासनास ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या साठी राज्यभर स्मरण पत्र व निवेदन -मुख्य समन्वयक दीपक रणनवरे

शासनास ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या साठी राज्यभर स्मरण पत्र व निवेदन -मुख्य समन्वयक दीपक रणनवरे शासन प्रशासन दरबारी खितपत पडलेल्या दुर्लक्षित असणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी सोमवार दिनांक 22 जुलै पासून राज्यभरात शासनास स्मरणपत्र व निवेदन देणार समस्त ब्राह्मण समाज मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी कळविले आहे *ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन एक हजार कोटी आर्थिक तरतूद करण्यात यावी मुला मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्यात यावे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे या सह समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने गेल्या अनेक वर्षात शासन प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे अनेक वेळा आंदोलन करून निवेदन देऊनही सरकारने दुर्लक्ष केले यासंदर्भात सर्वच राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी आमदार खासदार पालकमंत्री यांना अनेक वेळेस प्रलंबित मागण्याची निवेदन दिले आंदोलनाचा भाग म्हणूनच जालना येथील गांधी चमन येथे 28 नोव्हेंबर 2023 रोजी दीपक रणनवरे यांनी आमरण उपोषण केले पालकमंत्र्याच्या लेखी...