इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सणाप्रमाणे साजरा करावा - रानबा गायकवाड

 सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सणाप्रमाणे साजरा करावा - रानबा गायकवाड




परळी, प्रतिनिधी.    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे या देशातील महिलांना शिक्षणाचे द्वारे खऱ्या अर्थाने खुली झाली. त्यामुळे या देशातील तमाम बहुजनांनी विशेषतः महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सणाप्रमाणे साजरा करावा असे आवहान ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केले. ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्रीमती कृष्णाबाई देशमुख  विद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॉडर्न महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा घटेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक प्रा. बाबासाहेब देशमुख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यू हायस्कूलचे माजी प्राचार्य तथा घटेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक मधुकरराव चव्हाण, कृष्णाबाई देशमुख माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.एच. चव्हाण प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण आटोळकर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना रानबा गायकवाड म्हणाली की, या देशातील केवळ महिलांनाच नाही तर बहुजन समाजाला शिक्षणाचे द्वारे खऱ्या अर्थाने क्रांतीबा ज्योतिबा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे खुले झाली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या केवळ या देशातील पहिल्या महिला शिक्षकाच नव्हत्या तर थोर समाज सुधारक होत्या. तर प्रा. बाबासाहेब देशमुख आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मुलींना जी संधी मिळाली त्याचे मुलींनी व महिलांनी सोने केले पाहिजे.

      याप्रसंगी मधुकरराव चव्हाण, बी एच. चव्हाण किरण आटोळकर  यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांचे,ओवी, लघु नाटकांचे तसेच विद्यार्थ्यांच्या भाषणाचे मान्यवर पाहुण्यांनी कौतुक केले. याच कार्यक्रमात कृष्णाबाई देशमुख विद्यालयाच्या विद्यार्थिनी, विद्यार्थ्यांनी सादर केलेली महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील नाटिका यांना विद्यार्थी व शिक्षक तसेच पालकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या वेशातील गणवेश परिधान केल्याने या कार्यक्रमात अधिकच रंगत वाढली.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक चव्हाण यांनी केले तर उत्कृष्ट सूत्रसंचालन मोदाणी मॅडम यांनी तर आभार मरवले मॅडम यांनी केले. कार्यक्रमास शिंदे सर गुडे सर, गंगणे सर, कसबे सर, गोरे सर, कदम सर,व कांबळे सर आदी शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या