पोस्ट्स

MB NEWS:खळबळजनक प्रकार: "इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा": धमकीचे पत्र चिटकवले एकाच्या घराला

इमेज
  खळबळजनक प्रकार: "इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा": धमकीचे पत्र चिटकवले एकाच्या घराला  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       "इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा, जल्द ही तेरा सर तन से जुदा किया जायेगा" अशा प्रकारचे धमकीचे पत्रच एका घराला चिटकवल्याने परळी तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी अज्ञात समाजकंटकाविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सिरसाळा पोलीस करत आहेत मात्र अशा प्रकारचे धमकीचे पत्र मिळाल्याने दोन धर्मात तेढ निर्माण होण्याचा प्रसंग उद्भवला आहे. पोलीस प्रशासन अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.           याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सिरसाळा येथे राहणारे तक्रारदार उमेश रंगनाथ पवार यांच्या घराला धमकीचे हिंदी भाषेतील एक पत्र चिटकवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना याचा शोध घेता आला नाही. त्यामुळे त्यांनी पत्रातील धमकीच्या मजकुराचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी सिरसाळ

MB NEWS:उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीला यश; महावितरणचा संप मागे

इमेज
उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीला यश; महावितरणचा संप मागे राज्यभरातील आज सकाळपासून बत्ती गुल झाली होती. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला होता. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला होता. अखेर सरकारने हा कायदा लागू केला आहे. त्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार होती. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपकरी कर्मचारी ठाम होते.     त्यानंतर आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती. हा संप मागे घेण्यासाठी त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली. त्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, महावितरणचे खासगीकरण करायचे नाही. त्याबद्दल कोणताही विचार नाही असंही फडणवीस म्हणाले आहेत. आज वीज कर्मचारी आणि उपमुख्यमंत्री-उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली, या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला आहे. 

MB NEWS:सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सणाप्रमाणे साजरा करावा - रानबा गायकवाड

इमेज
  सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सणाप्रमाणे साजरा करावा - रानबा गायकवाड परळी, प्रतिनिधी.    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे या देशातील महिलांना शिक्षणाचे द्वारे खऱ्या अर्थाने खुली झाली. त्यामुळे या देशातील तमाम बहुजनांनी विशेषतः महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सणाप्रमाणे साजरा करावा असे आवहान ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केले. ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्रीमती कृष्णाबाई देशमुख  विद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॉडर्न महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा घटेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक प्रा. बाबासाहेब देशमुख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यू हायस्कूलचे माजी प्राचार्य तथा घटेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक मधुकरराव चव्हाण, कृष्णाबाई देशमुख माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.एच. चव्हाण प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण आटोळकर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना रानबा गायकवाड म्हणाली की, या देशातील केवळ महिलांनाच नाही तर बहुजन समाजाला शिक्षणाचे

MB NEWS:●महाराष्ट्र विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न

इमेज
 ◆संस्कृतीच्या नावावर महिलांवर दबाब : प्रा.डॉ.शैलजा बरुरे ●महाराष्ट्र विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न परळी / प्रतिनिधी महिलाना दबाब,दरारा,भीती दाखवून दिली जाणारी वागणूक याला संस्कृती,संस्कार असे विचार समाजात रुजविण्यात येत असून महिलांनी समाजात मुक्त संचार केलं तरच समाजाची प्रगती होऊ शकेल असे मत प्रा.डॉ.शैलजा बरुरे यांनी व्यक्त केले. परळी तालुक्यातील महाराष्ट्र प्राथ,माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनानिमित्त आयोजित माता-पालक मेळाव्यास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.संस्थेचे जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख हे अध्यक्ष म्हणून तर संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे, संचालक सुदाम शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा.डॉ.बरुरे मॅडम म्हणाले की ,आज आपण जे काही सुख उपभोगतो आहोत ते केवळ आपल्या महापुरुषांनी केलेल्या प्रयत्नामुळे शक्य झाले आहे.शिक्षण समजला दिशा दाखविण्याचे काम करते म्हणून सावित्रीबाईनी मुलींची पहिली शाळा सुरू केली मात्र आता काळ बदलला आहे.शिक्षणामुळे प्रश्न विचारणार

MB NEWS:वैद्यनाथ कॉलेजच्या नवता अंकाचे प्रकाशन

इमेज
  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही अजरामर आहेत.. डॉ विजयकुमार देशमुख       वैद्यनाथ कॉलेजच्या नवता अंकाचे प्रकाशन                       परळी प्रतिनिधी-जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती साजरी करण्यात आली .त्याप्रसंगी  सेवानिवृत्त समाजशास्त्र विभाग प्रमुख, प्रा. डॉ.विजयकुमार देशमुख यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची विचार अजरामर आहेत अशी भूमिका यावेळी स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ. डी व्ही मेश्राम, प्रमुख व्याख्याते विजयकुमार देशमुख, विद्या परिषद सदस्य व लोकनेते गोपीनाथराव मुंडे अध्यासन केंद्राचे सदस्य डॉ पी एल कराड,प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. डी के आंधळे, डॉ बी व्ही केंद्रे,प्रा मंगला पेकमवर, कार्यालयीन  प्रमुख श्री अशोक रोडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या नवता या विशेष अंकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व प्रमुख पाहुण्याचा परिचय प्रोफेसर, डॉ.आर डी राठोड यांनी सांगितला त्यात त्यांनी क्रांतीज

MB NEWS:एक रुपयात पेन्सिल तरी येते का? - धनंजय मुंडेंचा शासनाला सवाल

इमेज
 सावित्रीच्या लेकींना तीस वर्षांपासून दिले जाणारे दैनंदिन एक रुपया अनुदान वाढवून प्रतिदिन 20 रुपये करावे धनंजय मुंडे यांची मागणी एक रुपयात पेन्सिल तरी येते का? - धनंजय मुंडेंचा शासनाला सवाल *आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शाळेत येण्यासाठी दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता वाढवण्याची केली मागणी* *धनंजय मुंडे यांचे शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र* मुंबई (दि. 03) - राज्यात पहिली ते चौथीत शिकणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती आदी प्रवर्गातील सावित्रीच्या लेकींना मागील 30 वर्षांपासून नियमित शाळेत येण्यासाठी दिले जाणारे दैनंदिन 1 रुपया प्रोत्साहनपर अनुदान वाढवून प्रतिदिन किमान 20 रुपये करावे, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.  त्याबाबत धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली असून आजच्या या महागाईच्या जमान्यात एक रुपयात साधी पेन्सिल तरी मिळते का? असा प्रश्न उपस्थित करत, सावित्रीमाईंच्या जयंतीच्या निमित्ताने या योजनेचे पुनरावलोकन करून अनुदान प्रतिदिन किमान 20 रु

MB NEWS:लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी परळी वैजनाथ दि.03 (प्रतिनिधी)                शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.               लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख, प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे,प्रा. डॉ विनोद जगतकर यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.डॉ विनोद जगतकर यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांच्या मुळेच आज सर्वत्र मुलींना शिक्षण घेता येत असून स्वर्गीय शामराव देशमुख हे फुलेंच्या विचाराचे खरे पाईक आहेत. यांनी सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणाचे पवित्र कार्य पुढे घेऊन जात आहेत. अलिकडच्या काळात समाजाच्या

MB NEWS: संपादक सतिश बियाणी यांना वार्ता भूषण पुरस्कार जाहीर

इमेज
  संपादक सतिश बियाणी यांना वार्ता भूषण पुरस्कार जाहीर परळी / प्रतिनिधी- संपादक सतिश बियाणी, हे गेल्या अनेक वर्षापासून, दै.मराठवाडा साथीच्या माध्यमातून, अनेक सामाजिक प्रश्न उपस्थित करुन, त्यामाध्यमातून, समाज प्रबोधन करीत असतात,त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन श्रीनाथ मानव सेवा मंडळ आयोजित ६ वे मराठी साहित्य संमेलनाच्या  निमित्ताने, 'वार्ता भूषण' पुरस्कार सतिश बियाणी यांना जाहीर करण्यात आला आहे. सदरील पुरस्कार ६ वे ग्रामीण साहित्य संमेलन नाथरा, येथे ४जानेवारी 2023 रोजी सकाळी दहा वाजता वितरित करण्यात येणार आहे. श्रीनाथ मानव सेवा मंडळ  यांच्या वतीने सहावे मराठी साहित्य संमेलन दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय नाथ्रा येथे होणार आहे. या साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे या राहणार आहेत. तर युवा साहित्यिक, कवी दंगलकार डॉ. स्वप्नील चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रातील मान्यवर मसाप मराठवाड्याचे अध्यक्ष दगडू लोमटे, ज्ये

MB NEWS:हरिदास घुंगासे लिखित आणि डॉ. सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित ' अंकुर मानवतेचा ' बालनाट्याने जिंकली प्रेक्षकांची मने

इमेज
  हरिदास घुंगासे लिखित आणि डॉ. सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित ' अंकुर मानवतेचा ' बालनाट्याने जिंकली प्रेक्षकांची मने (प्रतिनिधी):-  महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित१९ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २०२२-२३ अंतर्गत  हरिदास घुंगासे लिखित आणि प्रा. डॉ.सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित"अंकुर मानवतेचा" या बालनाट्याचे यशस्वी सादरीकरण झाले.महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेस आज प्रारंभ झाला. अंकुर मानवतेचा या बालनाट्यात ग्रामीण भागातील बालकलावंतांनी भूमिका साकारल्या आहेत.या प्रयोगासाठी निर्मिती सहाय्य रघु ताठे,किसन भोईटे, महेंद्र वाहुळे, जयराम बर्डे,नंदू वाघमारे,संतोष गौतम ,किशोर साबळे यांनी केले .हा नाट्यप्रयोग सुंदरेश्वर बहु. उद्देशीय से. संस्था,(गुंज )द्वारा आयुष अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्टस्, पिंपळगाव(कुं),घनसावंगी,जिल्हा. जालना येथील बालकलावंतांनी तापडिया नाट्यमंदिर औरंगाबाद, दि.२ जानेवारी २०२३  रोजी सादर केला.बाल प्रेक्षकांनी या बालनाट्याचा  आस्वाद घेतला. आयुष अकॅडमीचे संचालक लेखक हरिदास घुंगासे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत लेखन केले आहे. प्रस्तुत बालनाट्यामध

MB NEWS:अंबाजोगाई बसस्थानकात शिवशाहीने परळी तालुक्यातील वृध्दास चिरडले

इमेज
  अंबाजोगाई बसस्थानकात शिवशाहीने परळी तालुक्यातील वृध्दास चिरडले अंबाजोगाई - दवाखान्यात दाखल असलेल्या सुनेला जेवणाचा डबा देऊन गावाकडे जाण्यासाठी अंबाजोगाई बस स्थानकात आलेल्या वृद्धाला प्रवेशद्वारावर शिवशाही बसने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा औरंगाबाद येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. मनोहर वैजनाथ सुरवसे (वय ५२, रा. वानटाकळी ता. परळी) असे त्या मयत व्यक्तीचे नाव आहे. अधिक माहिती अशी कि, मनोहर यांची सून डिलिव्हरीसाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल आहे. शुक्रवारी (दि. ३०) मनोहर हे सुनेला जेवणाचा डबा देऊन गावाकडे परत जाण्यासाठी रात्रीच्या सुमारास अंबाजोगाई बस स्थानकाकडे आले. यावेळी रात्री ९.१५ वाजता बस स्थानकात प्रवेश करत असलेल्या बीड- हैद्राबाद या शिवशाही बसने (एमएच ०९ एफएल १०२१) मनोहर यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मनोहर यांना तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना शनिवारी (दि. ३१) त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी किरण मन

MB NEWS:१७५ वर्षे जुनी सावित्रीबाईंची शाळा होणार राष्ट्रीय स्मारक

इमेज
  १७५ वर्षे जुनी सावित्रीबाईंची शाळा होणार राष्ट्रीय स्मारक पुणे:  ज्या काळात आपल्या देशात महिलांना शिक्षणासाठी शाळाच नव्हत्या. बाहेर पडायची देखील सोय नव्हती, अशावेळी समाजाचा विरोध पत्करून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात १७५ वर्षांपूर्वी पहिली मुलींची शाळा सुरू केली, त्या शाळेचे आता राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होणार आहे. ३ जानेवारी रोजी सावित्रीबाईंची जयंती आहे. त्यानिमित्त सावित्रीबाईंचे पुन्हा स्मरण करणे क्रमप्राप्त आहे. ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. सन २०१५ मध्ये पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले. ३ जानेवारी, २०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमित्त त्यांचे ‘गुगलडुडल’ प्रसिद्ध करून गुगलने त्यांना अभिवादनही केले होते. सावित्रीबाईंच्या आठवणीने आजही रोमांच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाड्यात सुरू केली आणि स्त्रीमुक्तीची पहाट झाली. फातिमाबी शेख

MB NEWS:प्रकल्पग्रस्ताचे नेते फुलचंद कराड यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे

इमेज
  प्रकल्पग्रस्ताचे नेते फुलचंद कराड यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे महानिमितीचे संचालक विश्वास पाठक यांच्या उपस्थितीत मुंबई येथे 10 जानेवारीला प्रकल्पग्रस्ताच्या प्रश्नासाठी महत्वपूर्ण बैठक परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :  प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून कृती समितीच्या वतीने परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येत होते. विविध ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. नाशिक, चंद्रपूर, खराडीसह परळी वैजनात येथील प्रकल्पग्रस्त या आंदोलनात सहभागी झाले होते. प्रकल्पग्रस्तांचे नेते तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष फुलचंद कराड यांच्या यशस्वी मध्यस्थीने हे आंदोलन अखेर दहाव्या दिवशी मागे घेण्यात आले आहे. महानिर्मितीचे वरिष्ठ संचालक विश्वास पाठक यांच्याशी फुलचंद कराड यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली असून, प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा विचार करावा असे आवाहन केले होते. याबाबत येत्या १० जानेवारी रोजी मुंबई येथील कार्यालयात अधिकची चर्चा करण्याची आश्वासन कंपनीकडून लेखी देण्यात आले आहे. महानिर्मीती व इतर कंपन्यामध्ये प्रकल्पग्रस्तांचा कायम

MB NEWS:जेपी नड्डांच्या औरंगाबाद येथील कार्यक्रमात पंकजा मुंडे हजर ; फडणवीस गैरहजर

इमेज
  जेपी नड्डांच्या औरंगाबाद येथील कार्यक्रमात पंकजा मुंडे हजर ; फडणवीस गैरहजर औरंगाबाद, 2 जानेवारी :  भाजपच्या मिशन महाराष्ट्रला आजपासून सुरूवात झाली आहे. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच रणशिंग फुंकलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या मिशन 144 ला सुरूवात झाली आहे. याचाच भाग म्हणून जेपी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. जेपी नड्डांच्या औरंगाबाद येथील कार्यक्रमात पंकजा मुंडे हजर तर फडणवीस गैरहजर होते. आज दुपारी जेपी नड्डा यांनी चंद्रपूरमध्ये जाहीर सभा घेतली, यानंतर नड्डा यांची औरंगाबादमध्ये सभा झाली. जेपी नड्डा यांच्या औरंगाबादमधल्या सभेला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचीही उपस्थिती होती. जेपी नड्डा यांच्या औरंगाबादमधल्या सभेला उशीर झाला म्हणून  राष्ट्रीय अध्यक्षांना जास्त वेळ मिळावा म्हणून पंकजा मुंडे यांनी अत्यंत छोटं भाषण केलं. पक्षाचे आदेश मानणं हे माझ्यावरचे संस्कार आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. या भाषणात पंकजा मुंडे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या, तसंच भाजपला जिंकवून देण्याचं आवाहन करत भाषण संपवलं. जेपी नड्ड

MB NEWS:वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव

इमेज
  सभासद व हितचिंतकांच्या प्रेमाला कायम प्रामाणिक राहीन-प्रल्हाद सावंत वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव परळी वैजनाथ/प्रतिनिधी एक सामान्य सेवक म्हणून संपर्कातील अशा प्रत्येकाचे काम निष्ठेने करीत राहिलो. या कालावधीत अनेकांशी ऋणानुबंधाचे नाते निर्माण झाले असून ते मी जोपासत गेलो याची प्रचिती आज वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या अगणित शुभेच्छातून व्यक्त झाली. माझ्यावर असलेल्या सभासद व हितचिंतकांच्या प्रेमाला यापुढेही कायम राहील असे मत पवनराजे अर्बन निधी बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी व्यक्त केले. पवनराजे अर्बन निधी बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पतसंस्थेच्या कार्यालयात सर्व संचालक व कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. यावेळी बोलतांना प्रल्हाद सावंत यांनी सांगितले की, आपला विश्वास मी कमावला परंतू आपणही माझ्यावर नेहमीच मनापासून प्रेम केलेले आहे. एक सामान्य नागरिक व अर्बन निधीचा अध्यक्ष या नात्याने आपल्याला काही सुविधा देता येईल का याचाही प्रयत्न करूत असे प्रल्हाद सावंत म्हणाले.  संबंधीत  Click : ● सहकार क्षेत्रात उ

MB NEWS:निवासी डॉक्टरांच्या मदतीला धनंजय मुंडे धावले*

इमेज
  मार्डने पुकारलेल्या संपामुळे आरोग्य व्यवस्था विस्कळित होऊ शकते म्हणत मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र कठीण काळात सेवा दिलेल्या सेवेकऱ्यांवर न्याय मागण्याची वेळ येऊ देणे योग्य नाही - धनंजय मुंडे निवासी डॉक्टरांच्या न्याय्य मागण्या मान्य करण्याची सरकारकडे मागणी मुंबई (दि. 02) - अपुऱ्या सुविधा व थकलेल्या वेतनासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स संघटनेचा संप सुरू असून, याद्वारे संपावर गेलेल्या 7 हजारहून अधिक डॉक्टरांच्या मदतीला माजी मंत्री धनंजय मुंडे हे धावून आले आहेत.  या डॉक्टर्सचे थकीत पगार, निर्वाह भत्ते, पदनिर्मिती, शासकीय वसतिगृहातील स्वच्छता व अन्य सुविधा, समान वेतन, प्राध्यापकांची भरती यांसह विविध न्याय्य मागण्या तातडीने मान्य करत शासनाने तसे परिपत्रक जारी करावे, कठीण काळात सेवा दिलेल्या सेवेकाऱ्यांवर न्याय मागण्याची वेळ येऊ देणे योग्य नाही; अशा स्वरूपाची मागणी करणारे पत्र धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना लिहिलं आहे. या संदर्भात धनंजय मुंडे यांनी एक ट्विट करून माहिती दिली आहे. या संपात शासकीय वैद्यकीय मह

MB NEWS:अजित पवारांचा पुतळा जाळल्याप्रकरणी २८ जण ताब्यात; पोलिसांची कारवाई

इमेज
  अजित पवारांचा पुतळा जाळल्याप्रकरणी २८ जण ताब्यात; पोलिसांची कारवाई         बारामती:  छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीच्या वक्तव्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याप्रकरणी शहर पोलिसांकडून २८ जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी ही माहिती दिली. पवार यांचे खासगी निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीसमोर त्यांच्या विरोधात निषेधाचे फलक हाती घेत कापडी पुतळा सोमवारी (दि. २) जाळण्यात आला. या आंदोलकांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. या प्रकरणी भाजप कार्यालयाजवळून मोर्चा निघणार होता. त्यामुळे पोलिसांनी तिकडे बंदोबस्त लावला असताना अचानक बाहेरून आलेल्यांनी सहयोग सोसायटीसमोर जमत आंदोलन केले. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी कर्मचाऱ्यांसह तेथे जाऊन आंदोलकांना ताब्यात घेत त्यांच्याकडील फलक व झेंडे जप्त केले. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक सीताराम काटे (रा. सराटी, ता. इंदापूर), मच्छिंद्र शंकर टिंगरे (रा. झारगडवाडी, ता. बारामती), अभिषेक अण्णासाहेब कोळेकर (रा. तरंगवाडी, ता .इंदा

MB NEWS:● अभिष्टचिंतन:तळमळीने सामाजिक बांधिलकी जपणारा खराखुरा 'निस्वार्थ सेवाव्रती' : डॉ.संतोष मुंडे

इमेज
  तळमळीने सामाजिक बांधिलकी जपणारा खराखुरा 'निस्वार्थ सेवाव्रती' : डॉ.संतोष मुंडे       स माजकारण व राजकारणात चांगल्या युवकांनी यायला हवे असे नेहमी म्हटले जाते.काही युवक आहेत जे की अतिशय तळमळीने समाजकार्य करतात.परळी तालुक्यातील डॉ .संतोष मुंडे हे याच तळमळीने सामाजिक बांधिलकी जपत जनसेवा करीत आहेत.आ.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना दिव्यांगाचा कैवारी बनलेले विविध  आरोग्यविषयक, सामाजिक  उपक्रम व लढा देत विविध योजनांच्या माध्यमातून गरजूंची तळमळीने निस्वार्थ सेवा करणारा खराखुरा सेवाव्रती  म्हणजे डॉ .संतोष मुंडे हे आहेत.आज (दि.३ ) डॉ.संतोष मुंडे यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा.         संपूर्ण महाराष्ट्रात डॉ.संतोष मुंडे हे परळी तालुक्यातील एक वलयांकित नाव बनलेले आहे.पहिल्यापासून समाजकारण करण्याची आवड असल्याने समाजकारण करत असतानाच, राजकारणाकडे लक्ष केंद्रित झाले.ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करण्यास सुरुवात केली. समाजकारण व राजकारण या दोन्हीची सांगड घालून काम करण्यास सुरुवात झाली. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक

MB NEWS:शिक्षक मतदार संघ पुन्हा संघटनेच्या अधिपत्याखाली आणणार - सुर्यकांत विश्वासराव

इमेज
  औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाचा खरा दावेदार मराठवाडा शिक्षक संघच - पी.एस.घाडगे   शिक्षक मतदार संघ पुन्हा संघटनेच्या अधिपत्याखाली आणणार - सुर्यकांत विश्वासराव    परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाचा खरा दावेदार मराठवाडा शिक्षक संघच आसून 30 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत संघटनेने उमेदवारी दिलेल्या सुर्यकांत विश्वासराव यांना निवडून आणून दावेदारीवर शिक्कामोर्तब करावे असे प्रतिपादन संघटनेचे मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष पी.एस. घाडगे यांनी केले तर  हा मतदार संघ पुन्हा संघटनेच्या अधिपत्याखाली आणण्यासाठी पुर्ण ताकदीने निवडणूक लढवणार आसल्याचे प्रतिपादन संघटनेचे अध्यक्ष तथा उमेदवार सुर्यकांत विश्वासराव यांनी केले.                                      परळी येथील कॉ.वैजेनाथराव भोसले सांस्कृतिक सभागृहात मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्रीय कार्यकाणीची विस्तारित बैठक रविवार (दि.1) जानेवारी रोजी संपन्न झाली यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना घाडगे व विश्वासराव यांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन केले. 30 जानेवारी 2023 रोजी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या

MB NEWS:किसान सभा प्रकल्पग्रस्त शेतकरी पुत्रांच्या पाठीशी - कॉ अजय बुरांडे

इमेज
  किसान सभा प्रकल्पग्रस्त शेतकरी पुत्रांच्या पाठीशी - कॉ अजय बुरांडे परळी / प्रतिनिधी कायम उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या जमिनी देणाऱ्या शेतकरी पुत्रांना आपल्या हक्कासाठी दहा दिवस उपोषण करूणही प्रश्न सुटत नाहीत ही बाब निंदणीय आहे. सरकारनी तात्काळ याकडे लक्ष देउन प्रकल्पग्रस्त शेतकरी पुत्रांचा प्रश्न सोडविण्याची मागणी करूण चालु असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य किसान सभेचा पाठींबा राहील असे आश्वासन किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ अजय बुरांडे यांनी दिला आहे. दहा दिवसा पासुन परळी विज निर्मीती केंद्राच्या मुख्य कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्त शेतकरीपुत्र उपोषणास बसले आहेत. प्रकल्पग्रस्तांना कायम सेवेत सामावून घ्यावे, ४५ वर्षे पूर्ण झालेल्या प्रकल्पग्रस्तांचा निर्वाह भत्ता ३० हजार रुपये करावा, चंद्रपूर पाॅवर स्टेशन येथे प्रकल्पग्रस्तांचे दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत या मागण्यांसाठी हे आंदोलन चालु आहे. या आंदोलनास  सोमवारी (ता.२) किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ अजय बुरांडे, कॉ पांडुरंग राठोड, कॉ भानुदासबप्पा देशमुख डिवायएफआय चे जिल्हाध्यक्ष कॉ विशाल देशमुख, कॉ मदन वाघमारे यांनी भेट देउ

MB NEWS:मागण्या तात्काळ मान्य करा - जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे

इमेज
  प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा  मागण्या तात्काळ मान्य करा - जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे परळी वै (प्रतिनिधि)  औष्णिक विद्युत केंद्र समोर प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण चालू आहे. उपोषणाला संभाजी ब्रिगेड चा पाठिंबा देऊन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या तात्काळ मान्य करा मागील अनेक वर्षापासून प्रकल्पग्रस्त कामगार परळी औष्णिक विद्युत केंद्रात कामावर आहेत जमिनी हस्तांतरित करताना प्रकल्पग्रस्तांना लेखी आश्वासन दिलेलं होतं संपादित जमिनधारक कुटुंबातील एका व्यक्तीला आम्ही नोकरीमध्ये सामावून घेऊ पण गेल्या अनेक वर्षापासून औष्णिक विद्युत केंद्रांनी ते आश्वासन पूर्ण न केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी वारंवार लेखी पाठपुरावा केला तरी पण त्यांच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे परळी येथे औष्णिक विद्युत केंद्रात समोर प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण चालू आहे. या उपोषणाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने बीड जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीण ठोंबरे सर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला याप्रसंगी संभाजी ब्रिगेडची बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव सर, तालुका अध्यक्ष  देवराव लुगडे महाराज, मराठा सेवा संघ ता

MB NEWS:केंद्र सरकारचा मोठा निर्णय :प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य

इमेज
  केंद्र सरकारचा मोठा निर्णय : प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य          कोविड महामारीची नवी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने १ जानेवारीपासून चीनसह या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी  या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की, चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांनी 1 जानेवारीपासून कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह सादर करणे आवश्यक आहे.          मांडविया म्हणाले की, या ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांना फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी RT-PCR चाचणीचा नकारात्मक COVID अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागेल. ते म्हणाले की, प्रवासाच्या ७२ तासांच्या आत कोविड चाचणी करावी लागेल. आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, सध्या भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विमानतळावरील यादृच्छिक चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे, परंतु प्रवाशांनी विमानात चढण्यापूर्वी RT-PCR अहवाल सादर करणे आवश्यक आहे. Click: MB NEWS च्‍या youtu.be चॅनलला भेट

MB NEWS:परचुंडी उपसरपंचपदी सौ. सीमा परमेश्वर थोरात

इमेज
  परचुंडी उपसरपंचपदी सौ. सीमा परमेश्वर थोरात  परळी/प्रतिनिधी  प्रसिद्ध छायाचित्रकार भीमाशंकर नावंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप च्या सौ सीमा परमेश्वर थोरात या  4 विरुद्ध शून्य मताने विजयी झाल्या. परचुंडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.मीना गुरूलिंगअप्पा नावंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली सदस्य  सौ.छाया रामराव सरांडे,  सौ सीमा परमेश्वर थोरात व मारोती राघु थोरात  यांच्यासह सरपंच सौ मीना गुरुलिंग नावंदे यांनी  सौ सीमा परमेश्वर थोरात यांना मतदान केल्याने व विरोधी बाजूने शून्य मतदान झाल्याने सौ सीमा परमेश्वर थोरात  4 विरुद्ध 0 मताने विजयी घोषित करण्यात आल्या.निवडणूक निरीक्षक म्हणून श्री शुभम मोठेवाड तर  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक गोरे डी डी यांनी काम पाहिले.  त्यांच्या विजयाने परचुंडी ग्रामपंचायत ही महिलांच्या हातात आली असून या ठिकाणी सरपंच उपसरपंचपदी महिलाच आहेत हे विशेष. दरम्यान या निवडी नंतर गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

MB NEWS:धम्मपाल भूतके यांच्या पुढाकाराने जयस्तंभ प्रतिकृती बनले मुख्य आकर्षण

इमेज
  भीमा कोरेगाव शौर्यदिना निमित्त परळीत ५०० शूर वीरांना मानवंदना धम्मपाल भूतके यांच्या पुढाकाराने जयस्तंभ प्रतिकृती बनले मुख्य आकर्षण परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         परळी येथील रेल्वे स्टेशन समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील मैदानावर भीमा कोरेगाव २०५ वा शौर्य  दिनानिमित्त परळीत ५०० शूरवीरांना मानवंदना देण्यात देऊन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी परळी शहरातील समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी, सम्राट अशोक विचार मंच आदी संघटना व विविध आंबेडकरी चळवळीतील पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले.    या अभिवादन कार्यक्रमासाठी  ऑल इंडिया पॅंथर सेना , परळीचे युवा तालुकाध्यक्ष धम्मपाल भूतके यांच्या पुढाकाराने भीमा कोरेगाव जयस्तंभ प्रतिकृती उभी करण्यात आली होती. त्यास आकर्षक फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती.           ऑल इंडिया एस सी/एस टी रेल्वे एम्पलईज असोसिएशन परळी वैजनाथ चे अध्यक्ष गौतम आचार्य, सचिव बालाजी देवडे, प्रा. दासू वाघमारे सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघमारे, सुभाष सवाई, शिवाजी बनसोडे सर, अशोक वाघमारे,  व

MB NEWS:■ अभिष्टचिंतन-सहकार क्षेत्रात उंच भरारी घेणारे व्यक्तीमत्व:पवनराजे अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री. प्रल्हाद सावंत

इमेज
 ●  सहकार क्षेत्रात उंच भरारी घेणारे व्यक्तीमत्व: पवनराजे अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री. प्रल्हाद सावंत ______________________________________ ●सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्व ●प्रल्हाद सावंत यांचा परळीत मोठा जनसंपर्क ●कोरोना लॉकडाऊनमध्ये बँकेची केली स्थापना ●सचिव गोविंद भरबडे व उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे यांची मोलाची साथ* ●परळीतील ग्राहक वर्ग पवनराजे बँकेकडे  आकर्षित ●दीड वर्षात दहा कोटींच्या आसपास ठेवी जमा ______________________________________ ए का अतिशय ग्रामिण व फारसे शैक्षणिक वातावरण नसलेल्या कुटूंबातून एक मुलगा परळीत येतो, काही शिक्षण घेतो आणि शिकण्यासोबत जगण्यासाठी नोकरी करतो...एवढ्यावरच न थांबता प्रामाणिक नोकरीवर सामान्यांचा विश्वास संपादन करीत 10 कोटी रूपये उलाढाल असलेल्या अर्बन बँकेचा संस्थापक अध्यक्ष होतो असे म्हटले तर आपला विश्वास बसणार नाही. परंतू प्रल्हाद रंगनाथ सावंत हा आपल्यातीलच एक तरूण या संघर्षातून घडला असून सुरूवातीच्या या ओळी त्यासाठीच लिहिल्या आहेत. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे हे वाटत असले तरी प्रल्हाद सावंत मात्र अगदी असा आणि असाच पुढे पुढे जात राहिल