पोस्ट्स

ऑगस्ट ४, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

थाईलेसिमिया आजाराने त्रस्त असणाऱ्या नवल माळवदकर परिवाराच्या चेहेऱ्यावर हास्य फुलविले

इमेज
  76 व्या वेळी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासणारा पोलीस कर्मचारी दत्तात्रय गायकवाड थाईलेसिमिया आजाराने त्रस्त असणाऱ्या नवल माळवदकर परिवाराच्या चेहेऱ्यावर हास्य फुलविले परळी/प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची उत्तम उदाहरण असलेल्या परळी वैजनाथ येथील रहिवासी व नांदेड येथे कार्यरत असलेल्या दत्तात्रय गायकवाड या पोलीस कर्मचार्‍याने एक  आदर्श निर्माण करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. थाईलेसिमिया या आजाराने त्रस्त असणाऱ्या नवल माळवदकर या बालकास  परळीतील रहिवाशी असलेले पोलीस कर्मचारी, श्री. दत्तात्रय गायकवाड यांनी रक्तदान करून समाजासाठी एक प्रेरणादायक संदेश दिला आहे.सामाजिक कार्यात आपल्या सक्रिय सहभागामुळे श्री. दत्तात्रय गायकवाड यांचे नाव एक आदर्श म्हणून घेतले जाते. त्यांनी आपल्या 76 व्या रक्तदानाने अनेकांची जीवनरक्षणात मदत केली आहे, आणि त्यांच्या या कार्यामुळे रक्ताच्या अभावी होणाऱ्या अनेकांची अडचण दूर झाली आहे.त्यांच्या रक्तदानाच्या या अविरत कार्यामुळे अनेक रुग्णांची जीवंत राहण्याची आशा वाढली आहे. श्री. गायकवाड यांचे कार्य समाजात रक्तदानाची गरज आणि महत्व यावर जागरूकता निर्माण करत

परळीत भरवस्तीत घरफोडी, सव्वादोन लाखाचे दागिने लंपास

इमेज
  परळीत भरवस्तीत घरफोडी, सव्वादोन लाखाचे दागिने लंपास परळी (प्रतिनिधी)  परळी शहरातील गजबजलेल्या स्नेहनगर भागात शुक्रवार दि.9 ऑगस्ट रोजी पहाटे धाडसी चोरी झाली असुन कपाटात ठेवलेले 2 लाख 28 हजार 500 रुपयांचे  सोन्या चांदीचे दागिणे लंपास केल्याची घटना घडली.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  परळी शहरातील स्नेहनगर भागातील गोपाल श्रीकिशन पुरोहित यांच्या घराचे कुलुप तोडुन शुक्रवार दि.9 ऑगस्ट रोजी पहाटे 2 ते 4 च्या दरम्यान घरात प्रवेश करुन कपाटाच्या लॉकर मध्ये ठेवलेले तीन तोळ्याचे मंगळसूत्र,एक तोळ्याच्या बिंदीया,दोन तोळ्याच्या अंगुठा,एक तोळ्याची साखळी,चांदीचे शिक्के,चैन,ग्लास,जोडवे असे 2 लाख 28 हजार 500 रुपयांचे दागिणे लंपास केले आहेत.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात कलम 331(4),305 बीएनएस 2023 कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाने हे करत आहेत. .............. शहरात मोठा गाजावाजा करत CCTV बसवूनही छोटे मोठे गुन्हे सतत घडत आहेत. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी रात्रगस्तीचे प

दिग्दर्शक डॉ.अनिलकुमार साळवे यांना मातृशोक

इमेज
  दिग्दर्शक डॉ.अनिलकुमार साळवे यांना मातृशोक  माजलगाव (प्रतिनिधी):- सिने-नाटय लेखक-दिग्दर्शक  प्रा.डॉ. अनिलकुमार साळवे यांच्या मातोश्री केशरबाई उत्तमराव साळवे यांचे गुरुवार दि.८ रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर माजलगाव येथील मंगलनाथ स्मशानभूमीत दुपारी 1 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.       मातोश्री केशरबाई साळवे या गेल्या काही दिवसांपासून आजारी यातच त्यांचे भिमनगर येथील राहत्या निवासस्थानी दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ६५ वर्ष होते.  मायाळू स्वभावाची व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ महिला म्हणून त्या परिसरात परिचित होत्या. माजलगाव  नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती राजेश साळवे यांच्या त्या काकू होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.      त्यांच्या निधनाने सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. अंत्यसंस्कार प्रसंगी सिने नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गज तसेच माजलगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी किसान सभेनी केली परळी तहसील कार्यालय निदर्शने

इमेज
  शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी किसान सभेनी केली परळी तहसील कार्यालय निदर्शने  परळी ता.8 प्रतिनिधी       शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर लावलेले होल्ड काढावेत, वाण धरणावरील तोडलेली वीज तात्काळ जोडून द्यावी, मागच्या वर्षीचा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. या मागणीसाठी गुरुवारी ता.8 महाराष्ट्र राज्य किसान सभेनी परळी तहसील कार्यालयावर निदर्शने केली. या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ अजय बुरांडे, जिल्हा सचिव कॉ मुरलीधर नागरगोजे, कॉ सुदाम शिंदे, कॉ भगवान बडे, धनंजय सोळंके, कॉ मनोज देशमुख, कॉ पप्पु देशमुख आदींची उपस्थिती होती. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी स्वीकारले.

विशाल राष्ट्रध्वजाची वैद्यनाथ मंदीर प्रांगणात उभारणी करावी-योगेश पांडकर

इमेज
  विशाल राष्ट्रध्वजाची वैद्यनाथ मंदीर प्रांगणात उभारणी करावी-योगेश पांडकर  परळी प्रतिनिधी: परळी शहरालगत असलेल्या बालाघाट डोंगरावरील १५० फूट उंचीचा विशाल तिरंगा ध्वजाचे १३ ऑगस्ट २०२२ साली पालकमंत्री ना.धनंजय मुंडे ,माजी खा.प्रीतमताई मुंडे,जिल्हाधिकारी, तहसीलदार,नगर परिषदेचे मुख्याधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पाडून फडकवला होता.  आपल्या परळी ची शान वाढवत परळीच्या पंचक्रोशीतून हा ध्वज दिसत होता तसेच परळी शहरात प्रभू वैजनाथाचं दर्शन घेण्यासाठी देशातून अनेक भाविक येत असतात त्यांनाही हा तिरंगा ध्वज आकर्षित करत असत पण मागील काही महिन्यात हा ध्वज दिसत नसून फक्त खांब दिसत आहे.   नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना वेळोवेळी निवेदन दिले होते पण काही दिवस हा ध्वज फडकवून नंतर काढून घेतात. हा तिरंगा ध्वज डोंगरावर असल्याने वाऱ्याचा वेग जास्त येत असेल आणि त्यामुळे काही अडचणी येत असतील तर या ध्वजाची जागा बदलून प्रभू वैद्यनाथ मंदिर च्या प्रांगणात फडकवला जाऊ शकतो.   स्वातंत्र दिवस जवळ येत आहे त्यामुळे १५ ऑगस्ट पूर्वी हा १५० फुटी विशाल तिरंगा ध्वज फडकवला जावा आणि वैद्यनाथ मंदिर जवळील प

बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई होणार: जनतेने प्रशासनाला आवगत करावे

इमेज
  बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई होणार: जनतेने प्रशासनाला आवगत करावे       बीड, दि. 6 (जि. मा. का.) बोगस वैद्यकीय व्यवसायीक आढळल्यास कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे निर्देश आज झालेल्या बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत एकत्रितरीत्या घेण्यात आले.     आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची बैठक घेण्यात आली.या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, प्र.पोलीस उपअधीक्षक उमा शंकर कस्तुरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एल. आर. तांदळे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन आर.एम. बजाज, यांच्यासह समितीवरील सदस्य उपस्थित होते. जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची स्थापना महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षक व औषधी द्रव्य विभाग निर्णय क्र.सीआयएम 1099/ प्र.क्र.355/99/अधिनियम/दि. 07/02/2000 अन्वये गठित करण्यात आलेली आहे. या अंतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात येते.  आज झालेल्या  बैठकीतील चर्चेनुसार बोगस वैद्यकीय व्यवसायिकांवर जिल्हयात आढळल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल तसेच नागरीकांना अशी माहिती आढळल्यास त्यांनी प्रशासनाकडे ती दयावी. त्यावर योग

94.34% अर्जांची छाननी करून स्वीकृती मोबाईल संदेश

इमेज
  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : बीड जिल्ह्यात 'या' तारखेला पडणार पैसे ! 94.34% अर्जांची छाननी करून स्वीकृती मोबाईल संदेश बीड, 1 : बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 3 लाख 52 हजार 880 महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये अर्ज दाखल केले असून 94.34 % टक्के अर्जांची छाननी करून मोबाईलव्दारे स्वीकृती संदेश  देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांची नोंदणी आणि अर्जाची पडताळणी करण्याची विशेष मोहीम जिल्हयात सुरू असून याअंतर्गत 3 लाख 52 हजार 880 महिलांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी करून 3,32,892 लाभार्थी महिलांच्या अर्जांना स्वीकृती देऊन मोबाईल संदेश पाठविण्यात आलेले असून आजपर्यंत  94.34 %टक्के काम झालेले आहे.           ज्यांचा ऑनलाईन अर्ज भरतांना कागदपत्राच्या बाबतीत  काही त्रुट्या आढळून आले आहेत. त्यांच्या मोबाईलवर संदेश जात असून अश्या अर्जदार महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ज्या मोबाईल ऍप वरून ऑनलाइन अर्ज भरला आहे त्याच मोबाईल मधून अर्ज दुरूस्त (एडिट) करून अर्जाची त्रुटी पूर्तता पूर्ण करून

बीडसाठी आणखी एक 'अविनाश' : नवे पोलीस अधीक्षक म्हणून अविनाश बारगळ

इमेज
  बीडसाठी प्रशासनात आणखी एक 'अविनाश' : नवे पोलीस अधीक्षक म्हणून अविनाश बारगळ बीड दि.7 (प्रतिनिधी): पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या जागी अविनाश बारगळ अमरावतीवरून येतं आहेत. बारगळ यांची अमरवतीतील कारकीर्द राज्यात चर्चेत राहणारी ठरलेली होती. नंदकुमार ठाकूर यांची बदली झाली असली तरी त्यांना नवीन ठिकाणी अजून नियुक्ती मिळालेली नाही.         बीडमध्ये नंदकुमार ठाकूर यांनी दोन वर्ष सेवा बजावल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अविनाश बारगळ बीडला येतं आहेत. बारगळ यांनी अमरवतीमध्ये चार वेळा पोलीस विभागात सेवा बजावली आहे. अतिरिक्त पोलिस अधिक्षक त्यानंतर पोलिस उपायुक्त म्हणून अमरावती शहरात त्यांनी कार्यकाळ उपभोगल्यानंतर अमरावतीपोलीस अधिक्षक आणि नंतर पुन्हा अमरावतीमध्येच सीआयडीचे अधीक्षक म्हणून गृहविभागाने त्यांना काम करण्याची संधी दिली होती. एकाच शहरात चार वेळा पोलीस दलात वेगवेगळ्या पदावर काम करणारे अधिकारी म्हणून बारगळ यांची राज्यात मोठी चर्चा झाली होती. आता ते अमरावतीच्या सीआयडी विभागातून बीडला पोलीस अधिक्षक म्हणून येतं आहेत. एक चा

शौर्य सीएनजी पंपाचे उद्घाटन

इमेज
शौर्य सीएनजी पंपामुळे प्रदूषणावर मात होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेस चालना मिळेल - कृषिरत्न श्री. बी.बी.ठोंबरे परळी प्रतिनिधी. परळी शहरात स्थापन झालेला शौर्य सीएनजी पंप नॅचरल शुगर, रांजणी येथे निर्माण होत असलेल्या बायो सीएनजी तत्वावर आधारीत असल्यामुळे परळी परिसरात होणाऱ्या वाहन प्रदूषणावर मात होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेस चालणा मिळेल असे उद्गार कार्यक्रमाचे उद्घाटक, नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज, रांजणीचे चेअरमन कृषीरत्न श्री बी. बी. ठोंबरे यांनी केले.  परळी शहरात आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी शौर्य सीएनजी पंपाचे उद्घाटन नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज चे चेअरमन श्री बी. बी. ठोंबरे व शौर्य सीएनजी पंपाच्या संचालिका सौ.उषा किरण गित्ते यांच्या हस्ते तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता प्रदूषण नियंत्रणासाठी आपण हरित उर्जेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. नविन अत्याधूनिक तंत्रज्ञानामुळे शेती उत्पादनातून बायो सीएनजी तयार करणे शक्य झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पन्नामध्ये वाढ होण्याबरोबर वाहन प्रदूषण देखील नष्ट होईल. ही बाब लक्षात

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात घेतला आढावा

इमेज
  कृषी पूरक साहित्याचे वितरण शेतकऱ्यांना ताबडतोब करावे - कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात घेतला आढावा मुंबई दि ८ ऑगस्ट २०२४- महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले पॉवर स्प्रे पंप शेतकऱ्यांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील तसेच राज्यातील पूरबाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत नुसानभरपाई देण्याच्या अनुषंगाने नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावे, तसेच विविध योजनांसाठी वितरित करण्यात आलेला निधी शेतकऱ्यांच्या खात्यात ताबडतोब वर्ग करण्यात यावा असे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिले. कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषिमंत्री धनंजय मुंडे बोलत होते. या बैठकीस कृषी विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती व्ही राधा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प संचालक  परिमल सिंह, बाळासाहेब ठाकरे ग्रामीण कृषी विकास प्रकल्प संचालक हेमंत वसेकर, कृषी संचालक विनायकुमार आवटे, सर्व विभागीय कृषी सहसंचालक, सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रक

12 ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा

इमेज
  बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचा जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर 12 ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा-प्रा.बी.जी खाडे परळीवैजनाथ:- बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटना (लाल बावटा) च्या वतीने बांधकाम कामगारांच्या प्रश्नांबाबत आदर्श नगर बीड येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर भव्य मोचा 12 ऑगस्ट रोजी काढण्यात येणार आहे असे संघटनेचे अध्यक्ष प्रा.बी.जी. खाडे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केले आहे.          महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनच्या वतीने पूर्ण महाराष्ट्र‌भर 12 आँगस्ट रोजी कामगार अधिकारी कार्यालय, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चे काढण्यात येणार आहेत. बांधकाम कामगारांना 20 हजार रुपये दिपवाळीसाठी सानुग्रह अनुदान द्या, 2019 प्रमाणे कामगारांना व्यवसायाचे साहीत्य खरेदीसाठी प्रत्येकी दहा हजार रुपये द्या, ७० वर्षावरील बांधकाम कामगारांना मासीक दहा हजार रूपये पेन्शन द्या, सुरक्षा संच, भांडी संचऐवजी त्याच्या किंमती एवढी रक्कम २० कामगारांच्या खात्यात जमा करा, घरबांधणी योजनेचे अनुदान साडेचार लाख करा, सर्व योजनेचे लाभ अर्ज केल्यानंतर दोन महिन्याच्या आत द्या, बोगस कामगारांची नोंद

कीर्तनकार शि.भ.प.विश्वनाथ स्वामी पेनुरकर यांचे प्रतिपादन

इमेज
  भौतिक युगात माणसाला सुखाची प्राप्ती व दुःखाचे निस्सारण व्हावे यासाठी नामसंकिर्तन, भजन, प्रवचन, सत्संग यांची आवश्यकता ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या तपोनुष्ठानात कीर्तनकार शि.भ.प.विश्वनाथ स्वामी पेनुरकर यांचे प्रतिपादन परळी वै./प्रतिनिधी श्रावण मासाचे औचित्य साधून परळी वैजनाथ येथील पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेले श्री शनि मंदिर  येथे दि.5 ते दि.17 ऑगस्ट पर्यंत ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांचे श्रावणमास तपोनुष्ठान व परमरहस्य पारायणास सुरुवात झाली असून सलग 13 दिवस चालणा-या तपोनुष्ठानात परमरहस्य पारायम सोहळ्यास शहर व परिसरातील भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.  सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी उपस्थित भाविक भक्तांशी संवाद साधताना कीर्तनकार शि.भ.प.विश्वनाथ स्वामी पेनुरकर यांनी सांगितले की, ...काही ऐसे करावे,सुखाचे मळे पिकवावे! अमुलाग्र नासून जावे,विघ्न बाधा !! या संतश्रेष्ठ श्री मन्मथ माऊलीच्या उक्तीप्रमाणे भौतिक युगात माणसाला सुखाची प्राप्ती व दुःखाचे निस्सारण व्हावे यासाठी नामसंकिर्तन, भजन,प्रवचन,सत्संग यांची आवश्यकता असल्

श्रावणमास पर्व : श्री केदारेश्वर मंदिर व परिसरात प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी नाथ शिक्षण संस्थेकडून आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट

इमेज
  श्रावणमास पर्व : श्री केदारेश्वर मंदिर व परिसरात प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी नाथ शिक्षण संस्थेकडून आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-    अंबाजोगाई शहरातील जागृत देवस्थान श्री केदारेश्वर मंदिर व परिसरात राज्याचे कृषीमंत्री तथा बीडचे पालकमंत्री  ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ शिक्षण संस्थेच्या वतिने श्रावणमास पर्व निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली असल्याची  माहिती नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांनी केले आहे.  सोमवार दि.०५ ऑगस्ट पासून पवित्र श्रावणमास महिन्यास सुरुवात होत आहे. अंबाजोगाई शहरातील जाग्रत देवस्थान  श्री केदारेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी श्रावणमासासात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ शिक्षण संस्थेच्या कडून श्री केदारेश्वर मंदिरात मनमोहक विद्युत रोषणाई, पुष्पसजावट करण्यात आली आहे. विविध फुलांच्या सजावटीने बहरले असून अत्यंत आकर्षक विद्युत रोषणाई सजावट व विविध आकर्षक फुलांची आरास मंदिर परिसर,गाभारा व सर्व ठिकाणी करण्यात आली आहे.हर हर महा

श्रावण पर्व:11 ऑगस्ट रोजी वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या वतीने कावड यात्रेचे आयोजन

इमेज
  श्रावण पर्व:11 ऑगस्ट रोजी वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या वतीने कावड यात्रेचे आयोजन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठान संचलित वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त ज्योतिर्लिंग वैद्यनाथास  जलार्पण करण्यासाठी 11 ऑगस्ट रोजी कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कावडयात्रेत शिवभक्तांनी  मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.        बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या प्रभू वैद्यनाथास जलाभिषेक करण्यासाठी व श्रावण महिन्याच्या पर्वकाळात गंगेच्या पाण्याचे जलार्पण करण्यासाठी दरवर्षी कावड यात्रेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही वैद्यनाथ भक्तिमंडळाच्या वतीने दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी खडका ते परळी वैजनाथ अशी कावड यात्रा काढण्यात येणार आहे. खडका येथून गोदावरी गंगेचे पाणी परळी वैजनाथ येथे कावड यात्रेद्वारे आणले जाणार आहे. गोदावरीचे पाणी आणून ज्योतिर्लिंग वैद्यनाथास जलार्पण करण्यात येणार आहे. या कावडयात्रेत भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वैद्यनाथ भक्ति मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

क्रीडा आयुक्त डॉ.राजेश देशमुख यांना सचिव म्हणून पदोन्नती

इमेज
  क्रीडा आयुक्त डॉ.राजेश देशमुख यांना सचिव म्हणून पदोन्नती मुंबई दि. ६ ऑगस्ट राज्याचे क्रीडा आयुक्त राजेश देशमुख (भा प्र से) यांना सचिव म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी याबाबतचे आदेश आज निर्गमित केले आहेत. पदोन्नती नंतर त्यांची नियुक्ती आहे त्याच पदावर श्रेणी उन्नत करून कायम ठेवण्यात आली आहे. डॉ. राजेश देशमुख यांनी यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पुणे आणि यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे खाजगी सचिव म्हणून सुद्धा काम त्यांनी पाहिले. डॉ. राजेश देशमुख अतिशय कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून परिचित असून वेगवेगळ्या पदावर काम करताना त्यांनी आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवला आहे. डॉ. राजेश देशमुख यांना यापूर्वी विविध पदावर काम करत असताना पी.एम. किसान, पी.एम. आवास योजना परिणामकारकरित्या राबवल्याबद्दल केंद्रीय पातळीवरील पुरस्कार देऊन सन्मान सन्मानित करण्यात आले होते.  तसेच पुणे जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल राष्ट्रपती श्रीमती मुर्मु यांच्या ह

ग्रामसेवक परीक्षेत परळीचा अजय ताटे जिल्ह्यात पहिला

इमेज
  ग्रामसेवक परीक्षेत परळीचा अजय ताटे जिल्ह्यात पहिला परळी वैजनाथ,प्रतिनिधी...             जून महिन्यात घेण्यात आलेल्या ग्रामसेवक पदभरती परीक्षेसाठी निवड यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असुन ग्रामसेवक पद भरतीच्या परीक्षेत परळीचा अजय प्रकाश ताटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.        जिल्हा परिषद पदभरती २०२४  मध्ये विविध संवर्गाची पदे भरण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांनी जाहिराती प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात आली होती. विविध संवर्गाच्या परीक्षा  पार पडल्या.  ग्रामसेवक या पदाच्या परीक्षा दिनांक१९  जून २०२४ रोजी   घेण्यात आली होती. या पदभरतीची निवड यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये परळी वैजनाथ येथील रहिवाशी व सध्या गंगाखेड येथे कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले अजय प्रकाश ताटे यांनी बीड जिल्ह्यात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

आज शौर्य सीएनजी गॅस पंपाचे बी. बी. ठोंबरे,उषा किरण गित्ते यांच्या हस्ते उद्घाटन

इमेज
आज शौर्य सीएनजी गॅस पंपाचे बी. बी. ठोंबरे,उषा किरण गित्ते यांच्या हस्ते उद्घाटन  परळी प्रतिनिधी.      परळी शहरात आज नव्याने सुरू होत असलेल्या शौर्य सीएनजी गॅस पंपाचे उद्घाटन नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज चे  कृषिरत्न चेअरमन बी. बी. ठोंबरे व शौर्य सीएनजी गॅस पंपाच्या संचालिका सौ.उषा किरण गित्ते यांच्या हस्ते होणार आहे.         दिनांक 6  ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता प्रियानगर येथे शौर्य सीएनजी गॅस पंपाचे उद्घाटन होणार आहे. रांजणी येथील नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज  कृषिरत्न चेअरमन बी.बी. ठोंबरे   व सौ.उषा किरण गित्ते यांच्या हस्ते पंपाचे उद्घाटन होणार आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी गॅस वाहनधारकांना स्वस्त आणि परवडणारे आहे. परळी शहर व परिसरात त्यामुळे वाहनधारकांची सोय होणार आहे.      या उद्घाटन समारंभास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शौर्य किरण गित्ते यांनी केले आहे.

गुरुने दिलेले ज्ञान हे पुढच्या पिढीला देणे हीच खरी गुरुदक्षिणा-ॲड.कल्पना देशमुख

इमेज
  गुरुने दिलेले ज्ञान हे पुढच्या पिढीला देणे हीच खरी गुरुदक्षिणा-ॲड.कल्पना देशमुख  परळी (प्रतिनिधी)  भारताला गुरु-शिष्यांची पवित्र परंपरा असुन गुरूकडून मिळालेले शिक्षण पुढच्या पिढीला देणे हीच खरी गुरुदक्षिणा असुन या गुरुदक्षिणेचे महत्व संगितक्षेत्रात अधिक असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेविका,सामाजीक कार्यकर्त्या ॲड.कल्पना देशमुख यांनी केले.तुकाराम जाधव व सौ.दिपीका जाधव यांच्या सुरसंगम संगित विद्यालयाच्या वतिने गुरूपौर्णिमेच्या निमीत्ताने संगित परिक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्र वितरण कार्यक्रमात बोलत होत्या.  परळी शहरातील अंध कलाकार तुकाराम जाधव व सौ.दिपीका सावजी-जाधव हे दाम्पत्य सुरसंगम संगित विद्यालयाच्या माध्यमातुन संगित क्षेत्रात कार्य करत आहे.या संगित विद्यालयाच्या वतिने दरवर्षी गुरूपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.रविवार दि.4 ऑगस्ट रोजी सुर्वेश्वर मंदिर येथे पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहर मुंडे  संध्या च्या पिढीला गुरू शिस परपरा जमन्याची फार गरज असे अध्यक्षीय भाषणात सांगितले तर प्रमुख पाहुणे म्हणुन दिव्य मराठी तालुका प्रतिनिधी धनंजय आढाव डॉ गणेश सा

श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

इमेज
  श्री गुरुपादेश्वर शिवाचार्या महाराज गिरगावकर यांचे आज पासून अनुष्ठान    श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन परळी वैजनाथ दि.०४ (प्रतिनिधी)           पवित्र श्रावणमासानिमित्त श्री गुरुपादेश्वर शिवाचार्या महाराज गिरगावकर यांचे आज पासून प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री शनी मंदिरात अनुष्ठान सुरू होणार असून यानिमित्ताने अनेक धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.०४) श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. पुजा,आरती केली.        श्रावणमास निमित्त गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज, गिरगांवकर यांचे ५ ते १७ आँगस्ट दरम्यान श्री.शनी मंदीर देवस्थान, वैद्यनाथ मंदीरच्या पायथ्याशी श्रावणमास तपोनुष्ठान सुरू होणार आहे. श्रावणमास तपोनुष्ठान कालावधीत दररोज अन्नप्रसाद, अखंड शिवनाम सप्ताह,परमरहस्य पारायम सोहळा, कीर्तन, प्रवचन, वृक्षदान सोहळा, वृक्षारोपण, जलपुनर्भरण, आरोग्य तपासणी शिबीर,सांस्कृतिक व विविध समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने रविवारी श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजा

श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर परळीत वैद्यनाथ मंदिरात तगडा बंदोबस्त !दर्शनासाठी लाखो भाविक होणार दाखल

इमेज
  श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर परळीत वैद्यनाथ मंदिरात तगडा बंदोबस्त ! दर्शनासाठी लाखो भाविक होणार दाखल   परळी वैजनाथ  / प्रतिनिधी         हिंदू धर्मातील पवित्र अशा श्रावण मासानिमित्त देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या  प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने तयारी पूर्ण झालेली असून शंभराहून अधिक सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांची मंदिर परिसरावर करडी नजर असणार आहे.देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी वैद्यनाथ मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे.   ५ ऑगस्ट सोमवार रोजी श्रावण महिन्याला सुरवात होत असून ४ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजल्यापासुन प्रभू वैद्यनाथाचे दर्शन सुरु होणार आहे.मंदिर परिसरात देवस्थाचे सुरक्षारक्षक आणि स्वछता कर्मचारी असणार आहेत.मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाची झडती घेऊनच आतमध्ये सोडण्यात येईल.यामध्ये तिन्ही रांगांच्या प्रवेशद्वारावर तपासणी करुन प्रवेश दिला जाणार आहे. Click : ♦️ भक्तांसाठी खास पर्वकाळ: यंदाच्या श्रावण महिन्यात ५ सोमवार!   ७२ वर्षानंतर दुर्मिळ योगायोग!_          बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त

कुसुम कांबळे यांचे दुःखद निधन

इमेज
  कुसुम कांबळे यांचे दुःखद निधन परळी :  कुसुम मुकुंद कांबळे वय 76 वर्ष यांचे दीर्घ आजारामुळे 3 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी निधन झाले. वैद्यनाथ कॉलेज, भौतिकशास्त्र विभागातील प्रा ' मनोज कांबळे यांच्या मातोश्री असून,त्यांच्या पार्थिवावर शनिवारी 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मोरेवाडी, अंबाजोगाई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुलं,एक मुलगी,जावई,सुना,नातवंडे असा परिवार आहे.

गोळीबाराची घटना: पैसे देण्यास नकार दिला: खल्लास करतो म्हणत झाडली गोळी

इमेज
  गोळीबाराची घटना: पैसे देण्यास नकार दिला: खल्लास करतो म्हणत झाडली गोळी परळी वैजनाथ : प्रतिनिधी...       पैशाच्या देवाणघेवाणीतून गोळीबार केल्याची घटना परळी वैजनाथ तालुक्यातील नाथरा येथे सोनपेठ रस्त्यावर शनिवारी दुपारी ३ वाजता घडला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणात परळी वैजनाथ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.      नाथरा येथील महादेव केशव मुंडे (वय ३७) यांना प्रकाश अशोक मुंडे याने ऊसने ५० हजार रुपये मागितले. हे पैसे देण्यास नकार दिल्याने महादेव मुंडे यांच्या कानाला गावातीलच प्रकाश मुंडे याने गावठी पिस्तूल लावला. गोळीबार करत असतानाच महादेव मुंडे यांनी प्रसंगावधनता बाळगली आणि प्रकाशच्या हाताला झटका मारला. त्यामुळे महादेव मुंडे बचावले. यामध्ये कोणालाही इजा झालेली नाही. या प्रकरणी महादेव मुंडे यांच्या फिर्यादीवरून प्रकाश अशोक मुंडे याच्याविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री ८.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी

श्रावणमास: सोमवारपासून सुरुवात अन् सोमवारीच समाप्ती !

इमेज
भक्तीसाठी खास पर्वकाळ: यंदाच्या श्रावण महिन्यात ५ सोमवार! ७२ वर्षानंतर दुर्मिळ योगायोग! परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....           सनातन हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात शंकर आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असं म्हटलं जातं.यावर्षी खास पर्वकाळ असणार आहे. यंदा श्रावणात पाच सोमवार असणार आहेत. यावेळी ७२ वर्षांनंतर श्रावण महिन्यात हा दुर्मिळ योगायोग तयार होत आहे. विशेष म्हणजे, श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवारी होत आहे.             मराठी पंचांगानुसार ५ ऑगस्टपासून श्रावणाची सुरुवात होत आहे. श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवारी असण्याचा दुर्मिळ योग ७२ वर्षांपूर्वी तयार झाला होता. २७ जुलै १९५३ रोजी सोमवारी श्रावण महिना सुरू झाला होता. यावेळी श्रावणामध्ये सहा शुभयोगही तयार होत आहेत. हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या सण-उत्सवांना हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्व आहे. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्यात विविध प्रकारचे सण-उत्सव येतात. या मराठी महिन्यां