भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांची गटनिहाय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड

भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांची गटनिहाय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड प्रतिनिधी (परळी वै.): येथील भा. शि. प्र. संस्था, अंबाजोगाई द्वारा संचलित भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. भेल संस्कार केंद्रामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानाबरोबरच त्यांच्या शारीरिक विकासाकडे काटेकोरपणे लक्ष पुरविले जाते. हे काम केंद्रातील क्रीडा विभाग अगदी कटाक्षाने अविरतपणे करत आहेत. विद्यार्थी जर शारीरिकदृष्ट्या सदृढ राहिला, तरच त्याला ज्ञानार्जन करणे सोपे जाते. यासाठीच विद्यार्थ्यांच्या खेळाकडेही येथे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. *महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचलनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय बीड द्वारा आयोजित* परळी येथे तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वय वर्षे 14 व 17 या वयोगटातील भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी आपली दावेदारी सिद्ध केली. ...