इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:●महाराष्ट्र विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न

 ◆संस्कृतीच्या नावावर महिलांवर दबाब : प्रा.डॉ.शैलजा बरुरे

●महाराष्ट्र विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न




परळी / प्रतिनिधी


महिलाना दबाब,दरारा,भीती दाखवून दिली जाणारी वागणूक याला संस्कृती,संस्कार असे विचार समाजात रुजविण्यात येत असून महिलांनी समाजात मुक्त संचार केलं तरच समाजाची प्रगती होऊ शकेल असे मत प्रा.डॉ.शैलजा बरुरे यांनी व्यक्त केले.


परळी तालुक्यातील महाराष्ट्र प्राथ,माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनानिमित्त आयोजित माता-पालक मेळाव्यास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.संस्थेचे जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख हे अध्यक्ष म्हणून तर संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे, संचालक सुदाम शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.


पुढे बोलताना प्रा.डॉ.बरुरे मॅडम म्हणाले की ,आज आपण जे काही सुख उपभोगतो आहोत ते केवळ आपल्या महापुरुषांनी केलेल्या प्रयत्नामुळे शक्य झाले आहे.शिक्षण समजला दिशा दाखविण्याचे काम करते म्हणून सावित्रीबाईनी मुलींची पहिली शाळा सुरू केली मात्र आता काळ बदलला आहे.शिक्षणामुळे प्रश्न विचारणारा समाज निर्माण होऊ नये यासाठी आजच्या व्यवस्थेने शिक्षण क्षेत्राला बाजाराचे स्वरूप देऊन गोरगरिबांना शिक्षणापासून वंचीत ठेण्याचा प्रयत्न सुरू आहे.तेव्हा प्रत्येक आईने आज किमान आपल्या मुलांसाठी सावित्रीबाई होणे गरजेचे आहे असे सांगितले.तर संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे यांनी शिक्षण पद्धतीबद्दल माहिती देत छ.शाहू महाराज,कर्मवीर भाऊराव पाटील,फुले दांपत्य यांनी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे माध्यम हे ओळखून समाजातील तळागाळातील सर्वसामान्यांचा मुलं शिकले पाहिजे यासाठी पराकाष्ठा केली.शिक्षणातून स्वताचा उद्धार करून समाजाचा उद्धार करणे ही जवाबदारी प्रत्येकांनी ओळखून कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे शिक्षण थांबणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले.

या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन निमित्ताने आयोजित माता पालक मेळाव्याचे प्रास्ताविक विनायक राजमाने,सूत्रसंचलन शालेय विद्यार्थिनी कु.इशा देशमुख व कु.तनुजा जाधव

तर आभार व्यक्त अरुण गोचडे यांनी केले.

---------------------------

●क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जीवनपटाचे भिंतीपत्रकाचे अनावरण 

● 22 डिसेंबर गणित दिनानिमित्त आयोजित गणित विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण

● राज्य स्तरावर निवड झालेल्या विविध क्रीडा स्पर्धकांचा गुण गौरव

● कार्यक्रमास माता पालकांची लक्षणीय उपस्थिती

● कार्यक्रम संपन्न झाल्यावर  माता पालकांचा व शिक्षकांचा संवाद

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!