MB NEWS-परळी पोलीसांनी गुजरातमधील भुज कच्छच्या जंगलातून दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या ! परळीतील व्यापार्याची सोने देण्यासाठी चाळीस लाखांची केली होती फसवणूक

 परळी पोलीसांनी गुजरात मधील भुज - कच्छच्या जंगलातून दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या !



परळीतील व्यापार्याची सोने देण्यासाठी चाळीस लाखांची केली होती फसवणूक


परळी वैजनाथ दि १३ :- एक वर्षापूर्वी परळी शहरातील एका व्यापाऱ्यास स्वस्तात सोने देतो म्हणून चाळीस लाखांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींच्या  गुजरात मधील भुज कच्छच्या जंगलात जाऊन  परळी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ व डीबी शाखेचे भास्कर केंद्रे यांनी मुसक्या आवळून मुद्देमालासह जेरबंद केले. 

      


     १ वर्षापूर्वी परळी शहरातील व्यापारी शंकर शहाणे यांना गुजरात मधील भुज कच्छ या ठिकाणी राहत असलेला एक चतुर महाठक जीसूप मोहम्मद अली कक्कळ आणि सिकंदर ह्या दोघांनी सुरुवातीस स्वस्तात सोने देतो म्हणून पाच लाखांचे सोने दिले. यावर शंकर शहाणे यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. व्यवहार करतेवेळी जीसूप कक्कळ याने आपले नाव बदलून अब्बास आली अशा नावाचा वापर केला होता. ठरल्याप्रमाणे जिसप कक्कळने शंकर शहाणे यांना  पाच लाखांचे सोने दिल्यामुळे त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला.  नंतर जिसुप कक्कळने आणखी स्वस्तात सोने देतो म्हणून शंकर शहाणे यांच्याकडून नगदी रोख चाळीस लाख घेऊन गेला. ४० लाख घेऊन गेल्यानंतर जवळपास सहा महिने जीसुप हा शंकर शहाणे यांना सोने न देता बोटावर खेळवत राहिला. कोरोणाचा काळ आहे आज उद्या सोने देतो म्हणून टोलवाटोलवी करीत राहिला. जिसुप कक्कळ व सिकंदर आपली फसवणूक करीत आहे हे लक्षात येताच शंकर शहाणे यांनी १ वर्षापूर्वी शहर पोलीस ठाणे गाठी रितसर फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हाही दाखल झाला होता. 



           गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीस जिसुप कक्कळ आणि सिकंदर यांच्या मागावर होती. व्यवहार करताना जिसुप कक्कळने आपले नाव बदलून अब्बास आली असे नाव ठेवल्यामुळे पोलिसांना त्याचा शोध घेण्यास अनंत अडचणी येत होत्या. आरोपींच्या शोधात शहर पोलीस ठाण्याचे पथकाने मुंबई, नागपूर, अमरावती, बुलढाणा, भोकरदन, सोलापूर आदी प्रमुख भागात शोध घेतला मात्र सापडून येत नव्हते. मात्र पोलीस अधीक्षक लांजेवार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपाधीक्षक सुनील जायभाय व शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भार्गव सपकाळ डीबी शाखेचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने, श्रीकांत राठोड यांनी  मुंबई गाठली. एका खबऱ्याकडून हा आरोपी त्याचं मूळ नाव जीसूप कक्कळ असून  भुज कच्छ भागातील जंगला लगत राहतो अशी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, भास्कर केंद्रे गोविंद भताने व श्रीकांत राठोड यांनी आपला मोर्चा भूज कच्छ कडे वळवला. आरोपी जीसूप कक्कळ हा भुज कच्छ पासून १७ किलोमीटर अंतरावरील रतिया या ठिकाणच्या फार्महाऊसमध्ये राहतो असे समजल्या वरून त्यांनी आपला मोर्चा रतीयाकडे वळवला. 

     


 

       मदतीसाठी स्थानिकचे चार पोलिस कर्मचारी सोबत घेऊन आरोपीचे फॉर्म हाऊस गाठले. स्थानिक पोलिसांना आरोपीच्या बंगल्याच्या समोरचा दरवाजा वाजवण्यास सांगितले अशात आरोपी मागच्या बाजूने जंगलात पळून जाणार म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ व भास्कर केंद्रे मागच्या बाजुला जंगलात दडून बसले. झाले तसेच आरोपी जिसूप कक्कळ हा मागच्या दाराने जंगलात पळून जात असतानाच भास्कर केंद्र यांनी आरोपीच्या कानफटात रिवाल्वर लावीत मुसक्या आवळीत जेरबंद केले. अशा प्रकारेच दुसरा आरोपी सिकंदर याच्याही मुसक्या आवळल्या. मुद्देमाल रोख ४० लाख रुपयांसह आरोपी मोठ्या शिताफीने ताब्यात घेत परळी आणले. आरोपींच्या मुसक्या आवळून मुद्देमालासह जर बंद केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, डीबी शाखेचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने, श्रीकांत राठोड यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

                        -------Video----


हे देखील वाचा/पहा🔸

संबंधित बातम्या

⬛ *पहा: उद्या रिलीज होणारे सौंदरमल माता-कन्येने गायिलेले "बागेचा माळी हाय माय जगा वेगळा" संपूर्ण गीत....!* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

Click:*पंकजाताई मुंडेंनी 'त्या' गुणी गायिकांच्या कलेला दिला वाव !* *महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शामल सौंदरमलच्या गीताचा व्हिडिओ राज्यात व्हायरल*

Click:*प्रकृती स्थिर-विश्रांतीचा सल्ला : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदय विकाराचा त्रास; ब्रिच कॅन्डी रुग्णालयात उपचार*

Click:*दगदगीमुळे भोवळ आली: धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार* _मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केली दूरध्वनीवरून चौकशी, सुप्रियाताई सुळे, दत्ता मामा भरणे पार्थ दादा पवार आदींनी घेतली भेट_

Click:पंकजाताई ,भुजबळ, शिंगणे, पेडणेकर आदी नेते पोहचले धनंजय मुंडेंच्या भेटीला

Click:*भेटीनंतर बहिण पंकजा मुंडे यांनी दिली धनंजय मुंडे यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती*

Click &watch:🏵️ *भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिलला "बागेचा माळी हाय माय जगा वेगळा"हे महामानवाच्या चरणी समर्पित असलेले गीत रिलीज होणार आहे.* *या गीताला व गायिकांना महाराष्ट्रासमोर आणतांना पंकजा मुंडेंनी केलं 'हे' आवाहन.* *🔸 click करा व नक्की बघा👇👇

जाहीरात/Advertis




---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

-----------------------------
















---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
---------------------------------------------












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !