23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

 23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे




परळी वैजनाथ.....

          बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.

             महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कामगार सहभागी होणार आहेत. या आंदोलनात बीड जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने कामगार सहभागी होणार आहेत. कामगारांना दिवाळीसाठी 20000 रुपये अनुग्रह अनुदान द्यावे ,साहित्य खरेदी योजना सुरू करा व साहित्यासाठी दहा हजार रुपये द्या, 60 वर्षावरील बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये पेन्शन द्या, सुरक्षा संच, भांडी संच ऐवजी रोख रक्कम द्या, घर बांधणी योजनेचे अनुदान साडेचार लाख रुपये करा, सर्व योजनेचे लाभ अर्ज केल्यानंतर दोन महिन्याच्या आत द्या, बोगस कामगारांची नोंदणी रद्द करा, मृत्यू लाभासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्राची अट रद्द द्या करा ,सर्व जिल्ह्यात मेडिक्लेम योजना सुरू करा, त्यात आई-वडिलांसह कुटुंब यांचा समावेश करा ,उपचारासाठी तालुक्यातील सर्व सुविधांचा लाभ असलेला दवाखाना निवडा आदी प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्रा .बी.जी.खाडे, सरचिटणीस जालिंदर गिरी, ओम पुरी, शेख जावेद, नवीद महाजन, गजू पटेल, अर्जुन सोळंके, कृष्णा कांबळे, बाबासाहेब रोडे, प्रकाश वाघमारे यांनी केले आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी येणाऱ्यांनी 22 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता परळी रेल्वे स्थानकावर यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?