इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:वैद्यनाथ कॉलेजच्या नवता अंकाचे प्रकाशन

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही अजरामर आहेत.. डॉ विजयकुमार देशमुख   



   वैद्यनाथ कॉलेजच्या नवता अंकाचे प्रकाशन    


    

            परळी प्रतिनिधी-जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती साजरी करण्यात आली .त्याप्रसंगी  सेवानिवृत्त समाजशास्त्र विभाग प्रमुख, प्रा. डॉ.विजयकुमार देशमुख यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची विचार अजरामर आहेत अशी भूमिका यावेळी स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ. डी व्ही मेश्राम, प्रमुख व्याख्याते विजयकुमार देशमुख, विद्या परिषद सदस्य व लोकनेते गोपीनाथराव मुंडे अध्यासन केंद्राचे सदस्य डॉ पी एल कराड,प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. डी के आंधळे, डॉ बी व्ही केंद्रे,प्रा मंगला पेकमवर, कार्यालयीन  प्रमुख श्री अशोक रोडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या नवता या विशेष अंकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व प्रमुख पाहुण्याचा परिचय प्रोफेसर, डॉ.आर डी राठोड यांनी सांगितला त्यात त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती थोडक्यात सांगितली.या जयंतीचे निमित्याने कु. गिरीजा गोस्वामी, कु. प्राजक्ता रोडे, पल्लवी , कु.पल्लवी औटी, कु. पियुषा जगताप, कु. पूजा नेमाने , कु. चैताली दहिभाते यांनी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर थोडक्यात मनोगत व्यक्त केले.तसेच नवताचे संपादक मंडळ डॉ नयनकुमार आचार्य , डॉ.व्हि जे चव्हाण , प्रा एम एल देशमुख यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात व्याख्याते डॉ. विजयकुमार देशमुख यांनी वैद्यनाथ कॉलेजची उभारणी कशा पद्धतीने झाली यावर प्रकाश टाकला. आज 3 जानेवारी. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस,क्रांतीज्योती सत्यशोधक आद्य कवयित्री,मुख्याध्यापिका  शिक्षिका अशा विविध शब्दगौरवांनी त्यांचे नाव अजरामर झाले आहे. समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांगीण विकासासाठी अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी ज्ञानप्रकाशाकडे थोडक्यात अज्ञानरूपी अंधारावर वार करून समाजाला ज्ञानाच्या प्रकाशमानयुगाकडे नेणाऱ्या त्या थोर महान सुधारक आहेत असे सांगून त्यांनी मुलींसाठी शिक्षणाची द्वारे खुली केली .त्यामुळे शिक्षण क्षेत्राचा नाव लौकिक झालेला दिसून येत आहे. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.डी व्ही मेश्राम यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच स्त्रियांना शिक्षण मिळाले . त्यामुळेच या स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपले नावलौकिक करत आहेत त्याचे सर्व श्रेय हे सावित्रीबाई फुले यांनाच दिले जाते असे मत या प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर.जे चाटे तर आभार प्रा मंगला पेकमवार यांनी मानले .या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!