कृषी प्रदर्शनास सोमवार एक दिवसाची मुदतवाढ

कृषी महोत्सव परळी : शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कृषी प्रदर्शनास सोमवार एक दिवसाची मुदतवाढ - धनंजय मुंडे यांचा निर्णय कृषी महोत्सव आता 5 ऐवजी 6 दिवसांचा आज चौथ्या दिवशीही राज्यभरातून हजारो शेतकऱ्यांची कृषी व पशु प्रदर्शनास भेट, सर्वच स्टॉल्स वर दिवसभर प्रचंड गर्दी आजच्या तांत्रिक सत्रात ड्रोन द्वारे फवारणीची प्रात्यक्षिके, कीड रोग नियंत्रणावर सखोल मार्गदर्शन परळी वैद्यनाथ, दि. 24: परळी वैद्यनाथ येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवास राज्यभरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून, या प्रदर्शनास आता एक दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. चौथ्या श्रावण सोमवारी देखील आता कृषी महोत्सव सुरू असणार असून, हा महोत्सव आता 5 ऐवजी 6 दिवसांचा करण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, कृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचावे, शासकीय योजनांची माहित्ती शेतक-यापर्यंत पोहोचावी, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत व्हावी व शेतमालाला चांगला बाजार भाव मिळावा तसेच शेतकरी व वरिष्ठ कृषी शास्त्रज्...