आयोजन.....

इमेज
  7 ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद! --------------------------------------------- अंबाजोगाई (प्रतिनिधी) : शेतकरी, कामगार, कष्टकरी दीन-दलित सर्वहारा वर्गाच्या न्यायासाठी जीवन वेचणारे झुंजार स्वातंत्र सेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अंबाजोगाई येथे ज्येष्ठ विधितज्ञ एड. असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार, संविधान कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर त्यांच्याशी 'संविधानाची पायमल्ली होत आहे का?' याविषयावर संवाद साधणार आहेत. काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे प्रतिष्ठानच्या वतीने 7 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता अद्यकवी मुकुंदराज सभागृहात या संविधान संवादाचे आयोजन केले आहे. बदलत्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत संविधानाची गळचेपी होत असल्याची चर्चा आहे. या परिस्थितीत समाजमन भक्कम करण्यासाठी एड. असीम सरोदे सातात्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधणारे ह.भ.प. शामसुंदर मह

MB NEWS:मागण्या तात्काळ मान्य करा - जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे

 प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा




 मागण्या तात्काळ मान्य करा - जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे


परळी वै (प्रतिनिधि)

 औष्णिक विद्युत केंद्र समोर प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण चालू आहे. उपोषणाला संभाजी ब्रिगेड चा पाठिंबा देऊन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या तात्काळ मान्य करा मागील अनेक वर्षापासून प्रकल्पग्रस्त कामगार परळी औष्णिक विद्युत केंद्रात कामावर आहेत जमिनी हस्तांतरित करताना प्रकल्पग्रस्तांना लेखी आश्वासन दिलेलं होतं संपादित जमिनधारक कुटुंबातील एका व्यक्तीला आम्ही नोकरीमध्ये सामावून घेऊ पण गेल्या अनेक वर्षापासून औष्णिक विद्युत केंद्रांनी ते आश्वासन पूर्ण न केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी वारंवार लेखी पाठपुरावा केला तरी पण त्यांच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे परळी येथे औष्णिक विद्युत केंद्रात समोर प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण चालू आहे. या उपोषणाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने बीड जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीण ठोंबरे सर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला याप्रसंगी संभाजी ब्रिगेडची बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव सर, तालुका अध्यक्ष  देवराव लुगडे महाराज, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष ईश्वर जिजा सोनवणे, शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष अनुरथ काशीद याप्रसंगी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?