पोस्ट्स

सप्टेंबर १, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी मानले धनंजय मुंडे यांचे आभार

इमेज
  शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी मानले धनंजय मुंडे यांचे आभार परळी वैजनाथ:सरस्वती नदीच्या पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या नागरिकांना तातडीने मदत द्यावी अशा प्रकारची मागणी सर्व स्तरातूनच होत होती. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही तातडीने पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या भेटी घेऊन दिलासा दिला होता. त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या भागात फिरून तातडीने मदतीची मागणी केली होती. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या पूरग्रस्त नागरिकांना नाथ प्रतिष्ठानकडून 10 व शासकीय मदत पाच हजार अशी पंधरा हजार रुपयाची  मदत जाहीर केली. याबद्दल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त करून नाथ प्रतिष्ठानचेही कौतुक केले आहे.  परळी शहरातील सरस्वती पाणी वस्त्यातील घरामध्ये शिरल्याने प्रचंड नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते .कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी तर केली पण अजून ही तातडीची मदत केली नसल्याचे सांगुन गणेश उत्सवाच्या काळात तात्काळ मदत करायला हवी. पूरग्रस्तांच्या डोळ्यातल

वीस वर्षीय युवतीचा विनयभंग

इमेज
  वीस वर्षीय युवतीचा विनयभंग  परळी (प्रतिनिधी)  परळी शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर शिक्षण घेत असलेल्या केज तालुक्यातील वीस वर्षीय युवतीचा भावकीतील एकाने विनयभंग केल्याची घटना शुक्रवार दि.6 सप्टेंबर रोजी घडली.  केज तालुक्यातील वीस वर्षीय युवती परळी बसस्थानकासमोरील समर्थ हॉस्पिटल येथुन शुक्रवार दि.6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता वैद्यनाथ हॉस्टेलकडे निघाली असता चंद्रमणी आश्रोबा तुपारे याने रस्त्यात अडवून तु माझ्याशी लग्न कर अशी हुज्जत घालू लागला.सदरील युवतीने नकार देताच शिवीगाळ करत मारहाण करुन विनयभंग केला.याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

परळीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या घोंगडी बैठकीस लाखोच्या संख्येने उपस्थित रहा- अमित घाडगे पाटील

इमेज
परळीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या घोंगडी बैठकीस लाखोच्या संख्येने उपस्थित रहा- अमित घाडगे पाटील परळी (प्रतिनिधी): मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात सभा, रॅली, काढलेल्या आपण पाहिलेले आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघात घोंगडी बैठकांचे आयोजन केलेले आहे. याच अनुषंगाने मराठा आरक्षण जागर घोंगडी बैठक परळी मतदार संघात होणार आहे. आज दि.8 सप्टेंबर रोजी सकाळी 11वा. परळी शहरातील हालगे गार्डन येथे होणार आहे. बैठकीला लाखो समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा मराठा सेवक अमित घाडगे पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकार केले आहे. परळी वैद्यनाथाच्या पायथ्याशी असलेल्या हालगे गार्डन परळी विधानसभा मतदार संघाची भव्य दिव्य अशी घोंगडी बैठक मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील गेल्या एक वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा लढत आहेत. सरकारने लगेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी न केल्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये लोकसभेप्रमाणे उमेदव

प्रत्येक बाधित कुटुंबाला मोफत धान्याच्या किटही देणार

इमेज
  परळीत सरस्वती नदीच्या पुराने बाधित झालेल्या 550 हुन अधिक कुटुंबांना धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठान कडून प्रत्येकी 10 हजारांची मदत तातडीच्या आपत्ती निधीतूनही प्रशासनाकडून प्रत्येक कुटुंबाला 5 हजारांची मदत; रविवारी धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत एकत्रित होणार वितरण प्रत्येक बाधित कुटुंबाला मोफत धान्याच्या किटही देणार परळी वैद्यनाथ (दि.07) - परळी वैजनाथ शहरात मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सरस्वती नदीला आलेल्या पुरात 550 पेक्षा अधिक कुटुंब बाधित होऊन त्यांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य धान्य आदींचे नुकसान झाले होते. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने 550 पेक्षा अधिक कुटुंबांना प्रतिक कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत रविवारी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या तातडीच्या आपत्ती निवारण निधीतून देखील प्रशासनाच्या वतीने या प्रत्येक बाधित कुटुंबाला नियमाप्रमाणे प्रत्येकी 5000 रुपये याप्रमाणे तातडीची मदत देखील धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार व्यंक

केवळ इमारती बांधल्या नाहीत तर माणसाला माणूस जोडण्याचे काम आम्ही केले

इमेज
  लोकनेते मुंडे साहेबांनी जनतेसाठी पाहिलेली प्रत्येक स्वप्न सरकारी योजना बनवल्या केवळ इमारती बांधल्या नाहीत तर माणसाला माणूस जोडण्याचे काम आम्ही केले अहिल्यानगरच्या राहता पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे आ. पंकजा मुंडेंच्या हस्ते थाटात उदघाटन ; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह अनेकांची उपस्थिती शिर्डी ।दिनांक ०६।  लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी जनतेसाठी जी  स्वप्न पाहिली होती, त्या स्वप्नांच्या मी मंत्री असताना सरकारी योजना तयार केल्या आणि त्यातून विकासाची कामे मार्गी लावली. आम्ही केवळ नवीन इमारती बांधल्या नाहीत तर शासकीय योजनांच्या माध्यमातून माणसाला माणूस जोडण्याचे काम केले, जनसेवेचे हा वसा कधीही सोडणार नाही असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी येथे केले.     सात कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या राहता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज आ. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. आशुतोष काळे, माजी ख

मान्यवरांच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठा

इमेज
  नाथ प्रतिष्ठानच्या श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवातील श्रींची सकाळी 11 वाजता निघणार मिरवणूक मान्यवरांच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठा परळी वैजनाथ: नाथ प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवाच्या 19 व्या वर्षीच्या महोत्सवाचे आज थाटात उद्घाटन संपन्न होत असून तत्पूर्वी सकाळी ठीक अकरा वाजता श्रींची हनुमान मंदिर येथून स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे सभामंडप जत्रा मैदान इथपर्यंत मिरवणूक निघणार आहे.  या मिरवणुकीनंतर स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे सभामंडपाच्या बाजूस उभारण्यात आलेल्या खास शामियानामध्ये श्रींची मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. परळी शहरातील प्रसिद्ध डॉ.राजाराम मुंडे डॉ.गुरुप्रसाद देशपांडे , डॉ.सतीश गुठे डॉ.सुरेश चौधरी भिकूलालजी भन्साळी या मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल.

परळीवासीयांसाठी दहा दिवसांची सांस्कृतिक मेजवानी

इमेज
  धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठान मार्फत यंदा 19 व्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचे आयोजन नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास आज परळीत येणार कैलाश खेर, अभिलिप्सा पांडा, हेमा मालिनी, अजय-अतुल, आनंद शिंदे यांसह हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत परळीवासीयांसाठी दहा दिवसांची सांस्कृतिक मेजवानी परळी वैद्यनाथ (दि. 06) - राज्याचे कृषिमंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या मार्फत दरवर्षी साजरा केला जाणारा व महाराष्ट्रभर ख्याती असलेला श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव यावर्षी 19 व्या वर्षात पदार्पण करत असून यावर्षी देखील श्री गणेश महोत्सवाचे परळी शहरात आजपासून दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे.  आज श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभमुहूर्तावर श्रींची स्व.पंडित अण्णा मुंडे सहभागृह, जत्रा मैदान, परळी येथे विधिवत स्थापना करून या गणेश महोत्सवास सुरुवात होईल.  या गणेश महोत्सवाच्या उद्घाटन

भेल संस्कार केंद्रात शिक्षक दिन उत्साहात

इमेज
  भेल संस्कार केंद्रात शिक्षक दिन  उत्साहात   (परळी.वै):      येथील भा.शि.प्र. सं.अंबाजोगाई संचलित संस्कारक्षम पिढी घडविण्यात आणि भारतीयत्वाचे शिक्षण देऊन जबाबदार नागरिक घडविणाऱ्या भेल संस्कार केंद्रात भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त " शिक्षक दिन " अगदी हर्षोल्लसात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.         या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.श्री.शांतीलाल जैन यांनी भूषविले.सर्वप्रथम मान्यवरांकडून सरस्वती पूजन आणि डाॅ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी श्री.राहुल सुर्यवंशी सर आणि त्यांचा संघाने सरस्वती स्तवन सादर केले. " *शिक्षक हा समाजाचा आरसा असतो*" त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवत असतो.त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वत्र हा शिक्षक दिन साजरा केला जातो. आज शाळेतील वातावरण सकाळपासूनच अगदी भारावून गेलेले होते.इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी " *स्वयंशासन दिन* साजरा करून संपूर्ण दिवस शाळा चालविण्याचा " *याचि देही याचि डोळा* अनुभव घेतला. पुढे आपाप

शिक्षणाधिकारी श भगवानराव फुलारी यांची सदिच्छा भेट

इमेज
  संस्कार प्राथमिक शाळा अतिशय गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं कार्य करत आहे. - प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवानराव फुलारी संस्कार प्राथमिक शाळेत शिक्षक दिनी शिक्षणाधिकारी श भगवानराव फुलारी यांची सदिच्छा भेट परळी (प्रतिनिधी) : शहरातील पद्मावती शिक्षण संस्था संचलित संस्कार प्राथमिक शाळेत आज श्री.भगवानराव फुलारी साहेब (प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, बीड) तसेच श्री कनाके साहेब (गटशिक्षणाधिकारी, परळी वै.), श्री गोविंद कराड साहेब (विस्तार अधिकारी, परळी वै.) तसेच श्री प्रकाश चाटे व श्री अशोक कराड यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा संस्थेचे अध्यक्ष श्री कैलास तांदळे व सचिव श्री दीपक तांदळे यांनी यथोचित सत्कार केला.       यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री भगवानराव फुलारी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिकांसमवेत शिक्षक दिन साजरा केला.       यावेळी त्यांनी शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, "आज शिक्षक दिना दिवशी संस्कार प्राथमिक शाळेला अचानक भेट देऊन एक चांगला अनुभ

पालकमंत्री धनंजय मुंडे,आ.प्रकाश सोळंके यांच्या पाठपुराव्याला यश

इमेज
अखेर सुकळीतील दोनशे कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी:मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई......       गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बीड जिल्ह्यात धारुर तालुक्यातील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मार्गी लागला आहे. या निर्णयानुसार अखेर सुकळीतील दोनशे कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटणार आहे.       अखेर सुकळीतील दोनशे कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे, यासंदर्भातील सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) काल पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. बीड जिल्ह्याच्या धारुर तालुक्यातील गुणवंती प्रकल्पाच्या खाली १५० मीटरवर सुकळी गाव वसलेलं आहे. गावातल्या प्रत्येक घरांमध्ये सातत्यानं ओलावा येत होता. घरात आणि परिसरात असणाऱ्या ओलाव्यामुळे साप, विंचू यांसारखे प्राणी आढळण्याबरोबरच ग्रामस्थांना सतत आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे या गावाच्या पनुर्वसनाची सातत्यानं मागणी होत होती. सुकळी गावच्या पुनर्वसनासाठी २००७ साली मान्यता देण्यात आली होती. मात्र विलंबामुळे या पुनर्वसनाच्या प्रकल्पाची किंमत वाढल्याने

आज हरितालिकेचा दिवस...जाणून घ्या पूजाविधी आणि साहित्याची A to Z यादी

इमेज
  आज हरितालिकेचा दिवस... जाणून घ्या पूजाविधी आणि साहित्याची A to Z यादी        भाद्रपद शुद्ध तृतीयेचे हरितालिका हे व्रत कुमारीकांनी मनासारखा पती मिळावा यासाठी तसेच सौभाग्यवतींनी पतीला निरोगी आणि दीर्घायुष्य मिळावे म्हणून आवर्जून करावे, असे म्हणतात. हरितालिका हे देवी पार्वतीचेच एक नाव त्यांनी कठोर तपश्चर्या करून भगवान महादेवांना वर स्वरुपात प्राप्त केले, याचीच आठवण म्हणून हे व्रत केले जाते.         हिंदू पंचांगानुसार, आज हरितालिकेचा  व्रत आहे. देशातील अनेक भागांत हरितालिकेचे हे व्रत पाळले जाते. हरितालिकेतचं व्रत भगवान शंकर-माता पार्वतीला समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकर  आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते. हरितालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात.हे व्रत करताना महिला शंकर आणि पार्वतीच्या मूर्तीची विधिवत पूजा करतात आणि उपवास धरतात.        हरितालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. या दिवशी गणपती आणि शंकर-पार्वतीची पूजा करावी. शक्य असल्यास सत्यनारायण पूजेच्या वेळी बांधतो तसे केळीचे खांब बांधून चौरंग फुलांनी सजवावा. व्रतकर्त्या स्त्र

अतिवृष्टीमुळे पिक वाया, बॅंकेचा वसुलीसाठी तगादा, शेतकऱ्याची आत्महत्या

इमेज
अतिवृष्टीमुळे पिक वाया, बॅंकेचा वसुलीसाठी तगादा, शेतकऱ्याची आत्महत्या परळी (प्रतिनिधी)        मागील काही दिवसापासुन सुरु असलेल्या सततच्या पावसाने शेतातील पिक नासल्याने व  बॅंकेचे कर्मचारी कर्जवसुलीसाठी दारात आल्याने चिंताग्रस्त झालेल्या 50 वर्षीय शेतकर्याने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना परळी शहरातील गंगासागर नगर येथे घडली.          परळी व तालुक्यात मागील आठ दिवसापासुन सुरु असलेल्या सततच्या पावसाने शेतातील पिके उध्वस्त होत आहेत.परळी शहरातील गंगासागर नगर भागातील रहिवासी असलेले धनंजय रामकृष्ण राऊत वय ५५ यांना लोणी शिवारात तीन एकर जमीन असुन त्यांच्याकडे दोन बॅंकांचे कर्ज आहे.पावसाने पिक वाया गेलेले असताना दोन्ही बॅंकेचे कर्मचारी दि.4 सप्टेंबर रोजी शेतकरी राऊत यांच्या घरी वसुलीसाठी आल्याने आपण हे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत त्यांनी दि.4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले.ही बाब घरातील नातलगांना समजताच त्यांनी धनंजय यांना परळी उपजिल्हा रुग्णालयात हलविले.प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी स्वा.रा.ति.रुग्णालय अंबाजोगाई येथे हल

सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन - बाजीराव भैय्या धर्माधिकारी

इमेज
ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या वतीने सरकारकडे ब्राह्मण समाजाच्या प्रमुख सात मागण्यांचे निवेदन सादर ! सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन - बाजीराव भैय्या धर्माधिकारी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         राज्यातील ब्राह्मण समाजासाठी सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने व प्राप्त परिस्थितीनुसार आवश्यक ठरणाऱ्या प्रमुख सात मागण्यांचे निवेदन ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या वतीने सादर करण्यात आले. ब्राह्मण समाजाच्या सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक असुन सर्व मागण्या लवकरच पूर्ण करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाज शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संस्थापक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.       ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांच्या संदर्भाने सरकारच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाज शिष्टमंडळाला आश्वासित करून अमृत संस्था कायम ठेवून लवकरच भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले. त्याचप्रमाणे यावेळी ब्राह्मण

चक्रधर स्वामी यांची जयंती औष्णिक विद्युत केंद्रात साजरी

इमेज
चक्रधर स्वामी यांची जयंती औष्णिक विद्युत केंद्रात साजरी परळी/ प्रतिनिधी  परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रशासकीय सभागृहात दि ५ रोजी चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. त्यांच्या जीवन कार्यावर या वेळी प्रकाश टाकण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता डी डी कोकाटे यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून वित्त व लेखा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद यरणे, सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड, सुरक्षा विभागाचे प्रमुख बी आर अंबड, मानव संसाधन विभागाचे महादेव वंजारे, अभियंता नंदकुमार आंधळे, ओम कुलकर्णी,बालाजी कांदे, सरोदे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के एच गित्ते मॅडम यांनी केलं तर उपस्थ्यांचे आभार राजू गजले यांनी मानले.

● महादेव गित्ते यांचा विशेष प्रासंगिक लेख >>>शिक्षणातून समाजोन्नती हेच ध्येय; असंख्य शैक्षणीक संस्थांचे यशस्वी सारथी:प्रदीप खाडे

इमेज
शिक्षणातून समाजोन्नती हेच ध्येय; असंख्य शैक्षणीक संस्थांचे यशस्वी सारथी:प्रदीप खाडे            मराठवाड्यातील शिक्षणाची पंढरी असलेल्या लातुर येथील शिक्षणाचा पॅटर्न घेवुन ते शिक्षण बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्याच गावी मिळावे हेच जीवनाचे ध्येय घेवुन शैक्षणीक क्षेत्रात १९ वर्षापुर्वी सेवाभावी संस्था स्थापन करत त्या माध्यमातुन अध्यापक विद्यालयाची सुरुवात केल्यानंतर या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचे जाळे निर्माण करण्याबरोबरच विकास व शैक्षणीक क्षेत्रात प्रगती करण्याची भुमिका असलेले राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे विश्वासू नाथ शैक्षणीक संस्थेच्या सहसचिव पदाचा कार्यभार सांभाळत शिक्षणातुन समाजप्रगती साधणारे, सामाजीक,धार्मिक कार्याच्या माध्यमातुन आपल्या नेतृत्वगुणांचा समाजाला परिसस्पर्श लाभलेले व्यक्तीमत्व म्हणुन कै.रामभाऊ (आण्णा) खाडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष,नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिपराव शिवाजीराव खाडे यांचे नाव आवर्जून घेतले जाते.     धारुर सारख्या शिक्षणापासुन कोसो दुर असलेल्या तालुक्यातील कांदेवाडी गावातील प्रतिष्ठीत रामभाऊ खाडे घराण्याती

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

इमेज
धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठान मार्फत यंदा 19 व्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचे आयोजन नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार कैलाश खेर, अभिलिप्सा पांडा, हेमा मालिनी, अजय-अतुल, आनंद शिंदे यांसह हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत परळीवासीयांसाठी दहा दिवसांची सांस्कृतिक मेजवानी परळी वैद्यनाथ (दि. 04) - राज्याचे कृषिमंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या मार्फत दरवर्षी साजरा केला जाणारा व महाराष्ट्रभर ख्याती असलेला श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव यावर्षी 19 व्या वर्षात पदार्पण करत असून यावर्षी देखील श्री गणेश महोत्सवाचे परळी शहरात मी त्या शनिवारपासून दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे.  शनिवारी (ता.07) रोजी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभमुहूर्तावर श्रींची स्व.पंडित अण्णा मुंडे सहभागृह, जत्रा मैदान, परळी येथे विधिवत स्थापना करून या गणेश महोत्सवास सुरुवा

तारामती शिंदे यांचे निधन

इमेज
  तारामती शिंदे यांचे निधन परळी/प्रतिनिधी - शहरातील संत सावता महाराज मंदिर परिसरातील अनंतपुरे गल्ली येथील ज्येष्ठ महिला श्रीमती तारामती लक्ष्मणराव शिंदे - पाटील (वय ८०) यांचे बुधवारी (दि. ४ सप्टेंबर) सकाळी ८.३० च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातू, नात, नात जावई, नात सून, पतवंडे असा परिवार आहे. गणेशपार भागातील बालाजी शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.

तांत्रिक कामगार संघटने चा 47 वा वर्धापन दिन साजरा

इमेज
  तांत्रिक कामगार संघटने चा 47 वा वर्धापन दिन साजरा परळी वैजनाथ  4 सप्टेंबर   रोजी "विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन महावितरण , पावर हाऊस परळी येथे तांत्रिक कामगार संघटने चा  47 वा वर्धापन दीन , साजरा करण्यात आला.      या प्रसंगी किशोर झरकर यांचे हस्ते नारळ फोडून व  संघटने च्या फलकाला हार घालून व पेढे वाटुन सर्व तांत्रिक कामगार यांचे सोबत उत्साहाने साजरा केला. सर्वांनी तांत्रिक कामगार युनियन च्या एकजुटीच्या घोषणा देत व संघटनेच्या वतीने कामगार यांच्या अडीअडचणी बाबतीत साधक बाधक चर्चा करून सांगता केली.या प्रंसगी महावितरण चे माऊली मुंडे (प्रादेशिक संघटक औरंगाबाद) आमले पाटील (सर्कल सचिव पारेशन) महादेव चाटे (सर्कल सचिव) हंचाटे  (सर्कल ए.ई ) योगिराज बिगर(सर्कल संघटक पारेशन)राजेश तिडके., हंचाटे  .(सर्कल ए.ई.  आफीस) राजाभाऊ नाईकवाडे.आमोल गीते यांचे समवेत पार पडला कार्यक्रम ची सांगता  माऊली मुंडे व  आमले पाटील.यांचे आभार मानले

परळीतील नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ.प्रा. मधुकर आघाव यांची नियुक्ती

इमेज
परळीतील नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ.प्रा. मधुकर आघाव यांची नियुक्ती परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये गेल्या 28 वर्षापासून प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉ. मधुकर आघाव यांची नुकतीच महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.     परळी तालुक्यामध्ये राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये डॉ आघाव यांची यशस्वी वाटचाल राहिलेली आहे. वैद्यनाथ उद्योग समूहाचे चेअरमन म्हणून त्यांनी अनेक फर्म यशस्वी चालविल्या आहेत.  जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी उत्तम कार्य केलेले आहे. वाणिज्य विषयांमध्ये डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर त्यांची वाणिज्य व इतर सांस्कृतिक क्षेत्रातील काही पुस्तके प्रकाशित आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या प्रशासकीय कामांचा लाभ महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी व्हावा व संस्थेची जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडावी म्हणून क्षीरसागर कुटुंबीयांनी त्यांच्यावर विश्वास दर्शविलेला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पालकमंत्री  धनंजय मुंडे

दुःखद वार्ता : रमेश मुंडीक (धारासुरकर) यांना पितृशोक;गंगाधरराव मुंडीक यांचे निधन

इमेज
दुःखद वार्ता : रमेश मुंडीक (धारासुरकर) यांना पितृशोक; गंगाधरराव मुंडीक यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          परळी येथील प्रसिद्ध सराफा व्यापारी रमेश मुंडीक धारासुरकर यांचे वडील गंगाधरराव मुंडीक यांचे आज दि. ४ रोजी सकाळी नऊ वाजता निधन झाले. मृत्यू समयी ते 95 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात पाच मुली, दोन मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.            परळी सोनार समाजाचे सराफ व्यापारी रमेश मुंडीक (धारासुरकर) यांचे वडील गंगाधर रामभाऊ मुंडीक (धारासुरकर ) यांचे आज सकाळी 9:00 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. अतिशय कष्टाळू,  सुस्वभावी, धार्मिक वृत्तीचे म्हणून त्यांचा सर्वांना परिचय होता. कुटुंबवत्सल व मुंडीक कुटुंबाचा आधारवड म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या निधनाने मुंडीक कुटुंबातील एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. परळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असुन अंत्ययात्रा सायंकाळी  5:00 वाजता कृष्णा नगर भागातील श्री संत नामदेव महाराज मंदीर पाठीमागे राहते घर येथून निघेल. त्यांच्या निधनाने मुंडीक कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन!

इमेज
  अतिक्रमणांचा विळखा, न.प.चा अंधाधुंद कारभार व फसलेली भुयारी गटार योजना यामुळे परळीत घुसले पाणी : सखोल चौकशी करा- ॲड. जीवनराव देशमुख परळी वै., प्रतिनिधी...        सरस्वती नदीवरील वाढलेली अतिक्रमणे व नगर परिषदेकडून राबविण्यात येत असलेली अर्धवट व फसलेली भुयारी गटार योजना यामुळे सर्वत्र पाणी तुंबून बसत आहे.रस्ते खोदलेले,नाल्या अर्धवट,गटारांची कामे पूर्ण नाहीत यामुळेच परळीकरांना अनेक वर्षापासून फसव्या विकासाच्या नावाखाली त्रासून टाकलेले आहे.नगर परिषदेचा भोंगळ कारभार व कोट्यावधी शासकीय निधी गिळून टाकण्यासाठी राबवलेली व फसलेली भुयारी गटार योजना याची सखोल चौकशी करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड.जीवनराव देशमुख यांनी केली आहे.        याबाबत मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की,गेल्या अनेक वर्षापासून परळी शहराच्या जुन्या भावभागातून वाहत असणाऱ्या सरस्वती नदीचे पात्र कमी कमी होत गेले आहे. या पात्राच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत.

शासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रिंट मिडीया धोक्यात-दिलीपभाऊ जोशी

इमेज
  स्मॉल मिडीयम न्यूज एडिटर संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी दिलीप जोशी यांची  निवड शासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रिंट मिडीया धोक्यात-दिलीप जोशी *परळी वैजनाथ/प्रतिनिधी* स्मॉल मिडीयम न्यूज एडिटर संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी दैनिक वंदेमातरमचे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते दिलीपभाऊ जोशी यांची निवड रविवार दि.25 ऑगस्ट रोजी परळी वैजनाथ येथे  झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या व्यापक  बैठकीत करण्यात आली.  परळी वैजनाथ येथे स्मॉल मिडीयम न्यूज एडिटर संघटनेच्या प पदाधिकार्‍यांची बैठक रविवारी राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत जेष्ठ संपादक दिलीपभाऊ जोशी यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र त्यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी दिलीपभाऊ जोशी यांचा संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना दिलीपभाऊ जोशी म्हणाले की, जिल्हा दैनिक व साप्ताहिकांची राज्य शासनाकडून गळचेपी होत असून शासन जाहीराती देण्यामध्ये दुजाभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे वृत्तपत्र धोक्यात आले असून शासनाच्या वि

परभणी-बीड जिल्ह्यात उद्या करणार नुकसानीची पाहणी

इमेज
धनंजय मुंडेंनी परळी-अंबाजोगाई तालुक्यातील पूरग्रस्त भागात भेटी देऊन केली नुकसानीची पाहणी शेतीपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश परभणी-बीड जिल्ह्यात उद्या करणार नुकसानीची पाहणी परळी वैद्यनाथ (दि. 03) - राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी व अंबाजोगाई तालुक्यात मागील दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या गावांमध्ये भेटी देऊन नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या सोबतीने धनंजय मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.  प्रशासनास तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून राज्य शासनाकडे मदतीसाठी अहवाल पाठवण्याचे निर्देश यावेळी धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले आहेत. परळी तालुक्यातील कौडगाव हुडा, कौडगाव घोडा आदी गावांमध्ये भेटी दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला.  दरम्यान बीड जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसात सातत्याने झालेल्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून अनेक नद्यांना पूर आले आहेत. गावांमध्ये पाणी शिरून घरातील वस्तूंची नासधूस-घरांची पडझड आदी नुकसानीचेह

निवडणूक जिंकण्यासाठी सकारात्मकतेने कामाला लागण्याचे केले आवाहन

इमेज
आ.पंकजाताई मुंडे यांच्यावर पुण्यातील पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी  ; चिंचवड येथून केली आढावा दौऱ्याची सुरवात निवडणूक जिंकण्यासाठी सकारात्मकतेने कामाला लागण्याचे केले आवाहन ; उद्या वडगाव शेरी, शिरूर मतदारसंघात जाणार पुणे ।दिनांक ०३। आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा आ. पंकजाताई मुंडे यांच्यावर भाजपने पुण्यातील पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. त्या अनुषंगाने आजपासून त्यांनी या मतदारसंघाचा आढावा दौरा सुरू केला असून आज चिंचवड येथे मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा आपणच जिंकणार आहोत, यात कसलेही दुमत नाही तथापि, सर्वांनी सकारात्मकतेने कामाला लागावे असं आवाहन त्यांनी केलं.     भाजपच्या विधानसभा प्रवास योजनेअंतर्गत चार दिवसांच्या दौऱ्यासाठी आ. पंकजाताईंचे दुपारी पुण्यात आगमन झाले. चिंचवड येथे आरंभ हाॅल येथे बैठकीसाठी आगमन होताच त्यांचे जेसीबीतून पुष्पवृष्टी करत कार्यकर्त्यांनी वाजतगाजत जोरदार स्वागत केले. बैठकीच्या प्रारंभी आ. आश्विनी जगताप, पुणे शहर जिल्हाध्यक्ष शंकर जगताप यांनी त्य

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बैठकीत दिले ब्राह्मण समाजाला आश्वासन - बाजीराव भैय्या धर्माधिकारी

इमेज
  दिलासादायक:अमृत योजना कायम ठेवून ब्राह्मण समाजासाठी लवकरच भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ होणार ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बैठकीत दिले ब्राह्मण समाजाला आश्वासन - बाजीराव भैय्या धर्माधिकारी  मुंबई  प्रतिनिधी....               गेल्या अनेक वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी विविध स्तरातून सरकार दरबारी पाठपुरावा केला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ निर्माण करावे ही मागणी लावून धरण्यात आलेली आहे. राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या संदर्भाने ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाची विशेष बैठक घेऊन चर्चा केली. अमृत योजना कायम ठेवून येत्या कॅबिनेटमध्ये आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संस्थापक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिलीआहे. गेल्या अनेक वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची लवकरच सोडवणूक होणार असून या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.          उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य

नऊ ठिकाणी नागरिकांच्या निवाऱ्याची सोय...!

इमेज
साखर झोपेतील नागरिकांची तारांबळ:परळीत नागरीवस्त्यांमध्ये घुसले सरस्वती नदीच्या पुराचे पाणी  सुमारे १००० ते १२०० घरे पुराने बाधित-उपजिल्हाधिकारी परळी वैजनाथ: एमबी न्यूज वृत्तसेवा....    परळी शहरातील जुन्या गावभागात सरस्वती नदीच्या पुराचे पाणी घुसले.सोमवारी मध्यरात्रीनंतर  झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या सरस्वती नदीच्या पात्राला पूर आला आहे.पहाटेच्यावेळी पुराचे पाणी घरांमध्ये घुसले.यामुळे साखर झोपेतील नागरिकांची  तारांबळ उडाली.          गेल्या दोन दिवसापासून संततधार  मुसळधार पाऊस चालू असल्याने सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या सरस्वती नदीला पूर आला आहे. या नदीचे पाणी आंबेवेस भागातील पुलावरून वाहू लागले. हे पाणी शहरातील अंबेवेस, बरकत नगर, रहमतनगर,इंदिरानगर, भिमानगर , कृष्णा नगर, गोपाल टॉकीज रोड, गंगासागर नगर, कुरेशी नगर, भोईगल्ली, सिद्धार्थ नगर, सर्वे नंबर ७५ मधील घरात आज मंगळवारी पहाटे ५ वाजता  पाणी शिरले आहे. जवळपास १००० कुटुंबाच्या घरात पाणी घुसून घरातील संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. या भागातील घरात चार फूट पाणी साचले. अनेकांच्या घरात च

शेती पिकांच्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीस विहित मर्यादेत कळवावी - मुंडेंचे आवाहन

इमेज
  पावसाचा जोर कमी होताच शेती पिकांचे पंचनामे करण्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश शेती पिकांच्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीस विहित मर्यादेत कळवावी - मुंडेंचे आवाहन बीड जिल्ह्यातील नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे, नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे, रात्रीतून काही नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता - धनंजय मुंडे यांचे जनतेला आवाहन मुंबई (दि. 01) - संपूर्ण बीड जिल्ह्यात 31 ऑगस्ट पासून ते आतापर्यंत सातत्याने सर्वदूर पाऊस पडत असून जिल्ह्यातील जवळपास सर्वच जलाशय तुडुंब भरून नदी-नाले खळखळून वाहू लागले आहेत. जिल्ह्यावरील जलसंकट दूर झाल्याची बातमी जरी आनंददायक असली, तरी सततच्या पावसाने अतिवृष्टी व काही ठिकाणी पुराचा धोका निर्माण झाला असून त्यामुळे खरीप हंगामातील शेती पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर काही महसूल मंडळांमध्ये 24 तासांमध्ये अतिवृष्टीच्या निकषांप्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडला असून, राज्य शासनाच्या महसूल विभागाने यापूर्वीच काढलेल्या आदेशाला अनुसरून महसूल व कृषी विभागाने पावसाचा जोर कमी होताच शेती पिकांच्या तसेच घरांच्या पडझडीच्या आदी

सौ.कीर्तीमाला शेटे यांचे निधन: पत्रकार भागवत पोपडे यांना भगिनीशोक

इमेज
सौ.कीर्तीमाला शेटे यांचे निधन: पत्रकार भागवत पोपडे यांना भगिनीशोक परळी वै.प्रतिनिधी...      परळी वै. येथील माणिक नगर येथील रहिवासी असलेल्या सौ. कीर्तीमाला  धोंडीराम शेटे वय 50 वर्षे यांचे रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी  अल्पशा आजाराने निधन झाले. त्या कपिलधार येथे वास्तव्यास होत्या. कपिलधार येथे दर्शनासाठी भाविक गेल्यावर आपुलकीने सर्वाच्या तब्येतीची विचारपूस करणार्‍या, प्रत्येकाला  प्रेमाने वागा' असे सांगणाऱ्या, चेहर्‍यावरून दोन्ही हात फिरवून मायेने जवळ घेणार्‍या प्रेमळ असा असणारया  सौ. किर्तीमाला शेटे यांनी रक्ताच्या नात्यासोबतच त्यांच्या सहवासात येणार्‍या प्रत्येकाला आपल्या सुस्वभावाने आपलंस केलं, अशा सुस्वभावी, बोलक्या, प्रेमळ आणि निर्मळ मनाच्या किर्तीमाला यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने आप्तस्वकिय उपस्थित होते. सतत हसतमुख आणि प्रत्येकाला हसून बोलणाऱ्या होत्या. त्यांच्या पश्चात पती धोंडीराम शेटे, एक मुलगा रवींद्र शेटे चार मुली ज्योती, पूजा, आरती, छकुली, चार भाऊ, दोन बहिणी, तीन जावई, सून ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या सोनपेठ येथील दैनिक सामना तालुका प्रतिनिधी भागव