आयोजन.....

इमेज
  7 ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद! --------------------------------------------- अंबाजोगाई (प्रतिनिधी) : शेतकरी, कामगार, कष्टकरी दीन-दलित सर्वहारा वर्गाच्या न्यायासाठी जीवन वेचणारे झुंजार स्वातंत्र सेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अंबाजोगाई येथे ज्येष्ठ विधितज्ञ एड. असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार, संविधान कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर त्यांच्याशी 'संविधानाची पायमल्ली होत आहे का?' याविषयावर संवाद साधणार आहेत. काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे प्रतिष्ठानच्या वतीने 7 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता अद्यकवी मुकुंदराज सभागृहात या संविधान संवादाचे आयोजन केले आहे. बदलत्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत संविधानाची गळचेपी होत असल्याची चर्चा आहे. या परिस्थितीत समाजमन भक्कम करण्यासाठी एड. असीम सरोदे सातात्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधणारे ह.भ.प. शामसुंदर मह

MB NEWS:धम्मपाल भूतके यांच्या पुढाकाराने जयस्तंभ प्रतिकृती बनले मुख्य आकर्षण

 भीमा कोरेगाव शौर्यदिना निमित्त परळीत ५०० शूर वीरांना मानवंदना




धम्मपाल भूतके यांच्या पुढाकाराने जयस्तंभ प्रतिकृती बनले मुख्य आकर्षण


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... 

       परळी येथील रेल्वे स्टेशन समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील मैदानावर भीमा कोरेगाव २०५ वा शौर्य  दिनानिमित्त परळीत ५०० शूरवीरांना मानवंदना देण्यात देऊन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी परळी शहरातील समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी, सम्राट अशोक विचार मंच आदी संघटना व विविध आंबेडकरी चळवळीतील पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले.

   या अभिवादन कार्यक्रमासाठी  ऑल इंडिया पॅंथर सेना , परळीचे युवा तालुकाध्यक्ष धम्मपाल भूतके यांच्या पुढाकाराने भीमा कोरेगाव जयस्तंभ प्रतिकृती उभी करण्यात आली होती. त्यास आकर्षक फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती. 

         ऑल इंडिया एस सी/एस टी रेल्वे एम्पलईज असोसिएशन परळी वैजनाथ चे अध्यक्ष गौतम आचार्य, सचिव बालाजी देवडे, प्रा. दासू वाघमारे सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघमारे, सुभाष सवाई, शिवाजी बनसोडे सर, अशोक वाघमारे,  वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद घाडगे, बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष जे. के. कांबळे,पत्रकार तथा साहित्यिक रानबा गायकवाड, सत्यशोधक नवनाथ दाने,मोरे, फुले -आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे, युवा नेते केशव गायकवाड, पत्रकार अशोक जोगदंड ,डॉ. स्वप्नील  महाळगीकर, अविनाश उजगरे,सोपान रोडे, जितेंद्र मस्के, शैलेजा ताई आदोडे, भावेश कांबळे, आदित्य जाधव ,आशिष वडमारे , यांच्यासह असंख्य आंबेडकरी आणि महिला पुरुष उपस्थित होते.

      पेंटर युनियनच्या वतीने पाण्याची सुविधा

     या अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या बहुजन समाजातील आंबेडकरी अनुयायांना परळी शहरातील नुकत्याच स्थापन झालेल्या पेंटर युनियनच्या वतीने थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून दिली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?