पोस्ट्स

जुलै २१, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

वैद्यनाथास अभिषेक,महाप्रसाद वाटप,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

इमेज
उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस : परळी शिवसेनेकडून उत्साहात विविध उपक्रम  वैद्यनाथास अभिषेक, महाप्रसाद वाटप,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप  परळी वैजनाथ, प्रतिनिधी......         महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.  शिवसेनेचे नेते तथा मराठवाडा संपर्क नेता आमदार सुनील प्रभू यांच्या आदेशावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, शिवसेना मराठवाडा समन्वय विश्वनाथ नेरुळकर, बीड जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख परशुराम जाधव, लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार सुनील धांडे सर, बीड जिल्हा सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंभोरे , बीड  जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपजिल्हाप्रमुख नारायणराव सातपुते, तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल, शहर प्रमुख राजेश विभुते यांच्या नेतृत्वाखाली तालुका व शहर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.                बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ पंचम ज्योतिर्लिंग रुद्राभिषेक करून महाआरती

सत्कार नाकारले; महापुरुषांना करणार वंदन

इमेज
  संवैधानिक पदावरील निवडीनंतर पंकजाताई मुंडे प्रथमच 29 रोजी बीड जिल्ह्यात: सत्कार नाकारले; महापुरुषांना करणार वंदन परळी वैजनाथ,प्रतिनिधी....         भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे 29 जुलै रोजी बीड जिल्ह्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर घडलेल्या राजकीय घडामोडी तसेच राज्याच्या वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून त्यांची झालेली निवड या अर्थाने संवैधानिक पद घेतल्यानंतर त्या प्रथमच बीड जिल्ह्यात येणार आहेत. मात्र या दौऱ्यात कोणतेही हार तुरे अथवा सत्कार त्या स्वीकारणार नसून जिल्ह्यात विविध ठिकाणी त्या महापुरुषांना वंदन करणार आहेत.        महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य म्हणून पंकजाताई मुंडे यांची निवड झाली. गेल्या अनेक वर्षांपासून त्या कोणत्याही संवैधानिक पदावर नव्हत्या. राज्याच्या वरिष्ठ सभागृहात निवड झाल्यानंतर प्रथमच त्या आपल्या जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या बीड जिल्ह्यात येणार आहेत. मात्र या दौऱ्यात हार-तुरे नको, सत्कार नको, माझ्या स्वागताचा बडेजाव करू नका असे त्यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे. त्यामुळे दि. 29 जुलै रोजीच्या बीड जिल्हा दौऱ्यात पंकजाताई मुंडे विवि

संत सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त,रक्तदान शिबिर,गुणवंतांचा सत्कार

इमेज
  संत सावतामाळी मंदिरात २८ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन  संत सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त,रक्तदान शिबिर,गुणवंतांचा सत्कार  परळी (प्रतिनिधी)  संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त परळी येथील संत सावता महाराज मंदिरात रविवार दि.28 जुलै ते रविवार दि.4 ऑगस्ट या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन यानिमीत्त संत सावता महाराज चरित्र,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  संत सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त परळी येथील संत सावता महाराज मंदिरात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते यावर्षी पहाटे ४ ते ६ काकडा भजन,७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण,१९ ते १ गाथा भजन,२ ते ४ श्री संत सावता महाराज चरित्र,५ ते ६ धुपारती,रात्री ७ ते ९ हरिकीर्तन, १० ते १२ जागर असे कार्यक्रम होणार आहेत.या सप्ताहात रविवार दि.२८ जुलै रोजी ह.भ.प. क्षीरसागर महाराज उखळीकर,दि.२९ जुलै रोजी ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले,दि.३० जुलै रोजी ह.भ.प.विठ्ठल महाराज,दि.३१ जुलै रोजी ह.भ.प.जगन्नाथ महाराज देशमुख,दि.०१ ऑगस्ट रोजी ह.भ.प.रा

इनरव्हील क्लब परळी अध्यक्षपदीश्रध्दा नरेश हालगे; पदग्रहण सोहळा उत्साहात

इमेज
  इनरव्हील क्लब परळी अध्यक्षपदीश्रध्दा नरेश हालगे; पदग्रहण सोहळा उत्साहात   परळी:इनरव्हील क्लब क्लबच्या अध्यक्षपदी श्रध्दा नरेश हालगे यांची सर्वानुमते नियुक्ती झाली असून त्यांनी अध्यक्ष पदाचा पदभार नुकता स्वीकारला आहे. इनरव्हील क्लब ऑफ परळी वैजनाथ चा पदग्रहण सोहळा   येथील   गांधी मार्केट सर्वेश्वर मंदिर  मध्ये पार पडला . या कार्यक्रमाची सुरुवात इनरव्हील गीतेने झाली .त्यानंतर गणेश पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. क्लबच्या मावळत्या अध्यक्षा विद्या गुजर यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा सादर केला नंतर नूतन अध्यक्षा श्रध्दा नरेश हालगे यांना चार्टर पिन Collar देऊन पदभार सोपवला उपाध्यक्ष: उर्मिला कांकरिया ,सेक्रेटरी- विजया दहिवाळ ,ट्रेझर -तारा अग्रवाल आय एस ओ- छाया देशमुख -एडिटर शैलजा बाहेती यांनीही पदभार स्वीकारला.तसेच इसी मेंबर म्हणून उमा समशेट्टी, स्मिता ठक्कर, दुर्गा राठौर ,अनिता धुमाळ शोभना सौदळे यांची निवड करण्यात आली  इंटरनॅशनल इनरव्हील क्लब 32 वर्षांपासून नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात. असेच अजून चांगले कार्यक्रम राबविण्याचा क्कीच प्रयत्न करे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना परळी विधानसभा शासकीय समिती अध्यक्षपदी वाल्मीक अण्णा कराड

इमेज
  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना :परळी विधानसभा शासकीय समिती अध्यक्षपदी वाल्मीकअण्णा कराड परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना म्हणून राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने प्रत्येक विधानसभानिहाय शासकीय समिती गठीत करण्यात आली आहे. परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघ शासकीय समिती अध्यक्षपदी वाल्मीकअण्णा कराड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.            बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी बीड जिल्ह्यातील विधानसभा निहाय समिती गठीत केली आहे. या अनुषंगाने परळी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्र असलेल्या सनियंत्रण समिती अध्यक्षपदी वाल्मीकअण्णा कराड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व  सनियंत्रण करण्यासाठी ही समिती काम करणार आहे. वाल्मीकअण्णा कराड यांच्या अध्यक्षतेखाली ही नियुक्त समिती काम करणार आहे. या समितीचे तहसीलदार सदस्य स

श्री.क्षेत्र कपिलधार येथे ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताहास सुरुवात

इमेज
  श्री.क्षेत्र कपिलधार येथे ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताहास सुरुवात  परळी वैजनाथ दि.२५ (प्रतिनिधी)                 श्री.क्षेत्र कपिलधार येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताह,  ज्ञानयज्ञ महोत्सव व परमरस्य पारायण सोहळ्याचे आयोजन रविवारी (ता.२१) गुरुपौर्णिमा ते रविवारी  (ता.२५) आँगस्ट पर्यंत करण्यात आले आहे. या चार्तुमास सोहळ्यास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक कपीलधार पंच कमिटी व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.              स्वर्गीय डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने व श्री.सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या मार्गदर्शनाने लिंगायत समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री.क्षेत्र कपिलधार येथे गाढे पिंपळगाव येथील दिवंगत सोनाप्पा फुटके, अन्नपूर्णाबाई फुटके या दाम्पत्यांनी या चातुर्मास ३५ दिवशीय सप्ताहाची सुरुवात केली होती. त्यांना कपीलधार देवस्थान पंच कमिटीच्या वतीने सहकार्य करण्यात आले. गेल्या ५० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या सप्ताहाचे अखंडपणे हे ५१ वे वर्षे आहे.रविवारी (ता.२१) गुरुपौर्णिमेला या सप्ताहाची

शेतमजूर युनियनची तहसीलवर निदर्शने

इमेज
  शेतमजूर युनियनची तहसीलवर निदर्शने परळी / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा)  परळी तालुका कमिटीच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुरुवार दि 25 रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.यावेळी तालुक्यातील अनेक गावातुन मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र आले होते. भूमिहीन शेतमजूर, वृद्ध , निराधार व  ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजुरांसाठी कल्याणकारी महामंडळ सुरू करा. राज्य सरकारने या महामंडळासाठी निधीची तरतूद करावी.भूमिहीन शेतमजूर व ग्रामीण गरिबांना सामाजिक सुरक्षा देणारा सर्वंकष केंद्रीय कायदा करावा.केरळ राज्याच्या धर्तीवर बेघरांना घरकुलासाठी सात लाख रुपये अनुदान द्यावे.विधवा व निराधार महिलांचे कुटुंबातील मुला मुलींना शिक्षणासाठी व लग्नासाठी अर्थसहाय्य करण्यात यावे.ग्रामीण भागातील ज्या कुटुंबाकडे राशन कार्ड नाही त्यांना राशन कार्ड वाटप करून स्वस्तात धान्य वाटप करावे या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) परळी तालुका कमितीकडून तहसील कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आली. या प्रसंगी युनियनचे सय्यद रज्जाक,कॉ. सुदाम शिंदे,कॉ. सखाराम शिंदे,कॉ विष्णू पोट

✍️प्रदीप कुलकर्णी यांचा विशेष लेख>>>>>>लोकमान्य लोकनेत्या......!

इमेज
  लोकमान्य लोकनेत्या......!                     म हाराष्ट्राच्या राजकारणात 'मुंडे'  नावाचा जो आज दबदबा आहे  तो केवळ लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यामुळे..आणि त्यांच्यानंतर हा दबदबा असाच पुढे टिकून राहिलाय तो 'ताईसाहेब' अर्थात पंकजाताई यांच्यामुळेच..हे त्रिवार सत्य आहे. पंकजाताईंची राजकीय ताकद, आक्रमक शैली, सर्वांना सोबत घेऊन जाणारं त्यांचं नेतृत्व, समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचा असणारा मोठा पाठिंबा आणि वंचित, पिडित घटकांसाठी काम करण्याची त्यांची तळमळ याची प्रचिती महाराष्ट्राला वारंवार आलेली आहे येत आहे. स्वाभिमानी आणि कणखर बाणा यामुळे राजकारणात त्यांची एक वेगळी छाप आहे. निवडणूक म्हटलं की जय-पराजय असतो पण बीडच्या निवडणुकीत त्यांचा झालेला निसटता पराभव सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या मनाला इतका जिव्हारी लागला की, आत्महत्येसारख्या घटना घडल्या. हे असं एखाद्या राजकीय नेत्याच्या बाबतीत क्वचितच घडलं असेल.  महाराष्ट्राच्या राजकारणात असं यापूर्वी कधी झाला नसावं. आपल्या लाडक्या नेत्याच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवाचं बरं-वाईट करणं ही तशी वेदनादायक आणि मनाल

पंकजाताई मुंडे यांचे राज्यभरातील कार्यकर्त्यांना आवाहन

इमेज
  समर्थकांच्या आत्महत्येने व्यथित ; वाढदिवस साजरा करणार नाही, हारतुरे नको फक्त शुभेच्छांचा एक एसएमएस करा पंकजाताई मुंडे यांचे राज्यभरातील कार्यकर्त्यांना आवाहन २९ जुलैला बीड जिल्ह्यात येणार ; भगवान भक्तीगड ते परळी महापुरुषांना करणार वंदन परळी वैजनाथ ।दिनांक २५। २६ जुलै रोजी आपला वाढदिवस असून संपूर्ण राज्यातून वाढदिवसाच्या दिवशी ताई तुम्ही  कुठे भेटणार? अशा प्रकारचे संदेश मिळत आहेत, तथापि, हारतुरे , सत्कार, बडेजाव असा कोणताही उत्सवी स्वरूपात  वाढदिवस साजरा करणे हे सद्य परिस्थितीत  समर्पक वाटत नाही, त्यामुळे केवळ आपल्या प्रेमरुपी एका एसएमएस वर वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद प्रदान मला द्यावेत असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना केलं आहे. दरम्यान, विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी येत्या २९ तारखेला भगवानभक्ती गडापासून परळीपर्यंत आपण महापुरुषांना वंदन करत  दौरा करणार असल्याचे सांगितले आहे. वाढदिवसा दिवशी सर्वांनी आहे त्या ठिकाणावरून केवळ एसएमएसवरुन  शुभेच्छा द्याव्यात असेही त्यांनी म्हटले आहे.     पंकजाताई मु

कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - भाजपाचे आवाहन

इमेज
आ. पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - भाजपाचे आवाहन परळी वैजनाथ        भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना भाजपच्या सर्व प्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, महिला आघाडी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परळी शहर व तालुका भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.      भाजपाच्या राष्ट्रीय सचिव, विधान परिषदेच्या आमदार पंकजाताई मुंडे यांचा उद्या शुक्रवार दि. 26 जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने भाजपच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आ. पंकजाताई मुंडे यांना राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी निरोगी, दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी शुक्रवार दि. 26 जुलै 2024 रोजी सकाळी 8 वाजता बारा ज्योतर्लिंगांपैकी एक आसलेल्या प्रभू वैद्यनाथाला अभिषेक करण्यात येणार आहे तर सकाळी 9 वाजता मलिकपुरा येथील दर्ग्यास चादर चादर चढविण्यात येणार आहे. त्यानतंर सकाळी 10 वाजता उपजिल्हा रुग्णालय, परळी येथे रुग्

मंत्रालयात बीड जिल्ह्यातील पीकविमा संदर्भात बैठक

इमेज
  बीड जिल्ह्यातील खरीप 2023 चा उर्वरित पीकविमा तातडीने वितरित करा - धनंजय मुंडे मंत्रालयात बीड जिल्ह्यातील पीकविमा संदर्भात बैठक मुंबई (दि. 24) - बीड जिल्ह्यात खरीप 2023 मध्ये अग्रीम 25% प्रमाणे वितरित झालेल्या पिकविम्या नंतर उर्वरित नैसर्गिक आपत्ती नुकसान व अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर सरासरी उत्पन्नात झालेली घट यातील फरक रक्कम यासंदर्भात कंपनीने तयार केलेले अहवाल पुनर्तपासनी करावेत व तातडीने शेतकऱ्यांचा उर्वरित विमा अदा करावा, असे निर्देश आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. बीड जिल्ह्यासह बुलढाणा, यवतमाळ यांसह विविध जिल्ह्यातील प्रलंबित पीक विमा याबाबत आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी पीक नुकसानी बाबतची माहिती विमा कंपनीस उशिरा मिळाल्या असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी संबंधित नुकसानीच्या अहवालांची बारकाईने पुनर्तपासनी केली जावी. अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर द्यावयाच्या अंतिम रक्कमा निश्चित करताना सरासरी उत्पन्न व अन्य निकषांचा योग्य पद्धतीने विचार व्हावा, अ

पूर्णवाद जीवन कला मंदिरात गुरुपोर्णिमा उत्सव उसाहात साजरा

इमेज
  पूर्णवाद जीवन कला मंदिरात गुरुपोर्णिमा उत्सव उसाहात साजरा प्रतिनिधी, परळी - येथील विद्यानगर भागातील पूर्णवाद जीवन कला मंदिरात पूर्णवाद परिवाराचे प्रणेते डॉ. प. पू. श्री. रामचंद्र महाराज पारनेरकर  यांच्या स्थानिक साधकांकडून रविवारी गुरुपोर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी महाराजांच्या मूर्तीवर वेदांत विनयराव देशपांडे यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर पाद्यपूजा करण्यात आली. पूजा, अभिषेकाचे पौरोहित्य नीलेश पुजारी यांनी केले. दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील पूर्णवादी शिक्षिका मीना प्रमोदराव देशपांडे यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी गुरुंचे जीवनातील स्थान, महत्त्व विषद केले. मीना देशपांडे यांचे संध्या बुद्रुककर यांनी स्वागत केले. तर सूत्रसंचालन मुकुंद बुद्रुककर यांनी केले. कार्यक्रमास निवृत्त न्यायाधीश प्रमोद  देशपांडे, मंदिराच्या अध्यक्षा वनिता वामनराव देशपांडे, परळीतील वैद्य डॉ. आनंद टिम्बे, उपसंपादक अनंत कुलकर्णी, अलका मुंडे, सुभाष देशपांडे, मीरा सितापती, ओम प्रकाश चिखले, मंगल देशपांडे, विद्या देशपांडे, सुश्रुत द

११ व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड

इमेज
समकालीन भवतालाचा अंतर्बाह्य वेध घेणारा लेखक: बालाजी सुतार जागतिकीकरणामुळे जे आमूलाग्र बदल झाले त्या विविधांगी बदलांचा अंतर्बाह्य वेध आपल्या सकस लेखणीतून  घेणाऱ्या साहित्यकाराची अर्थातच बालाजी सुतार यांची मराठवाडा साहित्य परिषद अंबाजोगाई शाखेच्या वतीने आयोजित ११ व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  एकमताने निवड करण्यात आली आहे.हे विलक्षण आनंददायी आहे.  खराखुरा लेखक संमेलनाध्यक्ष होतो आहे. हे ऐकून-वाचून लई भारी वाटतंय! अंबाजोगाईच्या साहित्य संमेलनाध्यक्ष निवडीच्या प्रथा आणि परंपरेनुसार पुर्वाध्यक्ष प्रख्यात कवी-गीतकार डॉ.दासू वैद्य यांनी बालाजी सुतार यांचं नाव बंद लिफाफ्यात अंबाजोगाईच्या मसाप कार्यकारिणीला कळवलं.  पूर्वाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक दासू वैद्य,मसाप कार्यकारिणी अध्यक्ष दगडू (दादा) लोमटे, सचिव गोरख शेंद्रे, अमर हबीब ,डॉ. राहुल धाकडे,सर्व सदस्य,  स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांचं मनःपूर्वक अभिनंदन ! हा बहुमान   ग्रामीण भागातील लिहित्या हातांचा नावलौकिक वाढवणारा आहे.या पूर्वीही महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इस्लामपूर व राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनी, इस्लामपूर आय

भावपूर्ण श्रद्धांजली:देवानंद जोगदंड यांना मातृशोक

इमेज
देवानंद जोगदंड यांना मातृशोक  अंबाजोगाई, प्रतिनिधी... बोधीघाट अंबाजोगाई येथील रहिवाशी व जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग परळी वै. येथे कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर शासकीय सेवेत कार्यरत असलेले आयु. देवानंद श्रीरंग जोगदंड यांच्या मातोश्री बौद्धउपासिका, ज्येष्ठ नागरिक सुलोचना श्रीरंग जोगदंड यांचे दिनांक 20 जुलै 2024 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.       त्या नेहमी सामाजिक, धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर राहत असत. त्यांनी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या कार्याची एकूण 37 पुस्तके व ग्रंथाचे वाचन केले असून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही जाणीव त्यांच्यामध्ये सतत तेवत असायची. त्यांचा सामाजिक कार्याबद्दल विविध  ठिकाणी त्यांचे सत्कारही करण्यात आलेले होते. त्यांच्या या अकस्मिक निधनाने सामाजिक, धार्मिक क्षेत्रात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या परिवारात एक मुलगा ,मुलगी, सून व नातवंड असा परिवार आहे.

सर्व स्तरातील घटकांना न्याय देणारा समृध्द अर्थसंकल्प - आ. पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

इमेज
  सर्व स्तरातील घटकांना न्याय देणारा समृध्द अर्थसंकल्प - आ. पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया मुंबई।दिनांक २३। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प हा देशातील महिला, तरुण, नोकरदार तसेच शेतकऱ्यांसह मोल मजुरी करणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राथमिकपणे प्राधान्य देणारा  असा समृध्द अर्थसंकल्प आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत पाच वर्ष मोफत अन्नधान्य', गरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून एक कोटी घरे, नैसर्गिक शेती आणि शेतीच्या उत्पादकतेत वाढ करण्याचे ध्येय, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी माफक व्याजावर दहा लाखांचे कर्ज, युवकांना पहिल्या नोकरीत सरकारकडून अर्थसाह्य तसेच नोकरदारांना आयकरातून सूट, सर्व राज्य सरकारांना १५ वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज अशा विविध महत्वाकांक्षी व जनतेचे जीवनमान सुधारणेसाठी वैविध्यपूर्ण पैलूंचा समावेश असणारा सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प जाहिर केल्याबद्दल केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री श्री.नरेंद्र

भावना दुखविणारा व्हिडीओ प्रसारित केल्या प्रकरणी पुन्हा दोघांवर गुन्हा दाखल

इमेज
  भावना दुखविणारा व्हिडीओ प्रसारित केल्या प्रकरणी पुन्हा दोघांवर गुन्हा दाखल केज :- सोशल मीडियावर एका प्रार्थना स्थळाचा आक्षेपार्ह व्हिडिओ व पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा अन्य एका समाजाच्या भावना दुखावणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्या प्रकरणी अन्य दोघा विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.  केज शहरातील मोंढा मार्केट जवळ वास्तव्यास असलेल्या बिलाल शेख व अजीजपुरा भागातील हकीम शेख या दोघांनी २२ जुलै रोजी रात्री ८:०० वा. च्या सुमारास एका समाज बांधवांच्या भावना दुखावतील असा व्हीडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर प्रसारीत केला. या दोघांनी दोन भिन्न समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे उद्देशाने सदरचा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर सर्वांना दिसेल अशा रितीने प्रसारित केल्याची तक्रार पोलीस जमादार त्रिंबक सोपणे यांनी दिल्या वरून बिलाल शेख, हकीम शेख या दोघां विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या  प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अनुक्रमे पोलीस जमादार त्रिंबक सोपने आणि पोलीस जमादार श्र

राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस; पेरण्या समाधानकारक

इमेज
  राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस; पेरण्या समाधानकारक राज्यात सरासरीच्या १२३.२ टक्के पाऊस झाला असून पेरण्या देखील समाधानकारक झाल्या आहेत. या संदर्भातील सादरीकरण आज कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत केले.   राज्यात २२ जुलैपर्यंत ५४५ मि.मी. पाऊस झाला आहे.  मागील वर्षी याच सुमारास ४२२ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या ९५.४ टक्के पाऊस झाला होता.  राज्यात खरीपाचे ऊस वगळून १४२.२ लाख हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत १२८.९४ लाख हेक्टर क्षेत्रावर (९१ टक्के) पेरणी झाली आहे.  भात व नाचणी पिकाची पुर्नलागवड कामे सुरु असून ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, भुईमूग आणि कापसाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. खत आणि बियाणांची पुरेशी उपलब्धता  आहे.  पाणी साठा : सध्या राज्यातील सर्व धरणांमध्ये ३९.१७ टक्के पाणी साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ४३.६५ टक्के पाणी साठा होता.  सर्वात कमी म्हणजे १२.१३ टक्के पाणी साठा छत्रपती संभाजीनगर येथे तसेच २८.३४ टक्के नाशिक येथे आहे. राज्यातील १ हजार २१ गावे आणि २ हजार ५१८ वाड्यांना १ हजार ३६५ टँकर्सद्धारे पाणीपुरवठा सुरु आहे. टँकर्सची संख्या ३२६ ने वाढली आहे.

प्रकाश अण्णा शेंडगे , प्रा.टी.पी.मुंडे सर यांच्यासह ओबीसी नेते करणार मार्गदर्शन!!

इमेज
  ओबीसी बहुजन पार्टी - मराठवाडा विभाग प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा! प्रकाश अण्णा शेंडगे , प्रा.टी.पी.मुंडे सर यांच्यासह ओबीसी नेते करणार मार्गदर्शन!! परळी वैजनाथ - प्रतिनिधी : ओबीसी बहुजन पार्टी, महाराष्ट्र राज्य मराठवाडा विभागीय मेळाव्याचे परळीत 25 जुलै रोजी सकाळी ठीक 11 वाजता *श्रद्धा मंगल कार्यालय* येथे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यात मराठवाड्यातील पक्ष बांधणीसाठी जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात येणार आहे. या मेळाव्याला ओबीसीचे प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी बहुजन पार्टीचे दक्षिण मराठवाडा अध्यक्ष मा. श्री. भीमराव मुंडे, जिल्हाध्यक्ष मा. श्री.विनायकराव गडदे आणि तालुकाध्यक्ष मा. श्री. सूर्यकांत मुंडे यांनी केले आहे.     हा मेळावा दोन सत्रामध्ये संपन्न होणार असून पहिले सत्र सकाळी 11 ते दुपारी 2 व भोजनानंतर दुसरे सत्र दुपारी 3 ते सायं. 5:30 पर्यंत चालणार आहे. या सत्रामध्ये प्रमुख ओबीसी नेते मार्गदर्शन करणार आहेत.  या मेळाव्याला ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्

विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीकडून लढणार

इमेज
  जागा काँग्रेसच्या वाट्याला: परळी विधानसभा निवडणूक लढविणार - राजेसाहेब देशमुख श्रीक्षेत्र प्रभु वैद्यनाथ  ळनगरीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच सर्वधर्मीय, सर्वसामान्य माणसाला सुख, समाधान, आनंदी व भयमुक्त वातावरणात जगता यावे, तसेच परळी शहर व मतदारसंघात शांतता, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण निवडणूक लढविणार आहोत अशी घोषणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी मंगळवार दिनांक २३ जुले रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून केली.        आपण निवडणूक लढवावी अशी परळी विधानसभा मतदारसंघातील सर्वधर्मिय ,मतदारांची आणि सर्वसामान्य माणसाची प्रामाणिक इच्छा आहे. त्यांच्या भावनेचा आदर करून तसेच परळीचा सर्वांगिण विकास, श्रीक्षेत्र प्रभु वैद्यनाथ यांच्या नगरीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहोत.   याबाबत मी व माझ्या सहकाऱ्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय नेत्या खासदार सौ. रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्

कृषी क्षेत्राचा विकास ही देशाची प्राथमिकता असल्याचे यातून सिद्ध होते - धनंजय मुंडे

इमेज
  अर्थसंकल्प : विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी टाकलेले सकारात्मक पाऊल, कृषी विकासाला प्राधान्य- धनंजय मुंडे कृषी क्षेत्राचा विकास ही देशाची प्राथमिकता असल्याचे यातून सिद्ध होते - धनंजय मुंडे यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया मुंबई (दि. 23) - केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारत सरकारने पाहिलेल्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने टाकलेले सकारात्मक पाऊल हा आजचा अर्थसंकल्प आहे. विकसित भारताची पायाभरणी करण्यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासाला प्राथमिक प्राधान्य देण्यासह आवश्यक असणाऱ्या महत्त्वपूर्ण तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते धनंजय मुंडे यांनी आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर व्यक्त केली आहे.  केंद्रीय अर्थसंकल्पात ज्या प्रमुख चार घटकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे त्यामध्ये शेतकरी, गरीब, महिला आणि युवा यांचा प्रामुख्याने समावेश आहे. कृषी क्षेत्रासाठी एक लाख 52 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून 1 फेब्रुवारी, 2024 रोजी अंतरिम

सद्गुरूच योग्य मार्ग दाखवून कल्याणाचा महामंत्र देतो -स्वामी निरूपानंदजी

इमेज
  दिव्य ज्योति जाग्रति संस्थानची गुरूपोर्णिमा परळीत उत्साहात साजरी गुरू-शिष्य परंपरेतूनच विश्वात्मक कल्याण साध्य होते-सुश्री शैलासा भारतीजी सद्गुरूच योग्य मार्ग दाखवून कल्याणाचा महामंत्र देतो -स्वामी निरूपानंदजी परळी वै./प्रतिनिधी भारत हा गुरू परंपरेवर विश्वास ठेवणारा, त्यांना मानणारा असून गुरू-शिष्य परंपरेतूनच विश्वात्मक कल्याण साध्य होते. अर्थातच श्रद्धा, विश्वास, विनम्रता व शालीनता शिष्यात असणे आवश्यक असून अशा सदाचारी व्यक्तीला गुरूवर्य योग्य मार्ग दाखवून त्याचे कल्याण करतात असे विचार प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांचे कृपापात्र शिष्या सुश्री शैलासा भारतीजी यांनी व्यक्त केले.  परळी येथील हालगे गार्डन येथे आज मंगळवार दि.23 जुलै रोजी दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या वतीने आयोजित गुरू पोर्णिमा उत्सव 2024 प्रसंगी प.पू.सर्वश्री आशुतोषजी महाराज यांच्या कृपापात्र शिष्या सुश्री शैलासा भारतीजी बोलत होत्या. कार्यक्रमस्थळ भक्तांनी आकर्षकरित्या सजविल्याने आनंदी व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. परिसरात रांगोळी काढून आणि सुशोभिकरण केल्याने वातावरण प्रसन्न दिसत होते. प्रवेशद्वारालाच प.पू.सर्व

प्रितम मुंडे यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत

इमेज
  निराधारांना आधार आणि सर्वसामान्यांना सन्मान देणारा अर्थसंकल्प प्रितम मुंडे यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत बीड । दि. २३ ।  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. निराधारांना आधार देणारा आणि सर्वसामान्यांना सन्मान देणारा अर्थसंकल्प' अशा शब्दात मा.खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्व घटकांचा विचार केलेला आहे. गरिब, महिला, तरुण आणि शेतकऱ्यांना प्राधान्य देताना भविष्यातील ‘विकसित भारताची' रचना या अर्थसंकल्पात समाविष्ट केलेली आहे. कृषी उत्पादनाला दिलेली प्राथमिकता अन्नदात्या बळीराजाचा सन्मान वाढवणारी आहे. तसेच महिला आणि मुलींसाठी तीन लाख कोटींची केलेली तरतूद, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तीन कोटी घर, शेती आणि संलग्न क्षेत्रांसाठी भरीव तरतूद, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत पाच वर्ष मोफत अन्नधान्य' या सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या आणि त्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या तरतुदी आ

प्रा. लक्ष्मण हाके यांचे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आवाहन

इमेज
ओबीसींचे आरक्षण टिकवण्यासाठी भूमिका स्पष्ट करावी  प्रा. लक्ष्मण हाके यांचे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आवाहन  गेवराई  : ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही लढा उभारलाय. आता सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अन प्रमुखांनी या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केले आहे. गेवराई मध्ये आयोजित जनसंवाद मेळाव्यात ते ओबीसी बांधवांसमोर बोलत होते.           प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी जनसंवाद दौऱ्यास सुरुवात केली असून त्यांचे बीड जिल्ह्यात ओबीसी बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. गेवराई येथे जनसंवाद मेळाव्यात त्यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे हे जाणीवपूर्वक ओबीसींच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत. त्यांना निवडणूक पराभूत निवडणुकीत पराभूत करण्यासाठी बैठका देखील त्यांनी घेतल्या आहेत. जरांगे पाटील यांची लढाई ही गरजवंतांसाठी नसून केवळ वर्चस्ववादासाठी असल्याचे देखील आरोप हाके यांनी केला. ओबीसींनी आता आपल्या पायातील गुलामीचे जोखड झुगारून दिले पाहिजे तरच तुमचा आवाज विधानसभा,

श्री संत गुरुलिंग स्वामी मठ संस्थान तर्फे स्वागत

इमेज
 पी एम पी एम एल चेअरमन दिपा मुधोळ यांनी घेतले श्री वैद्यनाथांचे दर्शन श्री संत गुरुलिंग स्वामी मठ संस्थान तर्फे स्वागत परळी -पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या( पी एम पी एम एल ) चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ - मुंडे यांनी सोमवारी देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले .यावेळी परळी चे उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर उपस्थित होते. यावेळी पी एम पी एम एल चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ यांचे श्री संत गुरुलिंग स्वामी मठ संस्थान (बेलवाडी )चे अध्यक्ष दत्तापा ईटके गुरुजी, सचिव ऍड गिरीश चौधरी, ऍड. मनोज संकाये , चंद्रकांत उदगीरकर, शिवा चोंडे ,राजेंद्र ओझा, संजय खाकरे यांनी स्वागत केले.बीड च्या जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ - मुंडे यांनी उल्लेखनीय काम केले असून त्यांनी आपल्या कामाचा ठसा चांगला उमिटविला होता. जूनच्या शेवटच्या आठवड्यात त्यांची बीड येथून बदली झाल्या नंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या( पी एम पी एम एल )  चेअरमन व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली ,तेथे पदा

25 वर्षांपासूनची कायम

इमेज
जय्यत तयारी; दिव्य जागृती संस्थानच्या वतीने परळीत मंगळवारी गुरूपोर्णिमा महोत्सव जिल्ह्यातील 5 हजार भक्तांच्या उपस्थितीत गुरु पौर्णिमा; 25 वर्षांपासूनची  कायम परळी वैजनाथ/प्रतिनिधी  दिव्य जागृती संस्थानच्या वतीने आज मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी गुरूपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परळीत दिव्य ज्योती जागृती संस्थानची गुरूपौर्णिमेची 25 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिरजवळ असलेल्या हालगे गार्डन येथे जय्यत तयारी करण्यात येत आहे. या कार्यक्रमास बीड जिल्ह्यातून 5 हजार भाविक येणार आहेत. दिव्य जागृती संस्थानच्या वतीने दरवर्षी गुरूपौर्णिमेचा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. त्यानुसार यंदा उद्या 23 जुलै रोजी सकाळपासून विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी 9 वाजता भारतीय संस्कृती नुसार वेद मंत्राचे उच्चारण होणार आहे. सकाळी 10 वाजता गुरू महाराजांची आरती होईल. 10.30 वाजता सत्संग प्रवचन, भजन होणार आहे. दिल्ली येथील गुरु महाराजांच्या शिष्यांचे यावेळी प्रवचन होणार आहे. त्या अनुषंगाने कार्यक्रमाची जय्यत तयारी केली जात आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरू म

प्रा.टी.पी.मुंडे यांच्याकडून लहाने कुटुंबीयांचे सांत्वन

इमेज
 प्रा.टी.पी.मुंडे यांच्याकडून लहाने कुटुंबीयांचे सांत्वन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी       ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी लहाने कुटुंबीयांचे  कुटुंबीयांचे त्यांच्या राहत्या घरी माकेगाव येथे भेट घेऊन सांत्वन केले आणि कुटुंबीयांना दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला.    प्रसिद्ध डोळ्याचे तज्ञ डॉ. श्री. तात्याराव लहाने यांच्या मातोश्री अंजनाबाई यांचे वृद्धपकाळाने निधन झाले त्यानिमित्ताने त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. लहाने यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्याचबरोबर कुटुंबीयांचे सरांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुखातून परमेश्वर सावरण्याची शक्ती देवो तसेच त्यांच्या प्रति भावपूर्ण श्रद्धांजली यावेळी त्यांनी अर्पण केली.    यावेळी ओबीसी बहुजन पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष भीमराव मुंडे, तालुकाध्यक्ष सूर्यकांत मुंडे, जीवा लहाने ,बालाजी लहाने आदी उपस्थित होते.

संतांच्या आनंदी जगाचे स्वप्न संविधानानेच पूर्ण होईल-ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचा आशावाद

इमेज
संतांच्या आनंदी जगाचे स्वप्न संविधानानेच पूर्ण होईल-ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचा आशावाद  नाशिक : ‘गेल्या सातशे वर्षांपासून संतांनी जे आनंदी जगाचे स्वप्न पाहिले तेच साकार करणारे भारतीय संविधान आहे. संतांनी ज्या विचारांचा जागर या महाराष्ट्रात सात शतके केला त्याच विचारांचा विजय म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला.’ असे प्रतिपादन ह. भ. प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले. डॉ नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेतील 227 वे पुष्प  ‘संत साहित्यातील संविधान मूल्ये’ या विषयावर गुफतांना ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर बोलत होते.  ह. भ. प. सोन्नर यांनी म्हटले की, भारतीय संविधान म्हणजे हिंदूंच्या विरोधातील कारस्थान असल्याचा अपप्रचार काही लोक कीर्तनाच्या माध्यमातून करीत असतात. परंतु वेगवेगळ्या संतांच्या अभंगांचे दाखले देत ह.भ.प. सोन्नर यांनी स्पष्ट केले की समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय याच मूल्यांचा जागर करत संतांनी आनंदी जगाचे स्वप्न पाहिले आणि तीच मूल्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात समाविष्ट केलेली आहेत. आपलं संविधान अमेरिकेपेक्षा प्रगल्भ असल्याचा पुरावा देताना ह.भ.प. सोन्नर