प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी




परळी वैजनाथ दि.03 (प्रतिनिधी)

               शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

              लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख, प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे,प्रा. डॉ विनोद जगतकर यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.डॉ विनोद जगतकर यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांच्या मुळेच आज सर्वत्र मुलींना शिक्षण घेता येत असून स्वर्गीय शामराव देशमुख हे फुलेंच्या विचाराचे खरे पाईक आहेत. यांनी सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणाचे पवित्र कार्य पुढे घेऊन जात आहेत. अलिकडच्या काळात समाजाच्या जाणीवा बोथट होत चालल्या आहेत, फुले दांपत्याच्या विचाराचे जागरण झाले पाहिजे.असे प्रतिपादन यावेळी डॉ जगतकर यांनी केले. तर अध्यक्षीय समारोप करताना संजय देशमुख यांनी सांगितले की, फुले दांपत्याचा विचाराचा, शिक्षणाचा वारसा पुढे जपला पाहिजे, आमचा तो पर्यंत आहे. प्रास्ताविक प्रा फुटके यांनी तर सुत्रसंचालन नंदिनी जाधव व आरती डाके, आभार निकीता पवार या विद्यार्थ्यांनी मानले, यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रविण दिग्रसकर, प्रा.प्रविण नव्हाडे, प्रा.विशाल पौळ यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट