MB NEWS:खळबळजनक प्रकार: "इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा": धमकीचे पत्र चिटकवले एकाच्या घराला

 खळबळजनक प्रकार: "इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा": धमकीचे पत्र चिटकवले एकाच्या घराला



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
      "इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा, जल्द ही तेरा सर तन से जुदा किया जायेगा" अशा प्रकारचे धमकीचे पत्रच एका घराला चिटकवल्याने परळी तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी अज्ञात समाजकंटकाविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सिरसाळा पोलीस करत आहेत मात्र अशा प्रकारचे धमकीचे पत्र मिळाल्याने दोन धर्मात तेढ निर्माण होण्याचा प्रसंग उद्भवला आहे. पोलीस प्रशासन अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
          याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सिरसाळा येथे राहणारे तक्रारदार उमेश रंगनाथ पवार यांच्या घराला धमकीचे हिंदी भाषेतील एक पत्र चिटकवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना याचा शोध घेता आला नाही. त्यामुळे त्यांनी पत्रातील धमकीच्या मजकुराचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी सिरसाळा पोलिसांनी घटनेची सविस्तर शहानिशा केली व घटनास्थळी जाऊन निरीक्षण केले त्यानंतर या घराला हे पत्र चिटकवण्यात आल्याचे आढळून आल्याने अज्ञात समाजकंटकाविरुद्ध सिरसाळा पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सिरसाळा पोलीस ठाण्याचे सपोनि व्ही.एस. जोनवाल हे करत आहेत. 
          
• असे आहे धमकीचे पत्र .....
           दरम्यान उमेश रंगनाथ पवार यांच्या घरावर चिटकवलेल्या धमकीच्या पत्रातील मजकूर पुढीलप्रमाणे आहे: "आरएसएस के गुंडे तू सिरसालेमे आरएसएस चलता है तुझे पता नही है क्या इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा, बहुत जल्दी तेरा सर तन से जुदा किया जायेगा तू आरएसएस का लीडर है ना रे ,तकदीर अल्लाहू अकबर "

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार