आयोजन.....

इमेज
  7 ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद! --------------------------------------------- अंबाजोगाई (प्रतिनिधी) : शेतकरी, कामगार, कष्टकरी दीन-दलित सर्वहारा वर्गाच्या न्यायासाठी जीवन वेचणारे झुंजार स्वातंत्र सेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अंबाजोगाई येथे ज्येष्ठ विधितज्ञ एड. असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार, संविधान कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर त्यांच्याशी 'संविधानाची पायमल्ली होत आहे का?' याविषयावर संवाद साधणार आहेत. काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे प्रतिष्ठानच्या वतीने 7 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता अद्यकवी मुकुंदराज सभागृहात या संविधान संवादाचे आयोजन केले आहे. बदलत्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत संविधानाची गळचेपी होत असल्याची चर्चा आहे. या परिस्थितीत समाजमन भक्कम करण्यासाठी एड. असीम सरोदे सातात्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधणारे ह.भ.प. शामसुंदर मह

MB NEWS:शिक्षक मतदार संघ पुन्हा संघटनेच्या अधिपत्याखाली आणणार - सुर्यकांत विश्वासराव

 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाचा खरा दावेदार मराठवाडा शिक्षक संघच - पी.एस.घाडगे 



 शिक्षक मतदार संघ पुन्हा संघटनेच्या अधिपत्याखाली आणणार - सुर्यकांत विश्वासराव  

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाचा खरा दावेदार मराठवाडा शिक्षक संघच आसून 30 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत संघटनेने उमेदवारी दिलेल्या सुर्यकांत विश्वासराव यांना निवडून आणून दावेदारीवर शिक्कामोर्तब करावे असे प्रतिपादन संघटनेचे मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष पी.एस. घाडगे यांनी केले तर  हा मतदार संघ पुन्हा संघटनेच्या अधिपत्याखाली आणण्यासाठी पुर्ण ताकदीने निवडणूक लढवणार आसल्याचे प्रतिपादन संघटनेचे अध्यक्ष तथा उमेदवार सुर्यकांत विश्वासराव यांनी केले.                                  


   परळी येथील कॉ.वैजेनाथराव भोसले सांस्कृतिक सभागृहात मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्रीय कार्यकाणीची विस्तारित बैठक रविवार (दि.1) जानेवारी रोजी संपन्न झाली यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना घाडगे व विश्वासराव यांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन केले. 30 जानेवारी 2023 रोजी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडनुकीच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय व नियोजनासाठी सदरील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील बैठक संघटनेचे अध्यक्ष तथा उमेदवार सुर्यकांत विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस संघटनेचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक आदरणीय पी.एस.घाडगे,संघटनेचे विद्यमान सरचिटणीस राजकुमार कदम,उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे,गुट्टे एस.जी.,सहसचिव पवार टी.जी.,माळी एन.जी.,कोषाध्यक्ष औताडे ए.बी.यांच्यासह संघटनेचे जी.एस. बुरांडे,यु.आर. थोंबाळ, प्राचार्य शंकर राठोड, डी.जी.तांदळे, विश्वाभंर भोसले, बी.टी.सांगळे, प्रा.उमाकांत राठोड, प्रा.चंद्रकांत चव्हाण, सुभाष पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर होते.                     

    तर बैठकीला मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव व सदस्य यांची उपस्थिती होती.बैठकीचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन राजकुमार कदम यांनी केले तर आभार बंडू अघाव यांनी मानले.                         



  बैठक यशस्वी करण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघटनेचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य अशोक मस्कले,बंडू अघाव, जिल्हा सहसचिव विजय गणगे, परळी तालुका व शहर कार्यकारणीचे पदाधिकारी सर्वश्री अनुप कुसूमकर, श्रीधर गुट्टे, श्रीहरी दहिफळे, बालासाहेब जाधव, अलीशान काजी, राजाभाऊ राठोड, राजाभाऊ नागरगोजे, डी.एल. कांदे, अनंत मुंडे, बापुराव खोतपाटील, लक्ष्मण राऊत, रामलिंग गडदे, विनायक राजमाने, बालाजी कडबाने, खयुम शेख आदिनी प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?