MB NEWS:वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव

 सभासद व हितचिंतकांच्या प्रेमाला कायम प्रामाणिक राहीन-प्रल्हाद सावंत

वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव


परळी वैजनाथ/प्रतिनिधी


एक सामान्य सेवक म्हणून संपर्कातील अशा प्रत्येकाचे काम निष्ठेने करीत राहिलो. या कालावधीत अनेकांशी ऋणानुबंधाचे नाते निर्माण झाले असून ते मी जोपासत गेलो याची प्रचिती आज वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या अगणित शुभेच्छातून व्यक्त झाली. माझ्यावर असलेल्या सभासद व हितचिंतकांच्या प्रेमाला यापुढेही कायम राहील असे मत पवनराजे अर्बन निधी बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी व्यक्त केले.



पवनराजे अर्बन निधी बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पतसंस्थेच्या कार्यालयात सर्व संचालक व कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. यावेळी बोलतांना प्रल्हाद सावंत यांनी सांगितले की, आपला विश्वास मी कमावला परंतू आपणही माझ्यावर नेहमीच मनापासून प्रेम केलेले आहे. एक सामान्य नागरिक व अर्बन निधीचा अध्यक्ष या नात्याने आपल्याला काही सुविधा देता येईल का याचाही प्रयत्न करूत असे प्रल्हाद सावंत म्हणाले. 


संबंधीत Click:

● सहकार क्षेत्रात उंच भरारी घेणारे व्यक्तीमत्व: पवनराजे अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री. प्रल्हाद सावंत



प्रल्हाद सावंत यांचा वाढदिवस आज परळी शहर व परिसरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आज सकाळपासूनच प्रल्हाद सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मोबाईल फोन, व्हाट्सअप, फेसबुक आदी सोशल मिडीया वर तसेच प्रत्यक्ष भेटून कार्यकर्त्यांनी  शुभेच्छा देण्यास सुरुवात केली होती. बँकींग क्षेत्रातील विविध मान्यवर, पिग्मी एजंट, विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच वकील, डॉक्टर, इंजिनिअर, पत्रकार व्यापारी व मित्रपरिवार आदींनी श्री प्रल्हाद सावंत यांना शुभेच्छा दिल्या.

Video.....


--------------------------------------------

Video 

-------------------------------------------





                   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार