आयोजन.....

इमेज
  7 ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद! --------------------------------------------- अंबाजोगाई (प्रतिनिधी) : शेतकरी, कामगार, कष्टकरी दीन-दलित सर्वहारा वर्गाच्या न्यायासाठी जीवन वेचणारे झुंजार स्वातंत्र सेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अंबाजोगाई येथे ज्येष्ठ विधितज्ञ एड. असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार, संविधान कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर त्यांच्याशी 'संविधानाची पायमल्ली होत आहे का?' याविषयावर संवाद साधणार आहेत. काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे प्रतिष्ठानच्या वतीने 7 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता अद्यकवी मुकुंदराज सभागृहात या संविधान संवादाचे आयोजन केले आहे. बदलत्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत संविधानाची गळचेपी होत असल्याची चर्चा आहे. या परिस्थितीत समाजमन भक्कम करण्यासाठी एड. असीम सरोदे सातात्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधणारे ह.भ.प. शामसुंदर मह

MB NEWS:■ अभिष्टचिंतन-सहकार क्षेत्रात उंच भरारी घेणारे व्यक्तीमत्व:पवनराजे अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री. प्रल्हाद सावंत

 ● सहकार क्षेत्रात उंच भरारी घेणारे व्यक्तीमत्व:पवनराजे अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री. प्रल्हाद सावंत


______________________________________

●सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्व

●प्रल्हाद सावंत यांचा परळीत मोठा जनसंपर्क

●कोरोना लॉकडाऊनमध्ये बँकेची केली स्थापना

●सचिव गोविंद भरबडे व उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे यांची मोलाची साथ*

●परळीतील ग्राहक वर्ग पवनराजे बँकेकडे  आकर्षित

●दीड वर्षात दहा कोटींच्या आसपास ठेवी जमा

______________________________________


का अतिशय ग्रामिण व फारसे शैक्षणिक वातावरण नसलेल्या कुटूंबातून एक मुलगा परळीत येतो, काही शिक्षण घेतो आणि शिकण्यासोबत जगण्यासाठी नोकरी करतो...एवढ्यावरच न थांबता प्रामाणिक नोकरीवर सामान्यांचा विश्वास संपादन करीत 10 कोटी रूपये उलाढाल असलेल्या अर्बन बँकेचा संस्थापक अध्यक्ष होतो असे म्हटले तर आपला विश्वास बसणार नाही. परंतू प्रल्हाद रंगनाथ सावंत हा आपल्यातीलच एक तरूण या संघर्षातून घडला असून सुरूवातीच्या या ओळी त्यासाठीच लिहिल्या आहेत. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे हे वाटत असले तरी प्रल्हाद सावंत मात्र अगदी असा आणि असाच पुढे पुढे जात राहिला. आज 2 जानेवारी रोजी प्रल्हाद सावंत यांचा वाढदिवस असून त्यानिमित्त हा लेख या ठिकाणी देत आहोत.


उखळी ता.सोनपेठ जि.परभणी येथे इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण घेत पुढे वैद्यनाथ महाविद्यालयात कला शाखेत पदवी मिळवून प्रल्हाद सावंत घराबाहेर पडला तो एका महत्वकांक्षेनेच. शिकत असताना लहान मुलांप्रमाणे त्यांचे वय बागडायचे, खेळायचे होते. तो खेळला सुद्धा. परंतू नियतीने त्यांच्या राशीला खेळण्यापेक्षा संघर्षच अधिक दिला होता. या संघर्षाला तो पुरून उरला. 

परळीत आल्यानंतर तो आपल्या नातेवाईकांच्या मदतीने काही काम मिळते का ? याचा शोध घेत होता. त्यातच त्याला एका पतसंस्थेत कर्मचारी म्हणून काम मिळाले. या संघर्षातच त्याचे वडिल व भाऊ यांचे निधन झाले. परंतू एक प्रामाणिक कामाचा वसा घेवून तो अधिक प्रगल्भतेने आपल्या कामात मन लावून संस्थेच्या नफ्या तोट्यासाठी मेहनतीने काम करू लागला. पतसंस्थेत केवळ पैशांची देवाण घेवाण एवढ्यापर्यंत मर्यादित न राहता त्याने मिळालेली प्रत्येक जबाबदारी मोठ्या मेहनतीने पार पाडली. 

पतसंस्थेत काम करीत असतांना मॅनेजर या नात्याने अनेक मान्यवरांसोबत त्याचे संबंध प्रस्थापित झाले. मुळातच स्वभाव गोड आणि त्यात हसतमुख चेहरा यामुळे प्रल्हाद सावंत यांनी संपर्कात आलेल्या प्रत्येकासोबत अतिशय जिव्हाळयाचे संबंध निर्माण केले. या संबंधांची जाणीव ठेवत त्यांचे तो काम करीत राहिला. आपल्या पतसंस्थेत कर्ज वितरणासारखा विभाग हाती आल्यानंतर प्रल्हाद सावंत यांनी मोठया जबाबदारीने काम केले आहे. ओळखीतूनच पतसंस्थेचा व्यवसाय वाढत गेला होता.

एखादे चांगले काम व्हायचे असेल तर त्यासाठी काही गोष्टी घडाव्याच लागतात. पतसंस्थेतील नोकरी सोडावी लागली, नव्याने काम उभे करण्यासाठी कामाला लागावे लागले. थकणार नाही, मी सतत काम करीत राहणार असे नेहमीच सांगणारा प्रल्हाद सावंत स्वतःच्या नव्या संस्थेच्या उभारणीसाठी पुढे आला.पवनराजे अर्बन निधी बँक या संस्थेची स्थापना करण्यापासून संस्थेचे भाग भांडवल किंवा उलाढाल 10 कोटी रूपयांपर्यंत घेवून जाण्याचे काम फक्त दीड वर्षात प्रल्हाद सावंत यांनी केले आहे. बँकींग मधील अतिशय तपशीलवार माहिती, व्यवहारातील प्रदीर्घ अनुभव यामुळे प्रल्हाद सावंतचे नाव बँकींग क्षेत्रात चांगलेच पुढे आले. 30 मार्च 2021 रोजी पवनराजे अर्बन निधी बँकेची स्थापना झाली तेंव्हाच प्रल्हाद सावंत अर्बन निधीचे शिवधनुष्य उचलेल का असा प्रश्न निर्माण झाला होता. 

Video 

 आपले सहकारी सचिव गोविंद भरबडे आणि उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे पाटील यांचे सहकार्य घेत परळी शहरातील कानाकोपर्‍यात असलेल्या सर्वांशी संबंध असल्याने भाग भांडवल गोळा करणे, सभासद तयार करणे, कर्ज वितरण  व वसुली सोबतच ग्राहकांसाठी वीज बील संकलन, आरटीजीएस, गोल्ड लोन, मोबाईल रिचार्ज, पगार तारण, कर्ज सुविधा, महिलांसाठी बचत गट कर्ज व इतर बँकींग सेवा प्रल्हाद सावंत यांच्यामुळेच अर्बन निधी मध्ये उपलब्ध झाल्या. हाती घेतलेले काम मनापासून, जीव झोकून देत केल्यानंतर यशस्वी झाल्याशिवाय राहतच नाही याचा प्रत्यय या प्रल्हाद सावंत यांच्या व्यक्तीमत्वातून स्पष्ट होतो.

आज वाढदिवसानिमित्त प्रल्हाद सावंत यांना मनापासून हार्दीक शुभेच्छा!!!!!!

●शुभेच्छूक●

सचिन भरबडे

माणिकनगर, परळी वैजनाथ

----------------------------------------------

Video.....


--------------------------------------------



                   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?